लेख-समिक्षण

ध्येयप्राप्तीसाठी डार्विनचा संदेश

कोणतीही मोठी कलाकृती उभी राहिली किंवा आकाराला आली की लोक तिची प्रशंसा करतात. त्यातील गहन अर्थ शोधतात, तिच्या भव्यतेला सलाम करतात. पण बहुतेकदा त्या कलाकृतीच्या निर्मिती प्रक्रियच्या तळाशी जाऊन वेध घेत नाहीत. खरे म्हणजे तो वेध घेतला असता अत्यंत मोलाची सूत्रे आपल्याला मिळतात. चार्ल्स डार्विन यांच्या महान ग्रंथाची कहाणी अशीच मौलिक विचार देणारी आहे. चार्ल्स डार्विन यांनी आपल्या महान ग्रंथ …

Read More »

ब्राह्मोसचा थरार

पाकिस्तानचा प्रत्येक इंच आता ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राच्या टप्प्यात आला आहे. त्यामुळे दहशतवादी त्या देशात कोठेही लपले तरी त्यांना टिपण्याची क्षमता या क्षेपणास्त्राची आहे असे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी म्हटले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या विरोधात चालवलेले ‘ऑपरेशन सिंदूर अभियान’ केवळ एक ट्रेलर आहे. हे अभियान संपविण्यात आलेले नाही. ते केवळ तात्पुरते स्थगित केले आहे. कारण या अभियानाचा आतापर्यंतचा उद्देश सफल झालेला आहे …

Read More »

रेड्डी सरकारला चपराक

स्थानिक निवडणुकीवर लक्ष स्थानिक स्वराज निवडणुकीचे वेळापत्रक रेंगाळण्याबरोबरच आरक्षणाचा वाद आता राजकीय डावपेचाचा भाग ठरला. जातनिहाय सर्वेक्षण आणि सामाजिक न्याय देण्याचे आश्वासन देत सत्तेवर आलेल्या काँग्रेसला या निमित्ताने ओबीसीचे पाठबळ मिळवण्याची संधी मानली जात आहे. दुसरीकडे पराभवाच्या धयातून बीआरएस अजूनही सावरलेली नसताना या आदेशाचा आधार घेत रेड्डी सरकारवर हल्ला करण्याची संधी साधली जात आहे. यादरम्यान भाजप ओबीसीमध्ये मागास मुस्लिमांना सामील …

Read More »

६४८ कोटींचा आणखी निधी मंजूर

राज्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे अनेक जिल्ह्यांतील शेती, घरे, पायाभूत सुविधा आणि रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर बाधितांना मदतीचा ओघ सुरूच असून राज्य सरकारकडून ६४८ कोटी रुपयांचा आणखी निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापूर्वी, राज्य सरकारने अतिवृष्टी आणि पूरबाधित शेतकर्‍यांसाठी ३१ हजार ६६५ कोटींचे मदत पॅकेज जाहीर केले आहे राज्य सरकारने ६४८ कोटी रुपयांच्या वितरणाला …

Read More »

महिलाहितैषी पाऊल

कर्नाटक सरकारने महिलांच्या आरोग्याचा विचार करत एक महत्त्वाचा निर्णय अलीकडेच घेतला. काम करणार्‍या सर्व महिलांना दर महिन्याला एक दिवस पीरियड लीव मिळणार आहे. ही सुट्टी सरकारी कार्यालयाबरोबरच खासगी कंपनी, वस्त्रोद्योग, आयटी सेटर आणि मल्टीनॅशनल कंपन्यात काम करणार्‍या महिलांना मिळणार आहे. या निर्णयामागचा उद्देश महिलांच्या आरोग्यास प्राधान्य आणि कामाकाजाच्या ठिकाणी सुलभता देण्याचा आहे. भारताच्या काही राज्यांत पूर्वीपासूनच पेड पीरियड लीवची तरतूद …

Read More »

