लेख-समिक्षण
  • 9 august 2026

अंक मिळणेसाठी


एकूण वाचक संख्या : 4212

TimeLine Layout

August, 2025

  • 31 August

    लाडया बाप्पांचे आगमन

    राज्यात बुधवारी गणेश चतुर्थीनिमित्त गणेशोत्सवाचा पहिला दिवस मोठ्या जल्लोषात साजरा झाला असून ढोल-ताशांच्या गजरात आणि पारंपरिक वाद्यांच्या निनादात लाडया बाप्पांचे आगमन ठिकठिकाणी झाले. त्यानिमित्ताने घराघरांत तसेच विविध गणेश मंडळांत उत्साह ओसंडून वाहतो आहे. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’, असा गजर करीत मानाच्या गणपतींच्या मिरवणुका काढण्यात आल्या. वाजत-गाजत गणरायांच्या आगमनाने भाविक भक्तिभावात न्हाऊन निघाले आहेत. राज्याची उपराजधानी नागपूरमधील संती गणपतीची सकाळी …

    Read More »
  • 31 August

    राहुल-तेजस्वींची यात्रा फलदायी ठरेल?

    बिहारमध्ये येणार्‍या काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी रंगणार आहे. या निवडणुकांची पूर्वतयारी सध्या जोमाने सुरू असून सत्ताधारी आणि विरोधक दोघेही बिहारी जनतेला आपल्याकडे खेचून घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. काँग्रेस पक्षाने गेल्या काही वर्षांत बिहारमधील जनाधार मोठ्या प्रमाणावर गमावला आहे. तो पुन्हा मिळवण्यासाठी आणि ‘इंडिया’ आघाडीला बळकटी देण्यासाठी राहुल गांधी यांनी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासोबत ‘मतदार अधिकार यात्रे’स …

    Read More »
  • 31 August

    एआय आणि भारतीय निवडणुकीचे भवितव्य

    आर्टिफिशियल इंटिलिजन्स हळूहळू भारत आणि जगातील निवडणुकीच्या प्रक्रियेवर परिणाम करत आहे. त्याचा वाढता प्रभाव पाहता एआय शाप की वरदान याभोवती चर्चा फिरत आहे. आजघडीला विविध क्षेत्रात एआयचा वापर वाढलेला असताना निवडणूक प्रक्रिया देखील त्यापासून अपवाद राहिली नाही. या माध्यमातून राजकीय पक्ष, उमेदवार हे मतदारांना आकर्षित करत आहेत आणि त्यांना आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. आगामी बिहार विधानसभा निवडणुकीत एआयचा …

    Read More »
  • 23 August

    ‘महावतार नरसिंम्हा कसा बनला?

    जुलै महिन्यात रिलीज झालेल्या महावतार नरसिंह या अ‍ॅनिमेटेड सिनेमाने नवा इतिहास रचत बॉस ऑफिसवर धूमाकूळ घातला. कालच कुली आणि वॉर २ हे मोठे सिनेमे रिलीज झाले आहेत. मात्र, महावतार नरसिंह सिनेमाचे शो सुरू आहेत. हा सिनेमा आजवरचा सर्वाधिक कमाई करणारा अ‍ॅनिमेटेड सिनेमा ठरला आहे. पण सिनेमा तयार करण्यामागे घेण्यात आलेली मेहनत आणि आलेल्या संकटांना कशा पद्धतीने तोंड दिलं याविषयी या …

    Read More »
  • 23 August

    आठवणी ‘शोले’च्या

    बॉलिवुडमधील सर्वात लोकप्रिय आणि यशस्वी चित्रपट म्हणून रमेश सिप्पी यांच्या ‘शोले’ चित्रपटाचा उल्लेख करावा लागतो. या चित्रपटाच्या प्रदर्शनास पन्नास वर्षे पूर्ण झाली. आजही या चित्रपटातील पात्र, गाणे, संवाद, दृश्य प्रेक्षकांच्या मनावर कोरली गेली आहेत. तीन कोटी रुपयांत तयार झालेल्या चित्रपटाचे प्रारंभिक बजेट एक कोटी रुपये होते. मात्र या चित्रपटाने तत्कालिन काळात ३५ कोटी रुपयांची कमाई केली. मुंबईतील मिनर्व्हा टॉकीजमध्ये सलग …

