पर्स ही फक्त एक अॅसेसरी नसून आपल्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. पैसे, कार्ड्स, मोबाइल, मेकअप प्रॉडट्स, पेन, बिल्स यांसह इतर आवश्यक वस्तू आपण पर्समध्ये ठेवतो. त्यामुळे वेळोवेळी पर्सची साफसफाई करणे आवश्यक आहे. स्वच्छ आणि नीटनेटकी पर्स केवळ आकर्षक दिसत नाही, तर तिचा उपयोग करतानाही आपल्याला सोयीचे ठरते.
सोपे उपाय
पर्समधील सर्व वस्तू बाहेर काढा आणि गरजेच्या आणि न गरजेच्या वस्तूंची छाननी करा.
वापरात नसलेली जुनी बिल्स, रिकामे रॅपर्स, न वापरणारी कार्डस्, जुनी टिकल्यांची पाकिटे, खराब झालेल्या ईअरबडस्, तुटके नेलपॉलिश यासारख्या अनावश्यक वस्तू बाजूला ठेवा.
आता नेहमी लागणार्या वस्तू पुन्हा ठेवण्यासाठी विभागणी करा.
आतील स्वच्छता : कापडी किंवा लेदर पर्स असल्यास हलया ओल्या कापडाने आतून पुसून घ्या.
पर्सच्या वरील बाजूस किंवा आतील बाजूस डाग पडले असतील, तर माईल्ड साबण किंवा लेदर लिनर वापरा.
जर धूळ साचली असेल, तर हलया ब्रशने किंवा कोरड्या कपड्याने साफ करा.
कापडी पर्स असल्यास गरजेनुसार सौम्य डिटर्जंटने हलया हाताने धुवा आणि सावलीत वाळवा. वॉशिंग मशीनमध्ये टाकण्यापूर्वी लेबलवरील सूचना वाचा.
लेदर पर्ससाठी स्पेशल लेदर लीनर किंवा वाईप्स वापरा.
सिंथेटिक पर्ससाठी कोमट पाण्यात कापड भिजवून पुसा.
पर्समधून घाण वास येत असेल, तर पर्समध्ये बेकिंग सोडा असलेला पाउच ठेवा. याखेरीज टी बॅग किंवा सुकं फुलं ठेवल्यास सुगंध येतो. याखेरीज चारकोल पाउच ठेवल्यास ओलावा आणि दुर्गंधी दूर होते.
नीटनेटकी पर्स
पर्समध्ये कार्डस् ठेवण्यासाठी कार्ड होल्डर वापरा.
सुटे पैसे एका लहान पाकिटात किंवा छोट्याशा पर्समध्ये ठेवा.
मेकअप वस्तूंसाठी वेगळा झिपर पाउच ठेवा.
मोबाइल, चाव्या, हेडफोन व्यवस्थित ठेवा, जेणेकरून सहज शोधता येतील.
हे विसरु नका :
आठवड्यातून एकदा पर्समधील अनावश्यक वस्तू बाहेर काढा.
महिन्यातून एकदा पर्स व्यवस्थित स्वच्छ करा.
गरजेपेक्षा जास्त गोष्टी पर्समध्ये ठेऊ नका, त्यामुळे वजन वाढते आणि गोंधळ होतो.
पर्स जास्त दिवस टिकवण्यासाठी ती गरम किंवा ओलसर ठिकाणी ठेवू नका.
Check Also
लहान मुलांना लिहिण्यास शिकवण्याची योग्य पध्दत
लहान मुलांना लिहिण्यास शिकवणे हे पालकांसाठी मोठे आव्हान असते. अनेकदा पालक थेट अक्षरे गिरवण्यापासून सुरुवात …
पांचजन्य वृत्तपत्र