छत्तीसगडमधील बिजापूर परिसरात बुधवारी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठ्या चकमकीला सुरुवात झाली आहे. दंतेवाडा, नारायणपूर, विजापूर आणि कोंडागाव जिल्ह्यांच्या सीमेवर जंगलात ही चकमक झाली. अबूझमाड परिसरातील या चकमकीत २७ नक्षलवादी मारले गेले आहेत. त्यात सीपीआय (माओवादी) चा सरचिटणीस नंबला केशव राव, ज्यांना बसवराजू म्हणून ओळखले जाते, ते २६ इतर नक्षलवाद्यांसह ठार झाले, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली. …
Read More »विशेष
भुजबळांचे पुनरागमन
ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा समावेश अखेर राज्य मंत्रिमंडळात झाला आहे. त्यांना महायुतीच्या विद्यमान सरकारमध्ये प्रारंभी डावलले जाणे आणि आता आकस्मिकपणे मंत्रिपद बहाल केले जाणे, या दोन्ही बाबी असंख्य राजकीय कार्यकर्त्यांसाठी अनाकलनीय आहेत. हाविकास आघाडीने गेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात घवघवीत यश मिळविले. असाच निकाल त्यानंतर जेमतेम सहा महिन्यांनी होत असलेल्या विधानसभेच्या रिंगणातही लागेल, असा आत्मविश्वास आघाडीच्या नेत्यांना होता. प्रत्यक्षात त्याच्या …
Read More »अमरावतीच्या सुपुत्राने घेतली सरन्यायाधीशपदाची शपथ
अमरावतीचे सुपूत्र आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांनी भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून बुधवारी शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात त्यांना शपथ दिली. माजी सरन्यायाधीश संजीव खन्ना हे मंगळवार १३ मे रोजी निवृत्त झाले. बी. आर. गवई हे आता २३ नोव्हेंबर २०२५ रोजीपर्यंत भारताचे सरन्यायाधीश म्हणून काम पाहणार आहेत. न्या. गवई यांना सरन्यायाधीश म्हणून काम करण्यासाठी …
Read More »संघर्ष शमला,पण प्रतिकारहीन मानसिकतेचे काय?
भारताच्या शूर जवानांनी दिलेल्या आक्रमक प्रत्युत्तरानंतर पाकिस्तानने अखेर गुडघे टेकले आहेत. संघर्षविराम झाला आहे. दहशतवाद्यांना आणि पाकिस्तानला योग्य तो धडा देऊन भारताने आपले पहिले उद्दिष्ट साध्य केले आहे. पण यादरम्यान एक प्रश्न सतत मनाला अस्वस्थ करतो आहे… तो म्हणजे बैसरन व्हॅलीत ४०० लोकांच्या नजरेसमोर २६ पर्यटक मारले गेले. यामध्ये घोडेवाला सय्यद वगळता एकाही व्यक्तीने प्रतिकार का केला नाही? एकाने जरी …
Read More »संघर्षविरामावरुन अनाठायी गहजब
’ऑपरेशन सिंदुर’ अंतर्गत भारताने पाकिस्तानला योग्य तो धडा शिकवला आहे. तरीही संघर्षविरामानंतर समाजमाध्यमांमधून काही अनाठायी प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पण आपण लक्षात घेतले पाहिजे की भारताने आपल्या सैन्याला पाकिस्तानी लष्करी तळ काबीज करण्याचे किंवा पाकव्याप्त भारतीय काश्मीरला आपल्या प्रजासत्ताक काश्मीरमध्ये परत जोडण्याचे आदेश अथवा उद्दिष्ट दिलेलेच नव्हते. आपला उद्देश दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करणे आणि प्रतिहल्ला करणार्या पाकिस्तानला धडा शिकवणे …
Read More »भारताने घेतला पहलगामचा बदला
पहलगाम हल्ल्याचा भारतीय सैन्याने बदला घेतला आहे. बुधवारी मध्यरात्री १ वाजून पाच मिनिटांनी ते दीड वाजेपर्यंत २५ मिनिटांमध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्याचे ९ तळ उद्ध्वस्त केले. दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण केंद्रांना भारतीय सैन्याने लक्ष्य केले. पहलगामच नव्हे तर भाविकांच्या बसवरील गोळीबार, २६/११ मुंबई हल्ला, जम्मू- काश्मीर पोलिस दलातील जवानांची हत्या अशा पाच ते सहा हल्ल्यांचा बदलाच भारतीय सैन्याने घेतला. या हल्ल्यामध्ये …
Read More »अघोषित युध्दातील वज्राघात
भारताच्या एअरस्ट्राईकनंतर जनतेमधील प्रतिमा टिकवण्यासाठी पाकिस्तानच्या लष्कराला भारताविरुद्ध कारवाई करणे अपरिहार्य होते. पण या कारवाईला भारताच्या अत्याधुनिक शस्रसामग्रीने आणि लष्कराच्या अचूक नियोजनामुळे पूर्णतः निष्प्रभ करण्यात आले. पाकिस्तानची क्षेपणास्रे, ड्रोन्स हवेतच उद्ध्वस्त करण्यात आली. एक विमान पाडण्यात आले. यावरुन पाकिस्तानला योग्य तो संदेश गेलेला असावा. काही अभ्यासकांच्या मते, ही लढाई खूप दीर्घकाळ चालणारी आहे. पण मागील तीन युद्धांप्रमाणेच याही वेळी भारत …
Read More »वैशिष्ट्ये ऐतिहासिक कारवाईची
पहलगाममध्ये झालेल्या दशहतवादी हल्ल्याला भारत प्रत्युत्तर कधी देणार, या प्रश्नाचे उत्तर मॉकड्रीलसाठी निवडलेल्या ७ मे रोजी पहाटे सबंध देशाला मिळाले. भारताने केलेल्या एअरस्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त करण्यात आले असून सुमारे १०० हून अधिक दहशतवादी यामध्ये मारले गेले आहेत. ‘ऑपरेशन सिंदुर’ असे अत्यंत मार्मिक नाव देऊन आखण्यात आलेले हे मिशन अत्यंत नियोजनबद्धरित्या यशस्वी करण्यात आले. हा भारताने केलेला हल्ला नसून …
Read More »देशात जातीनिहाय जनगणना होणार
केंद्र सरकार देशात जातीनिहाय जनगणना करणार आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानी आज, बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचं स्वागत केले. पण याचवेळी त्यांनी केंद्र सरकारकडे आणखी एक मोठी आणि महत्त्वाची मागणी केली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1951 …
Read More »गरज छत्रपतींच्या युध्दनीतीची
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सध्या सर्व देशभरात चर्चिला जाणारा मुद्दा म्हणजे नेमकं भारताचं प्रत्युत्तर कसं राहील? खरं तर याची जाहीर चर्चा करायचीच नसते, ते करुन दाखवायचं असतं. दरवेळी तोच-तो उपाय काम करत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती असं शिकवते की, कधी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढायचा असतो, कधी सिद्धी जोहरच्या वेढ्यातून निसटून जायचं असतं तर कधी लाल महालावर छापा टाकून शायिस्तेखानाची …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र