भारतामध्ये लाखो लोक दुर्लभ आजारांनी त्रस्त आहेत. हे आजार बहुतांश वेळा अनुवंशिक म्हणजे आपल्या जनुकांमधील बदलांमुळे होतात. डॉटर आणि वैज्ञानिक सांगतात की जर एखाद्या व्यक्तीच्या जनुकामध्ये बदल झाला (त्याला म्युटेशन म्हणतात) तर त्याचा परिणाम पुढील पिढ्यांवरही होऊ शकतो. आपल्या देशात बहुतेक ठिकाणी लोक आपल्याच जात, धर्म किंवा समुदायामध्ये विवाह करतात. यामुळे नवीन रक्तसंबंध येत नाहीत आणि त्या समुदायामध्ये काही ठराविक …
Read More »TimeLine Layout
August, 2025
-
23 August
विरोधकांनी विधेयक फाडले
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत संविधान १३०वी दुरुस्ती विधेयक- २०२५, केंद्रशासित प्रदेश सरकार (दुरुस्ती) विधेयक-२०२५ तसेच जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना (दुरुस्ती) विधेयक, २०२५ सादर केले. या विधेयकांवर लोकसभेत जोरदार गोंधळ झाला. सरकारने गंभीर गुन्हेगारी आरोपांमुळे अटक किंवा कोठडीत असलेल्या व्यक्तींना पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, किंवा केंद्रशासित प्रदेशातील मुख्यमंत्री/मंत्री पदावरून हटवण्याची तरतूद या विधेयकांद्वारे करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या विधेयकाची प्रत …
Read More » -
23 August
मांगल्यदायी गणेशोत्सव
भाद्रपद शुल चतुर्थीच्या दिवशी मातीची गणेशमूर्ती तयार करून तिचे यथासांग पूजन करावे आणि वाहत्या पाण्यात ती मूर्ती विसर्जित करावी, असे शास्र सांगते. या व्रताला सिद्धिविनायक व्रत म्हटले जाते. हे व्रत जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी, अपकीर्ती निवारणासाठी, कीर्ती पुनःप्राप्तीसाठी केले जाते. कृष्णाला स्यमन्तक मणि चोरीच्या खोट्या आरोपातून मुक्त होण्यासाठी नारदांनी हे व्रत सांगितले होते. महाभारतातील युद्धकाळी कृष्णाने युधिष्ठिरालाही याच व्रताची शिकवण …
Read More » -
23 August
गरज आव्हानांचा थेट मुकाबला करण्याची
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शुल्क धोरणामुळे जगातील अर्थव्यवस्था धोयात आली आहे. अमेरिका फर्स्ट या नावाखाली ट्रम्प यांनी चालविलेली कुर्हाड अनेक देशांना घायाळ करत आहे तर काही देश चोखपणे उत्तर देण्यासाठी देखील सक्षम होत आहेत. परंतु अशा प्रकारचे धोरण राबविणारे ट्रम्प हे पहिलेच अध्यक्ष आहेत का. १९७०,८० आणि ९० च्या दशकांतही अध्यक्षांनी बचावात्मक धोरणापोटी काही देशांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला …
Read More » -
17 August
माफी असावी
स्पॅनिश चित्रपट ’चॅम्पियन्स’वर बेतलेल्या ’सितारें जमीं पर’ या चित्रपटाने जवळपास २६७ कोटींचा गल्ला जमवला. २० जुलैला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला ओटीटीवर प्रदर्शित न करता आमिर खानने तो यु-ट्युबवर प्रदर्शित केला. परंतु अनेक वापरकर्त्यांना पैसे देऊनही तो नीटसा पहाता आलेला नाही. त्यामुळे आमिर खानच्या वतीने माफी मागितली आहे. ’सितारें जमीं पर’ या चित्रपटासाठी अनेक ओटीटी कंपन्या उत्सूक होत्या. परंतु आमिर खानने …
