नोपॉझ म्हणजेच मासिक पाळी जाण्याची प्रक्रिया ही ढोबळ मानाने पन्नाशीनंतर सुरु होणारी प्रक्रिया स्रियांच्या आयुष्यात अपरिहार्य असली तरी ती बहुतेकदा वेदनादायी असते. अलीकडील काळात धकाधकीच्या जीवनशैलीमुळे स्त्रियांचा मोनोपॉझ चाळीशीजवळ येऊन ठेपला आहे. ही प्रक्रिया काही महिने नाही, तर काही वर्षेही चालू शकते. यादरम्यान स्त्रियांमध्ये मानसिक, शारीरिक बदल होत जातात. इतक्या वर्षांची झालेली सवय बदलणं काही जणींना खूप अवघड जातं. यासाठीच …
Read More »सूर्याचा प्रवासवेग किती?
अंअतराळाच्या अनंत पसार्यात आपण कुठे आहे हे पाहायला गेलो तर कुणीही थक्क होऊ शकते. आपली पृथ्वी ज्या सौरमालिकेचा एक भाग आहे अशा लाखो सौरमालिका ‘मिल्की वे’ नावाच्या एकाच आकाशगंगेत आहेत. ब्रह्मांडात अशा ‘मिल्की वे’सारख्या अब्जावधी आकाशगंगा आहेत! ’मिल्की वे’ मध्ये आपला सूर्य किती वेगाने प्रवास करीत असतो हे जाणून घेणेही रंजक ठरेल. तुम्हाला माहिती आहे का, आपली पृथ्वी एकाच वेळी …
Read More »टॉलस्टॉय आणि ती
जगप्रसिद्ध रशियन लेखक आणि तत्त्वज्ञ लिओ टॉलस्टॉय यांचा जन्म 9 सप्टेंबर 1828 या दिवशी एका श्रीमंत घराण्यात झाला. त्यांची जगभर गाजलेली साहित्यकृती म्हणजे ‘वॉर अँड पीस.’ मास्कोतील साहित्यप्रेमींना वाटते, की लिओ टॉलस्टॉय यांचा आपण मोठा सन्मान करावा. साहित्यप्रेमी त्यांच्या गावी जातात आणि निमंत्रण देतात. मॉस्कोला येण्यासाठी रेल्वेच्या तृतीय शेणीच्या डब्यात टॉलस्टॉय बसतात. अंगावर साधा कोट, साधेच कपडे आणि रेल्वे मास्कोच्या …
Read More »भूस्खलनातून काही शिकणार का?
केरळच्या वायनाड येथील विनाशकारी भूस्खलनाने पुन्हा एकदा अनियंत्रित विकासाकडे लक्ष वेधले गेले आहे. शंभराहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. परंतु उत्तर ते दक्षिण भारतापर्यंतच्या पर्वतरांगातील स्थिती कमी अधिक प्रमाणात सारखीच आहे. हिमालयातील पर्वतरांगा तुलनेने नवीन आहेत. तेथे माती दक्षिणेतील पर्वतरांगाप्रमाणे कडक झालेली नाही, परंतु उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंतच्या भुस्खलनाच्या घटना पाहिल्या तर त्यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे मानवी हस्तक्षेप आणि घडामोडी. …
Read More »खरा इशारा
कामाशिवाय घराबाहेर पडू नका,’ हा सरकारी इशारा आता ‘अफवांवर विश्वास ठेवू नका,’ या सल्ल्याइतकाच सपक, निरर्थक आणि वेडगळपणाचा वाटू लागलाय. डिजिटल कनेक्टिव्हिटीच्या युगात माहितीचा धबधबा डोक्यावर कोसळत असताना, त्यातली कोणती माहिती खरी आणि कोणती अफवा, हे ओळखण्याइतका नीरक्षीरविवेक 140 कोटी लोकांमध्ये आहे, असं गृहित का धरायचं? अफवांचं पीक येऊ नये असं वाटत असेल तर आणीबाणीच्या प्रसंगी सरकारी माहितीतंत्राची व्याप्ती वाढवायला …
Read More »अखेर पूजा खेडकर यांची आयएएस नियुक्ती रद्द
अखेर केंद्रीय लोकसेवा आयोगाने वादग्रस्त व नखरेल प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पूजा खेडकर या नागरी सेवा परीक्षा नियम 2022 नुसार दोषी ठरल्याचे आयोगाने म्हटले आहे. त्याचबरोबर पूजा खेडकर यांना भविष्यात सर्व परीक्षा देण्यास मनाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र कॅडरच्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर या गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहेत. चुकीची माहिती …
Read More »बस झाले आता
महाराष्ट्राच्या समाजकारणामध्ये अलीकडील काळात एक चिंतेची बाब समोर येत आहे. राज्यामध्ये एकतर्फी प्रेमातून तरुणींवर हल्ले करण्याचा एक घातक प्रवाह पुन्हा डोके वर काढताना दिसत आहे. गेल्या वर्षी घडलेले दर्शना पवारचे प्रकरण असो, पुण्यामध्ये तरुणीवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न असो, वसईतील तरुणीची निर्घृण हत्या असो यांसारख्या घटनांमधून मुलींना नकार देण्याचा अधिकार नाही, हा पुरुषसत्ताक अहंकार नव्याने बळावत चालल्याचे दिसू लागले आहे. …
Read More »मनात उमटतो श्रावण
श्रावण आला की मनात निराळ्या लहरी उमटू लागतात. त्याच्या उन पावसाच्या खेळाबरोबर मनही आशा – निराशेच्या लपंडावात रमतं. निसर्गानेही श्रावण महिना तयार केला असेल तो मानवी मनाचं प्रतिबिंब म्हणूनच. त्याच्या आगमनाने पुढच्या सणांची चाहूल लागते,जशी मनाला एखाद्या पुढच्या चांगल्या घटनेचे वेध लागून त्यात उत्साह भरावा. पावसाचं मळभ दूर करून त्याची रिमझिम जशी निसर्गात बदल घडवून आणते तसंच श्रावणाच्या आगमनाने येणार्या …
Read More »पैशांपेक्षाही व्यक्तिरेखा महत्त्वाची
करीना कपूर खान ही एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे. तिने आपल्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट केले. दोन दशकांहून अधिक काळ ती चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे. या काळात करिनाने इंडस्ट्रीतील सर्व मोठ्या कलाकारांसोबत काम केले. नुकतेच, एका मुलाखतीदरम्यान, तिने चित्रपटात काम करण्यासाठी फी किती घेतली जाते याबद्दल मनोरंजक उत्तर दिले आहे. प्रत्येक चित्रपटासाठी 10-15 कोटी रुपये फी घेणार्या अभिनेत्रींपैकी ती एक आहे …
Read More »कहाणी अष्टपैलू नायिकेची
फर्ज, रॉकी, बॉबी आणि लव्ह स्टोरीसारख्या गाजलेल्या अनेक चित्रपटात काम करणार्या अरुणा इराणी या दमदार अभिनयासाठी ओळखल्या जातात. अरुणा यांनी इंडस्ट्रीमध्ये सहा दशकांपेक्षा अधिक काळ काम केले. हिंदी, कन्नड, मराठी आणि गुजराती भाषेत पाचशेपेक्षा अधिक चित्रपटात काम करणार्या अरुणा इराणी यांच्या अभिनयाची ताकद लक्षात येते. फिल्मफेअर अवॉर्डसमध्ये सर्वोत्तम सहायक अभिनेत्रीच्या श्रेणीत त्यांना विक्रमी दहावेळेस नामांकन मिळाले होते. 1985 मध्ये ‘पेट …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र