लेख-समिक्षण

मुलांना समजून घेताना..

मुले ही देवाघरची फुले तर असतातच; पण उद्याच्या भविष्याचे निर्मातेही असतात. त्यामुळेच मुलांच्या चांगल्या आरोग्यासोबतच त्यांचे संगोपनही चांगले होणे गरजेचे आहे. चांगल्या संगोपनातूनच मुले त्यांच्या जीवनातील प्रत्येक ध्येय साध्य करू शकतात. मुलाला शिकवलेल्या चांगल्या सवयी त्याने अंगिकारल्या तरच चांगले पालकत्वही यशस्वी होते. मूल ऐकत नाही, असे न सांगणारी आई शोधून सापडायची नाही. याचे कारण हट्टीपणा करण्याचेच ते वय असते. अशा …

Read More »

गुणकारी काळी गाजरे!

हिवाळा आला की बाजारात लालचुटुक गाजरंही दिसू लागतात. गाजरांचे सेवन आरोग्यासाठी लाभदायक असते. मात्र, केवळ लालच गाजरं असतात असे नाही. काळीही गाजरे असतात व ती लाल गाजरापेक्षाही अधिक गुणकारी असतात हे तुम्हाला माहिती आहे का? ‘सायन्स डायरेक्ट’वर प्रकाशित झालेल्या संशोधनात असे म्हटले आहे की काळ्या गाजरांमध्ये लाल आणि केशरी गाजरपेक्षिा जास्त फ्लेव्होनॉइडस् असतात. यापैकी क्वेरसेटीन, ल्यूटोलिन, केम्पफेरॉल आणि मायरिसेटिन प्रमुख …

Read More »

प्रतिभावंत खगोलशास्त्रज्ञ

डॉ. जयंत नारळीकर यांना नुकतीच 86 वर्षेपूर्ण झाली. 19 जुलै 1938 रोजी कोल्हापूर येथे जन्मलेल्या नारळीकर यांना घरातूनच विद्वत्तेचा वारसा लाभला. 1959 मध्ये केंब्रिज विद्यापीठाची ’ट्रायपास’ ही गणितातील अवघड परीक्षा वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी पास होऊन वडिलांप्रमाणे ते रँगलर झाले. यानंतर त्यांनी खगोलशास्त्रज्ञ डॉ. फ्रेड हॉएल यांच्या मार्गदर्शनाखाली विश्व उत्पत्तीसंबंधी संशोधन करून सिद्धांत मांडला. ’अंतर्गत स्फोट होऊन सूर्यापासून पृथ्वी आणि …

Read More »

स्थानिक भाषांचा अवलंब गरजेचाच

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधिश न्या. डी. वाय. चंद्रचूड यांनी अलीकडेच एका महत्त्वाच्या मुद्दयाकडे देशाचे लक्ष वेधले आहे. प्रभावी न्यायव्यवस्थेसाठी स्थानिक भाषांचा अवलंब केला पाहिजे असे वक्तव्य यांनी केले आहे. एका चर्चासत्रादरम्यान बोलातना न्या. चंद्रचूड यांनी सांगितले की, अलाहाबाद उच्च न्यायालयात न्यायाधीश असताना त्यांना हे जाणवले होते की वकील त्यांच्या मातृभाषेत अधिक चांगल्या प्रकारे युक्तिवाद करू शकतात. वास्तविक पाहता, आपल्या देशात व्यावसायिक …

Read More »

विचित्र वास्तव

णूस जास्तीत जास्त किती वर्षेजगू शकतो? शतायुषी व्यक्ती अतिभाग्यवान मानली जाते. अर्थात, आपण किती जगतो यापेक्षा कसे जगतो हे अधिक महत्त्वाचं असतं. आपण सामाजिक नीतिनियम मोडले तर तो गुन्हा ठरतो आणि गांभीर्यानुसार त्याची शिक्षाही मिळते. गुन्हा अतिगंभीर असेल तर आजीवन कारावासाची शिक्षा मिळते. अशी व्यक्ती शतायुषी झाल्यास ती भाग्यवान नव्हे तर शापित ठरेल. हा विचार मनात येण्याचं कारण अ‍ॅडम ब्रिटन …

