लेख-समिक्षण
  • 29 Mar 2026

अंक मिळणेसाठी


एकूण वाचक संख्या : 4207

TimeLine Layout

July, 2025

  • 13 July

    स्वप्नांचं रेकॉर्डिंग

    स्वप्नांबाबत प्राचीन काळापासूनच माणसाला कुतूहल वाटत आलेले आहे. आपल्याकडे उपनिषदांत ज्या तीन अवस्थांमधून आपण जातो, त्यामध्ये जागृती, स्वप्न व सुषुप्ती (स्वप्नरहीत गाढ झोप) यांचा समावेश केलेला आहे. स्वप्नाबाबत आधुनिक काळातही अनेक प्रकारची संशोधने झाली आहेत. अनेकजण रात्री पाहिलेले स्वप्न विसरून जातात. परंतु, स्वप्न विसरण्यास आता बाय बाय करता येणार आहे. तुम्ही पाहिलेले स्वप्न रेकॉर्ड होणार आहे. मग सकाळी उठून स्वप्न …

    Read More »
  • 13 July

    विलक्षण क्षमतेचा दिव्यांग चित्रकार

    स्टीफन विल्टशायर यांचा जन्म २४ एप्रिल १९७४ रोजी इंग्लंडमधील लंडन शहरात एका स्थलांतरित कुटुंबात झाला. तो जन्मतःच ऑटिझम स्पेट्रम डिसऑर्डर या न्यूरोलॉजिकल अडचणीने ग्रस्त होता. चार वर्षांचा होईपर्यंत स्टीफन बोलतही नव्हता. त्याला इतरांशी संवाद साधणे कठीण होते, आणि सामाजिक व्यवहारात तो सहभागी होऊ शकत नव्हता. त्याचे वडील स्टीफन लहान असतानाच एका अपघातात मृत्यूमुखी पडले. त्यानंतर त्याच्या आईने एकटीने त्याला वाढवलं. …

    Read More »
  • 13 July

    गिलचा झंझावात

    इंग्लंडविरुध्दच्या दुसर्‍या कसोटी सामन्यात भारताच्या शुभमन गिलने ऐतिहासिक झंझावात करीत २६९ धावांचा विक्रम नोंदविला. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात त्याने एक नवीन सोनेरी पान लिहून ठेवले. २६९ धावांची त्याची ही चमकदार खेळी केवळ वैयक्तिक कामगिरी नव्हे तर संपूर्ण संघासाठी प्रेरणास्थान आहे. गिलने धावांचा डोंगर उभा करताना अनेक दिग्गज फलंदाजांचे रेकॉर्ड मोडीत काढले. या खेळात त्याने सचिन तेंडुलकरची इंग्लंडविरुध्द कसोटीतली सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या …

    Read More »
  • 13 July

    पैशाचा पाऊस!

    डेट्रॉईट शहराचे आकाश त्या दिवशी वेगळेच दिसत होते. संपूर्ण ईस्टसाईडवर एक वेगळा आनंद दरवळत होता ‡ धुयाने भरलेल्या आभाळातून अचानकच काहीतरी शुभ्र व सुवर्ण झेपावत खाली येऊ लागलं. गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये मिसळलेले ते झळाळते हिरवे नोटांचे तुकडे… जणू काही स्वर्गातूनच आलेली एखादी भेट होती. लोक एकमेकांकडे पाहू लागले, काहींनी डोळे विस्फारले, काहींनी आकाशाकडे हात उचलले आणि काहींच्या डोळ्यांत पाणी आलं. कारण …

    Read More »
  • 13 July

    अर्बन नक्षलवर प्रहार

    काही सुधारणांसह महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक गुरुवारी विधानसभेत आवाजी मतदानाने एकमताने मंजूर करण्यात आले. शहरी नक्षलवाद आणि लोकशाहीविरोधी कारवायांना आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: हे विधेयक मांडले. १२ हजार ५०० सूचना आणि हरकतींचा अभ्यास करून सुधारित स्वरूपात सादर करण्यात आलेल्या या विधेयकामुळे सरकारला कडव्या विचारसरणीच्या संघटनांवर कठोर कारवाईचे अधिकार प्राप्त झाले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले की, …

