जच्या डिजिटल युगात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सची चर्चा सर्वदूर होत आहे. आज अनेक जण त्याचा वापरही करत आहेत आणि लाभही घेत आहेत. पण आपण पालकत्वासंदर्भात या नवतंत्रज्ञानाकडे कधी पाहिले आहे का? नसेल ना? वास्तविक, योग्य प्रकारे वापर केल्यास एआयची संगोपनादरम्यान खूप मोठी मदत होऊ शकते. अर्थात त्यावर पूर्णपणे अवलंबून राहणे टाळणे गरजेचे आहे.
कसा करता येईल उपयोग?
१. शिक्षण आणि बौद्धिक विकास ः बायजूज, गुगल लेन्स, ड्युओलिंगो यांसारखे एआय आधारित अॅप्स मुलांना त्यांच्या गतीनुसार शिकण्याची संधी देतात.
व्हर्च्युअल ट्यूटर एआयच्या मदतीने गणित, विज्ञान, भाषा आणि इतर विषय सोपे होऊ शकतात.
एआयच्या साहाय्याने चालणारे कथा वाचन अॅप्स आणि स्मार्ट गेम्स मुलांची विचारशक्ती वाढवू शकतात.
२. वेळेचे नियोजन आणि शिस्त
गुगल असिस्टंट, अॅलेक्सा, सिरी यांसारखे एआय साहाय्यक पालकांना वेळेचे नियोजन करण्यात मदत करू शकतात.
झोपेच्या वेळा, अभ्यासाचे वेळापत्रक आणि खेळण्याचा वेळ ठरवण्यासाठी या अॅप्सचा वापर करता येऊ शकतो. एआय-सक्षम स्मार्ट घड्याळे आणि रिमाइंडर अॅप्स दैनंदिन कामे वेळेवर पूर्ण करण्यास मदत करतात.
३. मुलांची ऑनलाइन सुरक्षा आणि गोपनीयता
एराय आधारित पालक नियंत्रण (पेरेंट कंट्रोलिंग) अॅप्स वापरून मुलांचे इंटरनेटवरचे कंटेंट फिल्टर करता येऊ शकतात. बार्क, नॉर्टन फॅमिली यांसारखे एआय आधारित सायबर सिक्युरिटी पर्याय मुलांच्या ऑनलाइन सुरक्षिततेसाठी मदत करतात.
सोशल मीडियावर किती वेळ घालवायचा यावर नियंत्रण ठेवण्यासाठीही एआय टूल्सचा वापर होऊ शकतो.
४. पालकांसाठी माहिती आणि मार्गदर्शन
एआयच्या मदतीने पालकत्व विषयक व्हिडीओ आणि टिप्स सहज उपलब्ध होतात.
मुलांचे वाढीचे टप्पे समजून घेण्यासाठी आणि योग्य निर्णय घेण्यासाठी एआय मदत करू शकते. इतकेच नव्हे तर एआय आधारित मूड ट्रॅकिंग अॅप्स मुलांच्या भावनिक स्थितीवर नजर ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.
पालकांनी घ्यायची काळजी
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे फायदे कितीही असले तरी त्यावर पूर्णपणे विसंबू नका. कारण उत्तम संगोपनासाठी मानवी संवाद आणि शिकवण महत्त्वाची आहे.
एआय आधारित उपकरणे आणि अॅप्स वापरताना मुलांचा डेटा सुरक्षित आहे याची खात्री करा.
एआय आणि स्क्रीन टाईमवर नियंत्रण ठेवा, जेणेकरून मुलांचे सामाजिक कौशल्य वाढेल.
मुलांसोबत एआय वापरण्याऐवजी प्रत्यक्ष संवाद वाढवा आणि त्यांच्यासोबत वेळ घालवा.
थोडक्यात,एआय पालकांसाठी मदतीचा हात ठरू शकते; पण प्रेम, संवाद, मैदानी खेळ आणि संस्कार यामुळेच मुलांचा सर्वांगीण विकास होतो. त्यामुळे तंत्रज्ञान आणि वास्तव जीवन यामध्ये योग्य संतुलन ठेवा!
Check Also
लहान मुलांना लिहिण्यास शिकवण्याची योग्य पध्दत
लहान मुलांना लिहिण्यास शिकवणे हे पालकांसाठी मोठे आव्हान असते. अनेकदा पालक थेट अक्षरे गिरवण्यापासून सुरुवात …
पांचजन्य वृत्तपत्र