लेख-समिक्षण

रुक्ष केसांसाठी हेअरपॅक

केसांची योग्य देखभाल न केल्यास किंवा केसांमध्ये पुरेशी आर्द्रता नसेल तर केस खूप कोरडे होतात. कोरडे केस हे खूपच रुक्ष आणि राठ होत जातात तसेच ते केस आकर्षक दिसत नाहीत. अशा केसांची कोणतीही हेअरस्टाईल बनवणे देखील अवघड होते, आणि केसांची नैसर्गिक चमकसुद्धा कमी होतो. हे केस मऊ बनवण्यासाठी रासायनिक सौंदर्य उत्पादने अजिबात वापरू नका. त्याऐवजी घरगुती हेअर पॅक वापरल्यास केस मऊ, निरोगी आणि घनदाट होऊ शकतात.
एका भांड्यात २ अंडी, १ कप ताजे दही, १ टेबलस्पून बदामाचे तेल, १ टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल, १ टीस्पून एरंडेल, १ कप मेंदी पावडर, १ टेबलस्पून शिकेकाई पावडर मिस करा आणि चांगले फेटून घ्या. घट्ट किंवा पातळ करण्यासाठी आवश्यकतेनुसार दही किंवा मेंदी पावडर घालू शकता. हा हेअर पॅक ३० मिनिटे केसांवर ठेवा. यानंतर केस सौम्य शॅम्पूने धुवा. दुसरा पर्याय म्हणजे १० ग्रॅम मेंदी, ५ ग्रॅम शिकाकई, ५ ग्रॅम आवळा, ५ ग्रॅम ब्राह्मी, २ ग्रॅम मुलतानी माती, २ ग्रॅम कॉफी पावडर, अर्धी अंबा हळद, ५ चमचे भृंगराज पावडर, दही, अंडे – हे सर्व चांगले मिसळा आणि पेस्ट बनवा. ही पेस्ट केसांना नीट लावा. दोन तासांनंतर, आपले केस धुवा आणि शाम्पू करा. असे केल्याने कोरडे केस मुलायम आणि निरोगी होतात.
तिसरा एक हेअरपॅक म्हणजे २ अंडी, २ मॅश केलेली केळी, प्रत्येकी २ चमचे आवळा, रेठा आणि शिककाई पावडर, २ चमचे मेथी पावडर, १ चिमूट काळी मिरी पावडर हे सर्व घटक मिसरमध्ये मिसळा आणि टाळूपासून केसांच्या टोकापर्यंत पूर्णपणे लावा. ४५ मिनिटांसाठी पॅक केसांवर ठेवा आणि नंतर शाम्पू करा. या हेअर पॅकमुळे केसांचे पोषण होते आणि ते मऊ होतात.

Check Also

लहान मुलांना लिहिण्यास शिकवण्याची योग्य पध्दत

लहान मुलांना लिहिण्यास शिकवणे हे पालकांसाठी मोठे आव्हान असते. अनेकदा पालक थेट अक्षरे गिरवण्यापासून सुरुवात …