लेख-समिक्षण

रणबीर-राज्ाूचा चित्रपट आमिरमुळे लटकला

राजकुमार हिरानी आणि रणबीर कपूर यांचा चित्रपट अनिश्चित काासाठी लटकला आहे. राजकुमार आणि रणबीर कपूर पहिल्यांदाच एकत्र येत होते. मात्र दोघांच्या चाहत्यांची आता निराशा झाली आहे. आमिर खानमुळे हा चित्रपट लांबणार असल्याची माहिती आहे. ‘दादासाहेब फाळके’ यांच्या आयुष्यावर आधारीत असा चित्रपट तयार करण्याचा मानस राजकुमार हिरानी यांचा होता. त्यासाठी आमिर खानची निवड करण्यात आली. आमिर खानने या चित्रपटासाठी अनेक चित्रपट …

Read More »

रुपेरी पडद्यावरचा दीपोत्सव

भारतीय संस्कृतीत दिवाळी हा तेजाचा, चैतन्याचा, प्रकाशाचा उत्सव असून या सणाला सणसम्राज्ञी किंवा सणांची महाराणी म्हटले जाते. या सणाचे सामाजिक, धार्मिक आणि भावनिक पैलू जितके खोल, तितकाच त्याचा प्रभाव भारतीय चित्रपटसृष्टीवरही दिसून येतो. बॉलिवूडने गेल्या काही दशकांत दिवाळीच्या उत्सवाला केवळ पार्श्वभूमी म्हणून नव्हे तर एक कथानकाचे केंद्रस्थान म्हणूनही वापरले आहे. प्रत्येक काळात दिवाळीच्या प्रकाशात नातेसंबंधांची गुंतागुंत, कुटुंबातील बंध, प्रेम, पुनर्मिलन, …

Read More »

चटकदार मेयोनीज वापरताय?

बर्गर, मोमोज आणि सँडविचमध्ये लावले जाणारे मेयोनीज हा मुलाबाळांसह हल्ली सर्वांच्याच आवडीचा अन्नघटक म्हणून पुढे आला आहे. अर्थातच, पाश्चिमात्य देशांमधून आलेल्या फास्टफूड-जंकफूड कल्चरमधून याची चटक सर्वदूर वाढत चालली आहे. पण ते आरोग्यासाठी घातक असल्याचे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आता तर तमिळनाडू सरकारने ८ एप्रिल २०२५ पासून पुढील एक वर्षासाठी अंड्यापासून बनवलेल्या मेयोनीजवर बंदी घातली आहे. मेयोनीज हे मोठ्या प्रमाणावर लहानांपासून …

Read More »

कुर्तीमधील बहार

तरुणी असोत वा महिला, कॉलेजगोईंग असोत वा प्रोफेशनल, कुर्ती ही आजच्या काळातली सर्वांत लोकप्रिय फॅशन आहे. उन्हाळ्यामध्ये तर कुर्तीचा पेहराव आरामदायी, स्टायलिश आणि हटके लूक देणारा ठरतो. सामान्यतः महिला सलवार कमीज घालणं पसंत करतात, पण हटके आणि स्टायलिश लूकसाठी कुर्ती विविध प्रकारे टीमअप करून घालता येते. • सलवार कमीज विथ ट्विस्टकुर्ता आणि पटियाला सलवार हा कॉम्बो मुलींवर फारच सुंदर दिसतो. …

Read More »

फोन स्वतः सांगेल कॉलरचे नाव

नोकरदार स्रियांसाठी दररोज दोन्ही जबाबदार्‍या सांभाळताना करावी लागणारी कसरत प्रचंड आव्हानात्मक असते. विशेषतः सध्या स्मार्टफोनमुळे ही कसरत अधिक तीव्र झाली आहे. फोन स्वतः सांगेल कॉलरचे नाव कधी कधी असे होते की आपण एखाद्या कामात इतके गुंतून जातो की महत्त्वाचे कॉल देखील उचलणे आपल्याकडून राहून जाते. खरी अडचण तेव्हा निर्माण होते जेव्हा तो कॉल आपल्या जोडीदाराचा किंवा बॉसचा असतो. तुम्हीही अनेकदा …

