लेख-समिक्षण
  • 9 august 2026

अंक मिळणेसाठी


एकूण वाचक संख्या : 4212

TimeLine Layout

November, 2025

  • 16 November

    उत्कंठा शिगेला

    बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. सहा नोव्हेंबर रोजी पहिला टप्पा पार पडला. या टप्प्यात १८ जिल्ह्यांतील १२१ ठिकाणी मतदानाची प्रक्रिया पार पडली आणि आता दुसर्‍या टप्प्याकडे लक्ष लागले आहे. काही दिवसांतच बिहारच्या जनतेचा कौल कळणार आहे. पहिल्या टप्प्यात १३१४ उमेदवारांसाठी बिहारी जनतेने मतदानाचा हक्क बजावला. या टप्प्यातील निकालातूनच बिेहारचा मुख्यमंत्री ठरणार आहे. उमेदवारांची संख्या आणि मतदान याचे आकलन …

    Read More »
  • 16 November

    तडजोडीची सुगी

    महाराष्ट्रातील नगरपरिषदा आणि नगरपंचायती यांच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच नवनवीन आणि सोयीची समीकरणेही समोर येत आहेत. खरे तर राज्यात सध्या सत्तेवर असलेली महायुती आणि विरोधी बाकावर बसलेली महाविकास आघाडी यांच्यात या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा समोरासमोर लढत होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात अशा प्रकारचे चित्र समोर न येता वेगळीच; पण सोयीची काही समीकरणे समोर …

    Read More »
  • 9 November

    अन्या सिंग ‘बॉर्डर २’मध्ये

    बहुलोकप्रिय ठरलेल्या ‘बॉर्डर’ सिनेमाचा सीक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉर्डर २ नावाने प्रदर्शित होणार्‍या या बहुप्रतिक्षित सिनेमाविषयी एक नवीन अपडेट समोर आली आहे. सनी देओल अभिनीत या आगामी सिनेमात वरुण धवन, अहान शेट्टी आणि दिलजीत दोसांझ हे कलाकार काम करणार आहेत हे अगोदरच स्पष्ट करण्यात आले होते. आता या सिनेमात आणखी एका कलाकाराची एन्ट्री होणार असल्याची माहिती समोर आली …

    Read More »
  • 9 November

    अनभिषिक्त सुपरस्टार

    शाहरुख खान… बॉलीवूडला पडलेलं एक सुंदर स्वप्न… हजारो-लाखो नव्हे तर कोट्यवधी तरुण-तरुणींच्या हृदयाची धडकन…जवळपास तीन दशकांहून अधिक काळ हिंदी सिनेसृष्टीवर आपली अवीट आणि अमीट छाप उमटवणारा बादशहा… फॅशन आयकॉन…स्टाईल आयकॉन…एटिकेटस् आयकॉन….आणि अभिनयाच्या क्षेत्रात तर अनभिषिक्त सम्राट… रुपेरी पडद्यावरील त्याच्या हरेक अदा प्रेक्षकांना मनापासून आवडणार्‍या… इतक्या की गावाखेड्यांमध्येही एखाद्या स्टायलिश तरुणाला ‘काय शाहरुख’ म्हणून उपमा दिली जाते…. त्याच्या स्टाईलची नक्कल करणार्‍यांची …

    Read More »
  • 9 November

    यशाचा फॉर्म्युला ८०:२०

    प्रत्येक तरुणाचे स्वप्न असते की त्याने आपल्या करिअरमध्ये अकल्पनीय उंची गाठावी, पण बहुतांश तरुण हे स्वप्न प्रत्यक्षात आणू शकत नाहीत. ते मेहनत आणि योग्य दिशेने काम करण्याच्या बाबतीत अनेकदा मागे पडतात. अनेकदा तर प्रतिभावान व स्मार्ट तरुणसुद्धा योग्य संधी गमावतात. अखेर या समस्येपासून वाचण्याचा मार्ग काय आहे? करिअर तज्ज्ञांच्या मते जर ८० टक्के विरुद्ध २० टक्के या फॉर्म्युल्यानुसार चालले गेले, …

