लेख-समिक्षण
  • 9 august 2026

अंक मिळणेसाठी


एकूण वाचक संख्या : 4212

TimeLine Layout

April, 2025

  • 27 April

    तंत्रज्ञानाने बॉलिवूडचा कायापालट!

    अलिकडच्या काळात माहिती आणि तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटिलिजन्सने सर्वच क्षेत्रावर व्यापक परिणाम केला आहे. यास मायानगरी देखील अपवाद राहिलेली नाही. चित्रपट निर्मितीच्या तंत्रात काळानुसार बदल झाला. पूर्वी चित्रपट तयार करताना बर्‍याच अडचणींचा सामना करावा लागत असे. कालांतराने तंत्रज्ञानाच्या विकासामुळे याचा वापर वाढत गेला आणि चित्रपट तयार करणे तुलनेने सोपे राहू लागले. आता तर एआयमुळे चित्रपट निर्मिती ही खूपच सुलभ झाली आहे. …

    Read More »
  • 27 April

    बदलाची तयारी

    ‘आनंदी आयुष्य ही दैवी देणगी नसते! ’ या विधानाशी सगळेजण सहमत होतील. कारण जन्माला येताना कुणी आनंदाचं पॅकेज सोबत घेऊन येत नाही. आनंद कशाला म्हणायचं? तर मनासारखं होणं म्हणजे आनंद. खरं तर मनासारखं घडणं की न घडणं या दोन गोष्टींच्या झुल्यावर माणसाचं आयुष्य हेलकावत असतं. काहीही हवं ते मिळालं की माणूस सुख समाधानानं भरून पावतो. तेच हवं ते घडलं नाही …

    Read More »
  • 27 April

    अव्वल यशाची कहाणी

    केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीए प्रवेशासाठी घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत देशातील एकूण 792 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. या परीक्षेत इमॉन घोष हा देशात पहिला, तर तिसरे स्थान पुण्यातील ॠतुजा वर्‍हाडे हिने मिळविला आहे. ॠतुजा हिने मुलींमध्ये देशात पहिला क्रमांक मिळविला आहे. एनडीएच्या लेखी परीक्षेच्या निकालांच्या आधारे या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. …

    Read More »
  • 27 April

    आठ कोटी वर्षापूर्वीचा जलचर

    अमेरिकेत टेक्सासमध्ये तब्बल 8 कोटी वर्षांपूर्वीच्या एका जलचर प्राण्याचे जीवाश्म सापडले आहे. या प्राण्याचा जबडा मशरुमसारख्या दिसणार्‍या मजबूत दातांनी भरलेला होता. हा दुर्मीळ मोसासॉर प्राणी वीस फूट लांबीपर्यंतही वाढू शकत असावा, असे संशोधकांनी म्हटले आहे. संशोधकांना अशा प्राण्यांचे दोन जबडे सापडले आहेत. या प्राण्यांना ‘ग्लोबिडेन्स अलाबामेन्सिस’ असे वैज्ञानिक नाव आहे. त्यांच्या जबड्यात गोलाकार दातांची रांग आहे. हे प्राणी आपल्या भक्ष्याला …

    Read More »
  • 27 April

    यशाची नवी ‘दृष्टी’

    जगात असे अनेक लोक आहेत, ज्यांनी आपल्या अपंगत्वावर मात करुन आयुष्यात खूप मोठ्या गोष्टी मिळवल्या आहेत. श्रीकांत बोला हे अशा व्यक्तिमत्वांपैकी एक आहेत. त्यांचा जन्म 7 जुलै 1992 रोजी आंध्र प्रदेशच्या सीतारामपुरम येथे झाला. श्रीकांत जन्मापासून अंध आहेत. मुलगा झाल्यावर प्रत्येकाच्या घरात मोठा आनंदोत्सव साजरा केला जातो. पण, अतिशय गरीब कुटुंबात अंध श्रीकांत यांचा जन्म झाल्याने घरात निराशा पसरली होती. …