Read More »

४७ वेळा मिळाला नकार,पण हार मानली नाही

कोण म्हणतं स्वप्नं खरी होत नाहीत? मनापासून ठरवलं, तर प्रत्येक स्वप्न वास्तवात उतरू शकतं. विचार करा तुम्ही एखादं असं काम करता आहात ज्यासाठी तुम्ही महिनोन्महिने मेहनत करता, तहान-भूक हरपून काम करता, आयुष्याचं सगळं लक्ष त्यावर केंद्रित करता पण ४७ वेळा अपयश येते; अशा वेळी कुणीही गतप्राण होऊन जाऊ शकतो. पण युको शिमिजु यांनी अशा परिस्थितीतही हार न मानता आपली संकल्पना …

Read More »

खड्डे आणि ताशेरे

महाराष्ट्राची राजधानी मुंबई असो किंवा महाराष्ट्रातील इतर महानगरे असोत किंवा देशाच्या कानाकोपर्‍यातील महानगरे आणि नगरे असोत, त्या ठिकाणी नेहमीच खराब रस्ते आणि खड्डे यांची चर्चा होत असते. पण आता मुंबई उच्च न्यायालयाने एका निकालाच्या दरम्यान खराब रस्त्यांवर आणि खड्ड्यांच्या संस्कृतीवर जे ताशेरे ओढले आहेत ते पाहता या रस्त्यांच्या विकासासाठी जबाबदार असलेली प्रशासन यंत्रणा डोळे उघडून जागी होईल अशी आशा करायला …

Read More »

अर्थचक्राला गती सणसुदीची

आपल्या देशात सणासुदीला, उत्सवात लाखो, कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते. यावर्षी ऑनलाइन आणि ऑफलाइन प्लॅटफॉर्मवर तब्बल सहा लाख कोटी रुपयांचे व्यवहार होण्याची शयता असून त्यात ऑनलाइनवर १.२० लाख कोटी रुपयांची उलाढाल होण्याचा अंदाज आहे. ही उलाढाल देशाच्या जीडीपीच्या ३.२ टक्के आहे. नामांकित ई कॉमर्स कंपन्यांनी तर उत्सवाच्या काळात वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी कपातीचा लाभ उचलण्यासही सुरुवात केली आणि ती …

Read More »

नक्षल नेत्याने स्वीकारले संविधान

नक्षलवाद्यांच्या सेंट्रल कमिटी आणि पोलिट ब्युरो सदस्य तसेच वरिष्ठ नक्षल कमांडर मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ सोनू उर्फ भूपती याने बुधवारी आपल्या ६० सहकार्‍यांसह गडचिरोली पोलिसांसमोर ऐतिहासिक आत्मसमर्पण केले. भूपती आणि त्याच्या सहकार्‍यांनी शस्त्रे खाली ठेवून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेतला. या शरणागतीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संविधानाची प्रत सुपूर्द केली. महाराष्ट्र-छत्तीसगड सीमावती भागातील दंडकारण्यात गेली अनेक वर्षे नक्षलवादी …

Read More »

नोबेल आणि भारतीय

ऑटोबर महिना येताच जगभराचे लक्ष नोबेल सन्मानाकडे जाते. स्वीडिश शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या दुरगामी विचारातून सुरू झालेले नोबेल पुरस्कार आजही मानवतेसाठी सर्वोत्तम योगदानाचे प्रतीक मानले जाते. दरवर्षी विज्ञान, साहित्य, शांतता आणि अर्थशास्त्र क्षेत्रात सर्वोत्तम कार्य करणार्‍या व्यक्तीला नोबेल सन्मान दिला जातो. पण भारताचा विचार येतो तेव्हा सुमारे दीड अब्ज लोकसंख्येचा प्रतिभावान देश केवळ नऊ नोबेल सन्मानापुरताच मर्यादित का राहिला आहे? …

Read More »