Read More »

12 नक्षल्यांना कंठस्नान

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील जारावंडी क्षेत्रांतर्गत छत्तीसगड सीमेलगतच्या वांडोली गावानजीकच्या जंगल परिसरात 17 जुलै रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास पोलिस आणि नक्षल्यांमध्ये झालेल्या चकमकीत पोलिसांनी 12 नक्षल्यांना कंठस्नान घातले आहे. मृत 12 नक्षलवाद्यांपैकी दोघांची ओळख पटली आहे. एक उपनिरीक्षक जखमी आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे जिल्हा दौर्‍यावर होते, त्यांनी जिल्हा सोडताच घनदाट जंगलात …

Read More »

विकासाच्या वाटेवर महागाईचे काटे

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार तिसर्‍या कार्यकाळात कृषी आणि ग्रामीण विकासाबरोबरच कृषी सुधारणांच्या पातळीवर आघाडी घेण्याची गरज आहे. सरकारकडून तंत्रज्ञानाचा वापर करत खाद्य पदार्थाची नासाडीचे प्रमाण कमी करणे, कृषी क्षेत्रात यांत्रिकीरणाचा वापर अधिक करणे, हवामान बदलाचा सामना करणार्‍या प्रणालीचा अंगीकार करणे, ग्रामीण भागातील रस्ते मंडईला जोडणे, कृषी साठवणुकीच्या पायाभूत सुविधांच्या क्षमतेत सुधारणा करणे यांसारख्या धोरणात्मक प्राधान्यक्रमाबरोबरच पुरवठा साखळीत सुधारणा करावी लागेल. …

Read More »

मोबाईल कंपन्यांचा दणका

अलीकडेच रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया या तीनही मोबाईलसेवा पुरवठादार कंपन्यांनी केलेली दणदणीत दरवाढ ही ग्राहकांच्या खिशाला कात्री लावणार आहे. आज मोबाईल रिचार्ज हे दुधापेक्षाही गरजेचे बनल्याची स्थिती असल्यामुळे हे वाढीव शुल्क देण्यामध्ये ग्राहकांनाही पर्यायच उरलेला नाहीये. आधुनिक भांडवलशाहीमध्ये ग्राहकाला कशा प्रकारे पंगु बनवले जाते याचे उत्तम उदाहरण म्हणून याकडे पहावे लागेल. टाटा कंपनी आणि बीएसएनएलमध्ये झालेला 15 हजार कोटींचा …

Read More »

दृष्टीचं सडेतोड उत्तर

‘मधुबाला’ या मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री दृष्टी धामी आई होणार आहे. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियाद्वारे ही गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली होती. तिने 2015 साली बिझनेसमन नीरज खेमकासोबत लग्नगाठ बांधली. लग्नाच्या 9 वर्षानंतर दृष्टी आई होणार आहे. अलीकडेच दृष्टी धामीने तिचे बेबी बंप फ्लाँट करतानाचे फोटो शेअर केले होते. मात्र काहींनी दृष्टीच्या बेबी बंपला फेक म्हटले. यावर आता दृष्टीने देखील …

Read More »

अविश्वसनीय कथेत गुरफटलेला मुंजा

आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘मुंजा’ हा हिंदी भाषेतील चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यात यशस्वी झाला आहे. हा चित्रपट कोकणच्या पार्श्वभूमीवर बेतलेला हॉरर कॉमेडी चित्रपट. असे असले तरी हा चित्रपट पाहणारे प्रेक्षक मुंजाला सिरियसली घेत नाहीत, आणि हीच जमेची बाजू मुंजाच्या यशासाठी पथ्यावर पडणारी ठरली आहे. कितीही वैचारिक मतभेद असले तरी आणि कौटुंबिक कलह असला तरी कोकणातला माणूस आपल्या संकटात सापडलेल्या …

Read More »