    Read More »
  • 13 July

    निसर्गबदलांपुढे तंत्रज्ञान थिटे

    जागतिक तापमानवाढ आणि त्यामुळे होणार्‍या हवामान बदलांच्या झळांनी आज मानवी जीवनापुढे केवळ संकटांची मालिकाच उभी राहिलेली नाहीये, तर मनुष्यप्राण्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आहे. विशेषतः भारतासारख्या देशात मान्सूनच्या चक्रावर याचा अत्यंत प्रतिकूल परिणाम झालेला दिसत आहे. अलीकडेच चक्रीवादळांचे अचूक भाकीत करणारे ‘सायलोन मॅन’ डॉ. मृत्युञ्जय महापात्र हवामानातील बदलर टिपण्यास आधुनिक प्रणालाही अपुरी ठरत असल्याचे म्हटले आहे. तंत्रज्ञानात यथावकाश प्रगती होत …

    Read More »
  • 13 July

    चाल ड्रॅगनची, टंचाई खतांची

    अन्नधान्यांच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊन जगाला मोठ्या प्रमाणावर निर्यात करणार्‍या भारताला दरवर्षी तब्बल सहा कोटी टन खताची गरज भासते. यापैकी बहुतांश खतांची आयात होते आणि यातही चीनचा वाटा मोठा आहे. तथापि, गेल्या दोन महिन्यांपासून चीनने कोणतिही पूर्वसूचना न देता किंवा अधिकृत घोषणा न करता भारताला होणारा खतांचा पुरवठा रोखला आहे. परिणामी भारतातील पिकांवर संकट घोंघावत आहे. स्पेशालिटी फर्टिलायजर्ससारखी वॉटर सोल्यूबल, मायक्रोन्यूट्रिएंट …

    Read More »
  • 6 July

    साई पल्लवी, जुनैद ‘वन डे’साठी एकत्र

    दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी आणि आमिर खानचा मुलगा जुनैद हे दोघे ‘वन डे’ या कोरियन प्रेमपटासाठी एकत्र आले आहेत. २०११ मध्ये हा प्रेमपट आला होता. निकोलस यांच्या २००९मध्ये आलेल्या ‘वन डे’ या कादंबरीवर हा चित्रपट बेतला आहे. अ‍ॅना हॅथवे आणि जिम स्ट्रूगेस यांनी यात अभिनय केला आहे. १५ जुलैला सेंट स्वीथून डे असतो. या दिवशी हे दोघे भेटतात. दोघांत कुठलेच …

    Read More »
  • 6 July

    विमान अपघातांचे रुपेरी चित्रण

    अहमदाबादच्या दुर्दैवी विमान अपघाताने देश हादरला. तब्बल २५० प्रवाशांचा या अपघातात अतिशय दुर्दैवी मृत्यू झाला. अहमदाबाद विमान दुर्घटनेत जे घडले ते केवळ आकड्यांपुरते नव्हते, तर प्रत्येक प्रवाशाच्या मृत्यूमागे एक वेगळी कहाणी दडलेली होती. हा पहिला किंवा शेवटचा अपघात नव्हे. आजवर अनेक हृदयद्रावक विमान अपघात झाले असून त्यातील काहींच्या कहाण्या रुपेरी पडद्यावरही दिसल्या. मात्र ज्या सत्य घटनांवर चित्रपट झाले, त्यांच्या कहाण्यांचा …

    Read More »
  • 6 July

    सहजीवनातला आनंद आणि न्युरोसायन्स

    प्रेम, भांडणं, संवाद, गैरसमज ‡हे सगळं केवळ मनाचं नाही, तर मेंदूच्या रचनेशी आणि त्याच्या कामकाजाशी जोडलेलं आहे. खालचा मेंदू ः याला ‘ब्रेन स्टेम’ किंवा सरायव्हल ब्रेन म्हणतात. याचं मुख्य काम म्हणजे धोका ओळखणं आणि लगेच प्रतिक्रिया देणं. म्हणजेच “लढा, पळा किंवा थिजून जा’ हे तात्काळ निर्णय. जोडीदाराशी संवाद करताना तुमच्या भावना दुखावल्या जात असतील, तुम्हाला दोष दिला जात असेल, किंवा …

    Read More »