लेख-समिक्षण

जीमेलवर चुटकीसरशी शोधा जुना ईमेल

जीमेल हे भारतातील सर्वात लोकप्रिय ईमेल सेवा प्लॅटफॉर्म आहे. आज स्मार्टफोन वापरणार्‍या जवळपास प्रत्येकाकडे जीमेलचे अकौंट आहे. काही जण १०-१५ वर्षांपासून जी-मेल वापरत आहेत. काही वेळा असा प्रसंग येतो की, आपल्याला खूप वर्षांपूर्वीचा एखादा मेल शोधायचा असतो. यासाठी तुम्ही सतत जुने मेल्स स्क्रोल करत बसता, पण तो सापडत नाही. खूप वेळ यात निघून जातो. पण जीमेलची एक खास ‘सिक्रेट ट्रिक’ …

Read More »

फेसवॉशचा योग्य वापर कसा करावा?

तोंड धुण्यासाठी साधा पाणीपुरताच पुरेसा नाही, कारण आपल्या त्वचेवर दिवसभर धूळ, घाम, तेल आणि प्रदूषणाचे थर बसतात. त्यामुळे चेहरा स्वच्छ, तजेलदार आणि निरोगी ठेवण्यासाठी योग्य फेसवॉशची निवड करणे गरजेचे आहे. फेसवॉशचे महत्त्व फेसवॉश हा केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित नाही, तर तो त्वचेची खोलवर निगा राखतो. योग्य फेसवॉशमुळे — चेहर्‍यावरील अतिरिक्त तेल आणि घाण दूर होते. मुरूमांची समस्या नियंत्रणात राहते. त्वचा तजेलदार …

Read More »

माणसांप्रमाणे प्राण्यांनादेखील पडतात स्वप्ने!

स्वप्न पडणे ही सामान्य गोष्ट आहे. जवळपास प्रत्येक मनुष्याला हा अनुभव येतो. पण माणसाप्रमाणे प्राण्यांनादेखील स्वप्न पडतात, असे संशोधनातून समोर आले आहे. अनेक महान तत्त्वज्ञानी, शास्त्रज्ञांनीदेखील यावर भाष्य केले आहे. प्राण्यांना स्वप्न कसे पडते, स्वप्न पडताना त्यांच्या शारीरिक हालचाली कशा असतात आणि याबाबत विज्ञान काय सांगते, ते लक्षवेधी आहे. केंब्रिज युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलेले संशोधन आणि जगभरात झालेल्या वेगवेगळ्या अभ्यासात प्राण्यांना …

Read More »

अश्वेत अभिनेत्याची यशोगाथा

सिडनी पॉइटियर हे बहामासमधील हॉलिवूड अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक होते. वर्ण किंवा रंग माणसाच्या यशाच्या आड येऊ शकत नाही, याचा वस्तुपाठ म्हणजे त्यांचा जीवनसंघर्ष. १९६४ मध्ये ‘लिलीज ऑफ द फील्ड’ या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा अकादमी पुरस्कार (ऑस्कर ) मिळवणारे ते पहिले आफ्रिकन अमेरिकन होते. पण त्यांना हे यश सहजासहजी मिळाले नाही. यासाठी त्यांना अनेक अडथळे आणि निराशेवर मात करावी …

Read More »

वृक्षारोपणाचा नको दिखावा

वृक्षारोपण हा आता उत्साही कार्यक्रम झाला आहे. ज्या उत्साहात वृक्षारोपण केले जाते तेवढे त्या रोपांच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष केले जाते. मग पुन्हा पुढच्या वर्षी उत्साहात वृक्षारोपण केले जाते. मानव इतर सजीवांपेक्षा बुध्दिमान असला तरी तोसुध्दा पर्यावरणाचाच एक घटक आहे. नैसर्गिक पर्यावरणात बदल घडवण्याची क्षमता केवळ आहे. मानवाकडेच त्यामुळे पर्यावरणातील प्रत्येक घटकाचे संरक्षण करणे व त्याचा काळजीपूर्वक वापर करणे मानवाचे आद्यकर्तव्य आहे. …

Read More »

कोठडीतील मृत्यू कधी थांबणार?