आयात डाळीचे संकट

भारत हा जगातील सर्वात मोठा डाळ उत्पादक देश आहे. जगातील एकूण डाळीच्या लागवडीपैकी तब्बल ३५.८७ टक्के क्षेत्र भारतात आहे. परंतु उत्पादनाच्या प्रमाणात आपला वाटा केवळ २७.४ टक्के इतकाच आहे. म्हणजेच लागवड जास्त, पण उत्पादन कमी. या तफावतीमुळे भारत जगातील सर्वात मोठा डाळ आयातदार बनला आहे. देशात डाळींचा सध्याचा उपभोग सुमारे २९ दशलक्ष टन इतका आहे, तर उत्पादन केवळ २५.२३८ दशलक्ष …

Read More »

रणबीर-राज्ाूचा चित्रपट आमिरमुळे लटकला

राजकुमार हिरानी आणि रणबीर कपूर यांचा चित्रपट अनिश्चित काासाठी लटकला आहे. राजकुमार आणि रणबीर कपूर पहिल्यांदाच एकत्र येत होते. मात्र दोघांच्या चाहत्यांची आता निराशा झाली आहे. आमिर खानमुळे हा चित्रपट लांबणार असल्याची माहिती आहे. ‘दादासाहेब फाळके’ यांच्या आयुष्यावर आधारीत असा चित्रपट तयार करण्याचा मानस राजकुमार हिरानी यांचा होता. त्यासाठी आमिर खानची निवड करण्यात आली. आमिर खानने या चित्रपटासाठी अनेक चित्रपट …

Read More »

रुपेरी पडद्यावरचा दीपोत्सव

भारतीय संस्कृतीत दिवाळी हा तेजाचा, चैतन्याचा, प्रकाशाचा उत्सव असून या सणाला सणसम्राज्ञी किंवा सणांची महाराणी म्हटले जाते. या सणाचे सामाजिक, धार्मिक आणि भावनिक पैलू जितके खोल, तितकाच त्याचा प्रभाव भारतीय चित्रपटसृष्टीवरही दिसून येतो. बॉलिवूडने गेल्या काही दशकांत दिवाळीच्या उत्सवाला केवळ पार्श्वभूमी म्हणून नव्हे तर एक कथानकाचे केंद्रस्थान म्हणूनही वापरले आहे. प्रत्येक काळात दिवाळीच्या प्रकाशात नातेसंबंधांची गुंतागुंत, कुटुंबातील बंध, प्रेम, पुनर्मिलन, …

Read More »

चटकदार मेयोनीज वापरताय?

बर्गर, मोमोज आणि सँडविचमध्ये लावले जाणारे मेयोनीज हा मुलाबाळांसह हल्ली सर्वांच्याच आवडीचा अन्नघटक म्हणून पुढे आला आहे. अर्थातच, पाश्चिमात्य देशांमधून आलेल्या फास्टफूड-जंकफूड कल्चरमधून याची चटक सर्वदूर वाढत चालली आहे. पण ते आरोग्यासाठी घातक असल्याचे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आता तर तमिळनाडू सरकारने ८ एप्रिल २०२५ पासून पुढील एक वर्षासाठी अंड्यापासून बनवलेल्या मेयोनीजवर बंदी घातली आहे. मेयोनीज हे मोठ्या प्रमाणावर लहानांपासून …

Read More »

कुर्तीमधील बहार

तरुणी असोत वा महिला, कॉलेजगोईंग असोत वा प्रोफेशनल, कुर्ती ही आजच्या काळातली सर्वांत लोकप्रिय फॅशन आहे. उन्हाळ्यामध्ये तर कुर्तीचा पेहराव आरामदायी, स्टायलिश आणि हटके लूक देणारा ठरतो. सामान्यतः महिला सलवार कमीज घालणं पसंत करतात, पण हटके आणि स्टायलिश लूकसाठी कुर्ती विविध प्रकारे टीमअप करून घालता येते. • सलवार कमीज विथ ट्विस्टकुर्ता आणि पटियाला सलवार हा कॉम्बो मुलींवर फारच सुंदर दिसतो. …

Read More »