सातारा जिल्ह्यातील फलटण येथील एका डॉटर महिलेवर अत्याचार करून तिला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा विषय सध्या गाजत आहे. या विषयामध्ये एका पोलीस अधिकार्याचा समावेश असल्यामुळे त्याला गांभीर्य निश्चितच प्राप्त झाले आहे. पण गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या इतर विविध घटनांवर नजर टाकली तर गुन्हे आणि गुन्हेगार यांची हिंसक आणि विकृत मानसिकता प्रकर्षाने समोर येताना दिसत आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एका बापाने आपल्या १४ …
Read More »अवलिया पियुषजी
भारतीय जाहिरात विश्वाचे प्रतिभावंत शिल्पकार अशी ओळख असणार्या अॅड गुरु पियुष पांडे यांनी नुकताच जगाचा निरोप घेतला. आपल्या कारकीर्दीमध्ये त्यांनी पाश्चिमात्य केंद्रीत जाहीरातींपासून जाहीरात विश्वाला दूर नेत, भारतीय दृष्टी आणि भावनिक आशय देण्याचा प्रयत्न केला. ‘मिले सुर मेरा तुम्हारा’सारख्या अजरामर ओळी लिहिणारे पियूष म्हणजे भावनांची शिकवण देणारे महान गुरु होते. माणूस म्हणून ते अतिशय भावूक स्वभावाचे होते. त्यांच्या बोलण्यातली वायं …
Read More »शेतकरी रस्त्यावर, नागपूर जाम
नागपूरने असे आंदोलन पहिल्यांदाच अनुभवले. शेतकर्यांच्या तीन दिवसांच्या शक्तिप्रदर्शनामुळे वर्धा रोडवर जाम लागला. त्यामुळे नागपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्या. अनेकांना शासकीय कामांसाठी कार्यालयांमध्ये पोहोचणे कठीण झाले. प्रहार जनशक्तीचे प्रमुख बच्चू कडू यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आदेश दिले. त्यांनी आपली भूमिका मांडली. आम्हाला न्यायालयाचा अपमान करायचा नाही. आमची इथून हटायला तयारी आहे. पण आमची …
Read More »कधी बदलणार मानसिकता?
देशातील सरकारी शाळांमध्ये मुलींची संख्या अधिक आणि मुलांची संख्या कमी असल्याचे, तर खाजगी शाळामध्ये मात्र याउलट चित्र असल्याचे केंद्र सरकारच्या ‘युडायस प्लस’च्या अहवालातून समोर आले आहे. ही बाब गंभीर असून असे घडण्यामागची कारणे समजून घेणे गरजेचे आहे. आपला समाज हा नेहमीच पुरूषप्रधान राहिला आहे. ती पुरूषप्रधान मानसिकता नष्ट व्हावी, समता प्रस्थापित व्हावी याकरीता शिक्षणातून मूल्यांचा विचार पेरला जाण्याची अपेक्षा आहे. …
Read More »आले फ्लाईंग कारचे युग
नवाच्या कल्पनाशक्तीने विज्ञानाला नेहमीच दिशा दिली आहे. शतकानुशतकं माणूस जमिनीवरून आकाशाकडे पाहत राहिला आणि त्या आकाशात झेप घेण्याचं स्वप्न पाहत राहिला. हेच स्वप्न प्रथम विमानांच्या रूपाने साकारले, आणि आता त्याच स्वप्नाचा पुढचा टप्पा म्हणजे ‘उडणारी कार’ किंवा ‘फ्लायिंग कार’. विज्ञानकथांमध्ये, चित्रपटांत आणि कल्पनारम्य कथांमध्ये आपण अशा कार पाहिल्या होत्या; पण आता त्या कल्पना प्रत्यक्ष वास्तवात उतरू लागल्या आहेत. आगामी काळात …