सध्या तमिळनाडूत एका तरुणाचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्याचे प्रकरण गाजत आहे. या घटनेने पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर कायदा आणि पोलिस यंत्रणेच्या कामकाजाच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले गेले. हा प्रकार शिवगंगा जिल्ह्यातील आहे. ही घटना केवळ एका व्यक्तीचा मृत्यू नसून पोलिस यंत्रणेत कार्यरत असलेल्या काही जणांची मानसिकता आणि न्यायदान प्रक्रिया याकडे अंगुलीनिर्देश करणारी आहे. अजितकुमार नावाच्या एका तरुणाला कथित चोरीप्रकरणात कोणत्याही …

Read More »

अंतराळवीर शुभांशू शुला पृथ्वीवर परतले

भारतीय अंतराळवीर शुभांशु शुला आपल्या ऐतिहासिक अंतराळ यात्रेनंतर मंगळवारी दुपारी पृथ्वीवर परतले आहेत. देशाच्या या यशस्वी सुपुत्राचे स्वागत करण्यासाठी १४० कोटी भारतीय डोळे लावून बसले होते. त्यांचे ड्रॅगन अंतराळयान कॅलिफोर्नियाच्या किनार्‍यावर उतरले आहे. शुभांशू हे सुमारे १८ दिवस अवकाशात होते, या काळात त्यांनी अनेक प्रयोगही केले. शुभांशू शुला हे २५ जून रोजी फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटर येथून फाल्कन ९ …

Read More »

दुर्गरत्नांवर जागतिक मोहोर

मराठेशाहीच्या समृद्ध आणि जाज्वल्य इतिहासाचे साक्षीदार असणारे गडकिल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सामरीक रणनीतीचे, दूरदृष्टीचे आणि तत्कालीन अतुलनीय स्थापत्यकलेचे प्रतीक आहेत. अलीकडेच युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत १२ ऐतिहासिक मराठा किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आहे. अनेक इतिहासकारांनी या भुईकोटांविषयी, जलदुर्गांविषयी समृद्ध लेखन केले आहे. परंतु त्याचा आधार घेत दुर्गपर्यटनाला चालना देण्याचे प्रयत्न फारशा प्रभावीपणाने झाले नाहीत. आता युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या …

Read More »

रोजगाराची चिंता आणि निधीची मर्यादा

भारतासारख्या प्रचंड मनुष्यबळ असलेल्या देशात रोजगार हा कळीचा मुद्दा आहे. शहर आणि ग्रामीण भागात राहणार्‍या स्थानिकांना रोजगार मिळणे दिवसेंदिवस जिकिरीचे होत असल्याने प्रसंगी कामासाठी स्थलांतर करण्याचीही वेळ काहींवर येते. पण स्थलांतर रोखणारी केंद्र सरकारची मनरेगा योजना अतिशय उपयुक्त असून कोरोना काळात या योजनेने ऐतिहासिक कामगिरी केली. मात्र योजनेवरचा वाढता खर्च पाहता केंद्र सरकारने खर्चाची मर्यादा आखून दिली. अशा वेळी रोजगाराची …

Read More »

ऋषभ शेट्टीचा खतरनाक लुक

दाक्षिणात्य अभिनेता ऋषभ शेट्टीच्या ’कांतारा: चॅप्टर १’ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आज वाढदिवसानिमित्त त्याने चाहत्यांना सरप्राइज दिले आहे. बहुप्रतिक्षित ’कांतारा: चॅप्टर १’चा जबरदस्त पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये ऋषभ शेट्टीचा रूद्र अवतार पाहायला मिळत आहे. यामध्ये हातात शस्त्र घेऊन ऋषभ खूपच आक्रमक दिसत आहेत.निर्मात्यांनी आपल्या अधिकृत सोशल मिडिया हँडलवरून ’कांतारा: चॅप्टर १’चे नवीन पोस्टर शेअर करून …

Read More »