    Read More »
  • 23 August

    केवळ पदवी पुरेशी नाही…

    काही दशकांपूर्वी ‘बी.टेक.’ पदवीला विशेष महत्त्व होते. विशेषतः कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.टेक. पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना त्वरित आकर्षक नोकर्‍या मिळत असत. पण आजचे जॉब मार्केट पूर्णपणे बदलला आहे. तंत्रज्ञानातील वेगवान बदल, कृत्रिम बुद्धिमत्तेची क्रांती आणि डिजिटल स्पर्धा यामुळे केवळ पदवी मिळवणे पुरेसे राहिलेले नाही. या बदलत्या परिस्थितीत इंजिनिअर्सना त्यांच्या व्यावहारिक कौशल्ये, सर्जनशीलता आणि समस्या सोडवण्याच्या क्षमतेवर अधिक भर द्यावा लागणार आहे. याच …

    Read More »
  • 23 August

    ‘पक्ष्यांच्या ताई’चा सन्मान

    ’टाइम’ मासिकाने विविध क्षेत्रांतील १३ महिलांची ’वूमन ऑफ द इयर’ या प्रतिष्ठित यादीत निवड केली असून, २०२५च्या यादीत समाविष्ट असलेल्या एकमेव भारतीय महिला म्हणजे पौर्णिमा देवी बर्मन. पर्यावरण संवर्धनासाठी समर्पित कार्य पौर्णिमा देवी बर्मन या आसाममधील प्रख्यात पर्यावरणतज्ज्ञ आणि वन्यजीव संशोधक आहेत. त्या विशेषतः मोठ्या आकाराच्या ’हारगिला’ (ग्रेटर अडज्युटंट स्टॉर्क) या दुर्मिळ पक्ष्यांच्या संवर्धनासाठी ओळखल्या जातात. मानवी हस्तक्षेपामुळे नामशेष होण्याच्या …

    Read More »
  • 23 August

    रोज दाढी करावी का?

    फॅशन आणि ट्रेंडचे शौकीन असलेले लोक अनेकदा वेगवेगळ्या प्रकारच्या दाढी ठेवतात आणि त्यांच्या आवडीनुसार त्याला शेप देतात. अनेकांना साबणाच्या वडीसारखा क्लीन-शेव्ह लूक आवडतो, तर काही लोक त्यांच्या शरीराच्या प्रकारानुसार आणि व्यवसायानुसार दाढी ठेवतात. काही लोकांना दररोज सकाळी दाढी करणे आवडते, तर काही लोक महिनाभरही दाढी करत नाहीत. दाढी करणे ही बर्‍याच लोकांसाठी सामान्य गोष्ट आहे; परंतु यामुळे प्रश्न निर्माण होतो. …

    Read More »
  • 23 August

    गांधीजी आणि करचोरी

    महात्मा गांधी नेहमीच सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर चालण्याचे सांगत असत. पण धावपळीच्या जीवनात ही तत्त्वे फक्त बोलण्यापुरतीच राहतात. प्रत्यक्ष आयुष्यात त्यांची अंमलबजावणी करणं कठीण वाटतं. मात्र, जर आपण ती मनापासून जगलो, तर ती आपलं संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकतात. याचं एक प्रत्यक्ष उदाहरण गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत दाखवून दिलं होतं. गांधीजी त्या काळी दक्षिण आफ्रिकेत वकिली करत होते. एके दिवशी त्यांच्याकडे …

    Read More »
  • 23 August

    जलतांडवाच्या झळा

    हवामानाची स्वतःची एक गती असते आणि सामान्य परिस्थितींमध्ये तो परिसंस्थेच्या चक्राला टिकवून ठेवण्याचा एक आवश्यक भाग असतो. पण गेल्या काही काळापासून हवामानाच्या चक्रात झपाट्याने बदल नोंदवला जात आहे. विशेषतः पावसामुळे होणार्‍या तडाख्यांमुळे स्थिती चित्र अधिकच बिघडत चालली आहे. प्रत्येक वर्षी संपूर्ण मान्सूनच्या हंगामात पावसामुळे देशाचे बहुतेक भाग कमीअधिक प्रमाणात प्रभावित होतात, पण आता आपत्तींची एक अखंड मालिकाच सुरू झाल्यासारखी स्थिती …

    Read More »