    Read More »
  • 27 April

    जीवघेणे ठरतायेत फटाक्याचे कारखाने

    भारतात शोभेची दारू, फटाके तयार करणारे कारखाने कामगारांच्या मुळावर येत आहेत. प्रामुख्याने परवानगी न घेता काम करणारे किंवा नियम ओलांडत फटाक्यांची निर्मिती करणार्‍या कारखान्यातील कामगारांना जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे. यावर्षी फटक्यांच्या कारखान्यातील स्फोटांत 40 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे नियमांचे पालन न करणे. एक एप्रिल रोजी गुजरातच्या बेकायदापणे काम करणार्‍या फटाक्याच्या कारखान्यात …

    Read More »
  • 27 April

    नवा रंग

    ‘अगर रंग ना हो, तो कैसी बेरंग लगेगी ये दुनिया..!’ या शब्दांकडे फक्त प्रसिद्ध संवाद म्हणून न पाहता त्यात सांगितलेल्या परिस्थिती ची कल्पना करून पाहा. आपल्याला सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसतं, त्याहीपेक्षा कितीतरी अधिक रंगछटा पाहण्याची क्षमता आपल्याला लाभली आहे. कितीतरी रंगछटांची नावंही आपल्याला माहीत नसतात; पण त्या आपल्याला दिसत असतात. अशा अंदाजे एक दशलक्ष रंगछटा आपण पाहू शकतो; परंतु त्या सर्व …

    Read More »
  • 27 April

    दहशतवादी हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू

    जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याची घटना कळताच मोठी खळबळ उडाली. तेथे दहशतवाद्यांनी पर्यटकांना टार्गेट केले. या हल्ल्यात 28 लोकांचा जीव गेला आणि अनेकजण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये दोन काश्मिरी मुस्लिमांचाही समावेश आहे. सर्व जखमींना त्यांच्या गावांना हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या हल्ल्यानंतर देशात संतापाची लाट निर्माण झाली. जम्मू आणि काश्मीरमध्ये हिंदू व मुसलमानांनी पाकिस्तानच्या निषेधार्थ कडकडीत …

    Read More »
  • 27 April

    पहलगाममधील हल्ल्याच्या मुळाशी..

    जम्मू- काश्मीरमधील पहलगाममधील बैरासन व्हॅलीमध्ये झालेला दहशतवादी हल्ला हा अत्यंत भीषण, नृशंस आणि तितकाच भेदक आहे. 2019 च्या पुलवामा हल्ल्यानंतरचा हा सर्वांत मोठा दहशतवादी हल्ला आहे. पुलवामामधील हल्ला हा लष्करी जवानांवर झाला होता; परंतु पहलगाममधील हल्ल्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना आणि विशेषतः पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले. हा बदल अत्यंत महत्त्वाचा असून त्यातील गर्भितार्थ लक्षात घेणे आवश्यक आहे. पहलगाममध्ये यापूर्वीही दहशतवादी हल्ले झालेले …

    Read More »
  • 27 April

    झळा पाणीटंचाईच्या

    नवीन वर्षात जानेवारी 25 पासूनच राज्यात अनेक जिल्ह्यात गावोगावी वाड्यांवर महत्त्वाच्या शहरात तेथील अनेक सोसायट्या दरम्यान, गृहप्रकल्पात टँकर फेर्‍या वाढल्या आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे मुंबई महानगर सुद्धा याला सध्या अपवाद नाही. आज अनेक वर्षापासून भूगर्भातले पाणी उपसणे नियंत्रणात आणण्यासाठी कायदा अस्तित्वात असून त्याची म्हणावी तशी अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. राज्यातील अनेक ठिकाणच्या धरणांमधील सातत्याने पाणी कमी होऊ लागल्याचे अत्यंत विदारक …

    Read More »