सध्या शाहरुख खानच्या ‘किंग’ चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. गेल्याच आठवड्यात या चित्रपटात शाहरुखसोबत दीपिका पदूकोण काम करणार असल्याची बातमी झळकली. आता या चित्रपटात अनिल कपूरही काम करणार असल्याची माहिती पुढे आली आहे. सिध्दार्थ आनंदचा ‘किंग’ अनेक अर्थाने वेगळा चित्रपट ठरणार आहे. यात शाहरुख सोबत त्याची कन्या सुहानासुध्दा दिसणार आहे. अभिषेक बच्चन आणि शाहरुख पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. अरशद …
Read More »ओटीटीचं बदलतं स्वरूप
मनोरंजनाचे नवीन माध्यम असलेल्या ओटीटीबाबत अशी प्रतिमा तयार झाली होती की, या प्लॅटफॉर्मवर केवळ गुन्हेगारी कथाच दाखवल्या जातात. काही वर्षांपर्यंत ही बाब खरेही वाटली. मात्र, जेव्हा प्रेक्षक कंटाळू लागले, तेव्हा यात बदल घडवून आणला गेला. आता ओटीटीवर सामाजिक पार्श्वभूमीवर तयार झालेल्या कथा आणि नातेसंबंधांचं गुंतागुंतीचं जाळं अधिक दाखवलं जात आहे. प्रेक्षकांना ओटीटीचं हे नवं रूप आवडू लागलं आहे. ‘राजश्री’ची पहिली …
Read More »एआय आणि पालकत्व
जच्या डिजिटल युगात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सची चर्चा सर्वदूर होत आहे. आज अनेक जण त्याचा वापरही करत आहेत आणि लाभही घेत आहेत. पण आपण पालकत्वासंदर्भात या नवतंत्रज्ञानाकडे कधी पाहिले आहे का? नसेल ना? वास्तविक, योग्य प्रकारे वापर केल्यास एआयची संगोपनादरम्यान खूप मोठी मदत होऊ शकते. अर्थात त्यावर पूर्णपणे अवलंबून राहणे टाळणे गरजेचे आहे. कसा करता येईल उपयोग? १. शिक्षण …
Read More »स्वच्छता पर्सची
पर्स ही फक्त एक अॅसेसरी नसून आपल्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. पैसे, कार्ड्स, मोबाइल, मेकअप प्रॉडट्स, पेन, बिल्स यांसह इतर आवश्यक वस्तू आपण पर्समध्ये ठेवतो. त्यामुळे वेळोवेळी पर्सची साफसफाई करणे आवश्यक आहे. स्वच्छ आणि नीटनेटकी पर्स केवळ आकर्षक दिसत नाही, तर तिचा उपयोग करतानाही आपल्याला सोयीचे ठरते. सोपे उपाय पर्समधील सर्व वस्तू बाहेर काढा आणि गरजेच्या आणि न …
Read More »बुरशीपासून विमानइंधन!
जेट विमानांच्या इंधनाबाबतही वेळोवेळी नवेनवे संशोधन होत असते. त्यामध्ये काही भन्नाट प्रकारही असतात. सडकी फळे, माती व कुजणारी पाने यांच्यावर नेहमी आढळणार्या काळ्या बुरशीपासून जेट विमानाचे इंधन तयार करण्याचा मार्ग अमेरिकी वैज्ञानिकांनी शोधून काढलेला आहे. त्यामुळे विमानांसाठी किफायतशीर इंधन तयार करणे भविष्यात शक्य होणार आहे. अतिशय आश्वासक असे हे संशोधन आहे, असे वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक बिरगिट एरिंग यांनी सांगितले. …
Read More »बिरदेवची संघर्षगाथा
खांद्यावर घोंगडे, डोयावर टोपी, पाणी पिण्यासाठी लोकरीचा काचोळा काखेत मारून पायात जाडजूड पायतान, मेंढ्या चारण्यासाठी रानोमाळ भटकंती, वर आभाळखाली धरती हेच आपले घर माणून जीवन कंठणार्या एका मेंढपाळाच्या मुलाने अथक प्रयत्नातून आयपीएस अधिकारी होण्यापर्यंत मजल मारली आहे. मेंढरं राखणारा पोरगा आता सायब झाला म्हणत अख्या महाराष्ट्रानं त्याला अक्षरश: डोयावर घेतलंय. दोन प्रयत्नात अपयश आलं मात्र जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक अभ्यासाच्या …
Read More »विज्ञानयुगातील दीपस्तंभ
जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान लेखक डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचे वृद्धापकाळाने पुण्यातील निवासस्थानी निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने वैज्ञानिक आणि साहित्यिक जगतात मोठी पोकळी निर्माण झाली असून खगोलशास्त्रातील तेजस्वी तारा निखळल्याची भावना व्यक्त होत आहे. खगोलशास्त्रातील त्यांचे महत्त्वपूर्ण संशोधन आणि विज्ञानाचा सामान्यांपर्यंत प्रसार करण्याचे कार्य कायम स्मरणात राहील. डॉ. नारळीकर हे ‘हॉईल-नारळीकर सिद्धांत’ मांडणारे एक थोर भौतिकशास्त्रज्ञ …
Read More »अपरिपक्वपणाचे दर्शन
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’चा पुढचा टप्पा म्हणून केंद्र सरकारने सात शिष्टमंडळे जगभरात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये निवडल्या गेलेल्या प्रतिनिधींवरुन सुरू झालेले राजकारण दुर्दैवी म्हणावे लागेल. यामध्ये दोन्ही बाजूंनी खुल्या मनाचा अभाव दिसतो. दोघेही याप्रसंगी मोठेपणा दाखवू शकले नाहीत. यावरुन असे दिसते की, राजकीय मतभेद आता मनभेदात रूपांतरित झाले आहेत. ही बाब देशासाठी चांगली नाही. अशा प्रकारची प्रतिनिधिमंडळे …
Read More »दंड झाले उदंड
वाहतुकीचा एकही नियम कधीच मोडला नाही, अशी व्यक्ती शोधून सापडेल का? जाणूनबुजून नसेल; पण नकळत का होईना आपल्या हातून कधी ना कधी, कोणत्या ना कोणत्या नियमाचं उल्लंघन होतंच. आपल्यामुळं कुणाला त्रास होऊ नये, कुणाचं नुकसान होऊ नये, कुणाच्या जिवाला धोका निर्माण होऊ नये, असा विवेकी विचार प्रत्येकानं केला असता तर नियम आणि कायद्यांची गरजच उरली नसती. रस्त्यांवरच्या अपघातांत दरवर्षी किती …
Read More »छत्तीसगडमध्ये २७ नक्षली ठार
छत्तीसगडमधील बिजापूर परिसरात बुधवारी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठ्या चकमकीला सुरुवात झाली आहे. दंतेवाडा, नारायणपूर, विजापूर आणि कोंडागाव जिल्ह्यांच्या सीमेवर जंगलात ही चकमक झाली. अबूझमाड परिसरातील या चकमकीत २७ नक्षलवादी मारले गेले आहेत. त्यात सीपीआय (माओवादी) चा सरचिटणीस नंबला केशव राव, ज्यांना बसवराजू म्हणून ओळखले जाते, ते २६ इतर नक्षलवाद्यांसह ठार झाले, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली. …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र