    Read More »
  • 9 November

    दागिन्यांचे लेअरींग करताना…

    स्टायलिश दिसण्यासाठी फक्त आउटफिटच नव्हे तर दागिन्यांवरही तितकंच लक्ष देणे गरजेचे असते. दागिन्यांचा साज चढवताना ज्वेलरी लेयरिंग हा एक अत्यंत प्रभावी पर्याय आहे. अगदी साध्या कपड्यांनाही ही स्टाइल एक नवीन ट्विस्ट देऊन, तुमच्या पर्सनॅलिटीला आकर्षक बनवते. पण हे लेयरींग अधिक आकर्षक दिसण्यासाठी काही टिप्स नक्कीच कामी येतील. एस्टेटमेंट पीस निवडा ः लेयरिंग करताना एक असा दागिना निवडा जो सर्वांचं लक्ष …

    Read More »
  • 9 November

    बटू ग्रहावर बर्फाच्छादन

    प्लूटोला एकेकाळी आपल्या ग्रहमालिकेत एक ग्रह म्हणून स्थान होते. मात्र, काही वर्षांपूर्वीच खगोलशास्त्रज्ञांनी त्याला ‘खुजा, बटू ग्रह’ (द्वार्फ प्लॅनेट) ठरवून ग्रहमालिकेतून बाहेर काढले. अर्थात, तरीही त्याच्याविषयीचे कुतूहल शमलेले नाही. प्लूटोबाबत सातत्याने संशोधने होत असतात. प्लूटोच्या वातावरणाची पहिली रंगीत छायाचित्रे नासाच्या न्यू होरायझन्स यानाने पाठवलेली असून, त्यात बर्फाळ बटू ग्रहावर निळे आकाश दिसत आहे. प्लूटोच्या पृष्ठभागावर बर्फ दिसत आहे. कोलोरॅडोतील साऊथवेस्ट …

    Read More »
  • 9 November

    महिला क्रिकेटसंघाला लाभलेले ‘अमोल’ रत्न

    भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक असलेल्या अमोल मजूमदार यांच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवून जागतिक मंचावर भारतीय क्रिकेटचा डंका वाजवला आहे. ऑटोबर २०२३ मध्ये बीसीसीआयने अमोल मजूमदार यांची भारतीय महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली होती. अवघ्या दोन वर्षांत त्यांच्या प्रशिक्षण पद्धतीमुळे संघाने तांत्रिक आणि मानसिक दोन्ही स्तरांवर विलक्षण प्रगती साधली. अमोल यांनी आंतरराष्ट्रीय पदार्पण न …

    Read More »
  • 9 November

    बिगुल वाजला; पण…

    राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार या सर्व ठिकाणी २ डिसेंबरला मतदान होऊन ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या अनुषंगाने उमेदवारी अर्ज भरणे, माघार घेणे वगैरे तारखाही जाहीर केल्या गेल्या आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनेक वर्षे प्रलंबित आहेत. यात केवळ नगरपालिका किंवा नगरपरिषदा यांच्या निवडणुकाच प्रलंबित नाहीत तर, जिल्हा …

    Read More »
  • 9 November

    विजय एका स्वप्नाचा

    जेव्हा मी लहान होते, तेव्हा माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं खेळणं म्हणजे वडिलांची क्रिकेटची बॅट होती. ती बॅट माझ्यापेक्षा उंच, जड आणि मला हाताळायलाही अवघड वाटायची. पण तीच बॅट माझं पहिलं स्वप्न बनली. मला अजून आठवतं, मी अंगणात उभी राहून ती बॅट दोन्ही हातांनी उचलायचा प्रयत्न करायचे आणि वडिलांना म्हणायचे की मी सुद्धा भारतासाठी खेळणार आहे. तेव्हा कुणालाही कल्पना नव्हती की …

    Read More »