Read More »‘असंभव’च्या रहस्यमय पोस्टरने वाढवली उत्सुकता
टीझरने आधीच प्रेक्षकांच्या मनात कुतूहल निर्माण केलेल्या ‘असंभव’ या आगामी मराठी सस्पेन्स थ्रिलरच्या नव्या रहस्यमय पोस्टरमुळे पुन्हा एकदा चर्चेचे वण घेतले आहे. गडद लाल-काळ्या पार्श्वभूमी असलेले हे पोस्टर, नजरेतून जणू काही प्रश्न विचारत आहे की, ही कहाणी प्रेमाची आहे की सुडाची? सचित पाटील, मुता बर्वेआणि प्रिया बापट या तिघांचे भावदर्शी चेहरे, शांततेतली अस्वस्थता, आणि हलकं स्मित हे सगं गूढतेचे धागे …
Read More »वास्तववादी चित्रपटांची वानवा
चित्रपट हे मनोरंजनाचे अत्यंत प्रभावी माध्यम मानले जाते. परंतु मनोरंजनाचा अर्थ फक्त मन रमविणे, वेळ घालविणे इतकाच नसतो. प्रेमकथा, नाचगाणी आणि मारामारी यानंतर एखाद्या चित्रपटाचा सुखांत झाला की तेवढेच मनोरंजन असे होत नाही. जीवनाचे यथार्थ दर्शन, लोकांच्या वेदना, समाजातील सत्य आणि मानवी संघर्षाशी प्रेक्षकाला सामोरे नेणे हेही मनोरंजनाचे एक महत्वाचे अंग असते. सत्य दाखविणार्या चित्रपटांची कथानके म्हणूनच विशेष ठरतात, कारण …
Read More »समजून घ्या बिलिंग सायकल
आजच्या काळात महिला केवळ घर सांभाळत नाहीत, तर आर्थिक निर्णयांमध्येही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. खरेदी असो, शिक्षणाचा खर्च असो किंवा एखादं स्वप्न पूर्ण करायचं असो महिलांनी आता अर्थकारणावरही नियंत्रण ठेवायला सुरुवात केली आहे. आज अनेक महिला क्रेडिट कार्डचाही वापर करताहेत. हे एक अतिशय उपयोगी साधन आहे. पण, याच्या चुकीच्या वापराने तोटा होण्याचीही शक्यता असते. क्रेडिट कार्डच्या सुयोग्य वापरामध्ये बिलिंग सायकल …
Read More »वक्तशीर दीपिका
चित्रपटसृष्टीत दीपिका पदुकोण ही शिस्तप्रियतेसाठी ओळखली जाते. वेळेचं काटेकोर पालन, सेटवरचे वर्तन, ताणतणावातही शांत राहण्याची क्षमता हे सर्व तिच्या व्यावसायिक मूल्यांचे उदाहरण आहे. दीपिकाचे निवडलेले सिनेमे तिच्या संवेदनशीलतेची साक्ष देतात. ‘छपाक’ या चित्रपटात तिने अॅसिड हल्ल्यातून वाचलेल्या महिलेची भूमिका साकारली. पद्मावत, गोलियों की रासलीला, रामलीला, पिकू यांसारख्या चित्रपटांतून तिने स्त्रीचे वेगवेगळे पैलू दाखवले; पण प्रत्येक भूमिकेत स्वतःचा आत्मसन्मान जपणारी …
Read More »फोन स्वतः सांगेल कॉलरचे नाव
नोकरदार स्रियांसाठी दररोज दोन्ही जबाबदार्या सांभाळताना करावी लागणारी कसरत प्रचंड आव्हानात्मक असते. विशेषतः सध्या स्मार्टफोनमुळे ही कसरत अधिक तीव्र झाली आहे. फोन स्वतः सांगेल कॉलरचे नाव कधी कधी असे होते की आपण एखाद्या कामात इतके गुंतून जातो की महत्त्वाचे कॉल देखील उचलणे आपल्याकडून राहून जाते. खरी अडचण तेव्हा निर्माण होते जेव्हा तो कॉल आपल्या जोडीदाराचा किंवा बॉसचा असतो. तुम्हीही अनेकदा …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र