Read More » -
17 August
अद्वितीय काजोल
साधारणतः १९७०च्या दशकात जया भादुरी या मुख्य प्रवाहातील चित्रपटसृष्टीत सहज अभिनयाचे उदाहरण म्हणून ओळखल्या जात असत. नव्वदीच्या दशकात या धाटणीमध्ये तनुजांची कन्या काजोल दाखल झाली. पन्नाशी पार करणारी काजोल आजही तशीच आहे, आरशाने काय सांगितले याकडे फारसे लक्ष न देणारी. ती एकमेवाद्वितीय आहे. काजोल भारतात इतर कुठल्याही अभिनेत्यापेक्षा जास्त भूमिका नाकारते. काजोलचा जिवलग मित्र करण जोहर सांगतो की, काजोल कधीच …
Read More » -
17 August
‘व्हॉटसअॅप’काराची यशोगाथा
जगातल्या संवादाच्या साधनांचा प्रवास जितका उत्कंठावर्धक आहे, तितकाच तो प्रेरणादायीही आहे. आज आपण सतत एकमेकांच्या संपर्कात राहू शकतो, कुठेही असलो तरी आपल्या प्रियजनांशी क्षणोक्षणी संवाद साधू शकतो, आणि हे शय झाले आहे स्मार्टफोन व मेसेजिंग अॅप्समुळे. या क्रांतीत जगातील सर्वाधिक लोकप्रिय मेसेजिंग अॅप ‘व्हॉट्सअॅप’चा सिंहाचा वाटा आहे. पण या अॅपमागची प्रेरणादायी कहाणी जितकी विलक्षण आहे, तितकीच भावस्पर्शीही आहे. ही कहाणी …
Read More » -
17 August
गुलाबजलद्वारे सौंदर्य प्रसाधने
गुलाब जल हे त्वचेसाठी अत्यंत लाभदायक मानले जाते. गुलाब जल लावल्याने चेहरा तजेलदार आणि स्वच्छ दिसतो. त्यामुळे पुरुष आणि स्त्रिया दोघेही याचा नियमित वापर करु शकतात. गुलाब जलाचा वापर करुन आपण घरच्या घरी स्किन केअर प्रॉडट्सही बनवू शकतो. गुलाबजल मिश्रीत ही नैसर्गिक सौंदर्य प्रसाधने कोणत्याही प्रकारच्या त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. यामुळे त्वचेचे आरोग्य टिकून राहते आणि नैसर्गिक चमक येते. सर्वांत महत्त्वाचे …
Read More » -
17 August
आरोग्यवर्धक ‘लाल सोने ’
जगातील सर्वात महागडा मसाला म्हणजे केशर. इराणमधून अतिशय चांगल्या दर्जाचे केशर जगभर निर्यात केले जात असते. आपल्याकडे काश्मीरमध्येही केशराची शेती होते. हे ‘लाल सोने’ स्वाद व सुगंधासोबतच आरोग्यासाठीही अतिशय लाभदायक असते. आहारात केशरचा नियमित समावेश केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते. केशरमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट गुणधर्म रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करू शकतात, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुरक्षित राहण्यास मदत होते, असे …
Read More » -
17 August
अफाट चिकाटी,अपार यश
जुलिया चाइल्ड यांना लहानपणापासूनच विविध प्रकारच्या पदार्थांची आवड होती. त्यांच्या नव्या प्रयोगांमुळे पदार्थ अत्यंत चविष्ट बनत. एकेदिवशी त्यांनी ठरवले की त्यांनी शोधून काढलेल्या रेसिपी प्रत्येक महिलांपर्यंत पोहोचायला हव्यात. त्यांनी आपल्या दोन महिला सहकार्यांसोबत मिळून एका पुस्तकाची योजना आखली. त्या पुस्तकाचे शीर्षक ठेवले ‘फ्रेंच कुकिंग फॉर द अमेरिकन किचन’ सहकार्यांसोबत त्यांनी दिवस-रात्र मेहनत करून त्या पुस्तकावर पाच वर्षेकाम केले आणि ते …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र






