लेख-समिक्षण

विशेष

अवकाळीचा तडाखा! वीज पडून चार ठार

राज्यात नाशिक, धुळ्यासह विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत गुरुवारी अवकाळीने तडाखा दिला. अवकाळी पावसासोबत वीज कोसळून भंडारा जिल्ह्यातील दोन, तर यवतमाळ जिल्ह्यातील एकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. बीड जिल्ह्यात शेतात गेलेल्या शेतकर्‍यावर काळाने घाला घातला. धुळे जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. यात ठिकठिकाणी शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. नागपूरसह विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने पावसाळ्यासारखी परिस्थिती निर्माण …

Read More »

अमेरिकन टेरीफअस्त्राचा ‘कडकडाट’

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रिसिप्रोकल टॅक्स धोरणांतर्गत 2 एप्रिल रोजी जगातील 60 देशांविरोधात आयात शुल्कात वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला आणि जगभरात खळबळ उडाली. अमेरिकन शेअर बाजारात विक्रमी घसरण झाली असून भारतीय शेअर बाजारातही मोठी पडझड झाली आहे. भारतावरही त्यांनी 26 टक्के आयात शुल्क लावले आहे. आयात शुल्काच्या भयामुळे आपण बचावाच्या भूमिकेत गेलो तर भारतालाही त्यातून काही साध्य होणार …

Read More »

वादळ बेताल ‘ग्रोक’ चे

भारतात आता चॅटजीपीटीनंतर आणखी एका एआय मॉडेलची जोरात चर्चा असून एलॉन मस्कच्या एक्सएआय कंपनीच्या ‘ग्रोक-3’ चा गाजावाजा होत आहे. या टूलने अनफिल्टर्ड आणि धाडसी वक्तव्यांनी हाहाकार माजवला आहे. एलॉन मस्क यांच्याप्रमाणेच ग्रोकही बिनधास्त आहे. त्याला जे योग्य वाटते, ते बोलून टाकतो. अगदी प्रश्न कोण विचारत आहे, याची पर्व न करता. शिवाय कोणत्या संदर्भात विचारणा केली जात आहे, याचा विचार न …

Read More »

कामराची टीका, शिंदेसैनिकांची गुंडागर्दी

400 वर्षांपूर्वी मरण पावलेल्या औरंगजेबानंतर महायुती सरकारला कुणाल कामरा नावाचा नवीन बळीचा बकरा सापडला आहे. एक महिन्यापूर्वी केलेल्या कार्यक्रमावरून आणि विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होऊन 10 दिवसानंतर स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराविरोधात सरकारने हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे. तत्पूर्वी त्याच गुन्ह्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चेला आणि ईडीला घाबरलेल्या राहुल कनालच्या नेतृत्वात शिंदेसैनिकांनी कुणाल कामरा याने वादग्रस्त गाणं म्हटलेल्या हॉटेलची तोडफोड केली. …

Read More »

संकट अमेरिकन कृषीमाल आयातीचे

अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक हेड यांनी भारताला विशेषतः अत्याधिक अनुदानित अमेरिकन शेती उत्पादनांसाठी आपला बाजार खुला करण्यास सांगितले. जॉर्ज बुश ज्युनियर यांच्या कार्यकाळात वाणिज्य सचिव असलेल्या एन्न वेनमॅन यांच्यापासून सुरू झालेले हे दुटप्पी धोरण अमेरिकेच्या विविध कृषी मंत्र्यांनी वेळोवेळी पुढे रेटले आहे. आज डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेल्या नव्या टॅरिफ युद्धामध्येही हेच घडत आहे. जागतिक व्यापार संघटनेतील अनेक वर्षांच्या …

Read More »

थकबाकीचे ‘जड झाले ओझे’

गेल्या काही वर्षांत क्रेडिट कार्डच्या चक्रव्यूहात अडकलेल्यांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. परिणामी, बँकिंग क्षेत्रापुढे, खास करुन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना त्यांच्या क्रेडिट कार्ड पोर्टफोलिओमध्ये वाढत्या थकबाकीचे आव्हान निर्माण झाले आहे. रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार, जानेवारी 2025 अखेर भारतातील एकूण क्रेडिट कार्ड थकबाकी 2.9 लाख कोटी रुपये होती, जी गेल्या वर्षभरात 13 टक्क्यांनी वाढली आहे. संपूर्ण बँकिंग क्षेत्रातील सरासरी क्रेडिट कार्ड थकबाकीचे …

Read More »

नागपूर दंगलीचे 1250 संशयितांवर गुन्हे

अखेर औरंगजेबाच्या कबरीने नागपूरच्या महाल परिसरात दंगल घडवून आणली. गेल्या सोमवारी झालेल्या हिंसाचारप्रकरणी नागपूर पोलिसांनी 1250 हून अधिक संशयितांवर गुन्हे दाखल केले आहेत. सोशल मिडीया पोस्ट आणि सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेऊन पोलिसांनी सहा गुन्हे नोंदवले आहेत. नागपुरातील कोतवाली, गणेशपेठ आणि तहसील पोलिस ठाण्यात हे गुन्हे दाखल केले असून आतापर्यंत 200 जणांची ओळख पटवून 60 आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, …

Read More »

अंतराळ दिग्विजयाला सलाम

नऊ महिन्यांपेक्षा अधिक काळ अवकाशात अडकून पडल्यानंतर अखेर भारतीय वंशांच्या अमेरिकी अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांची भारतीय प्रमाणवेळेनुसार 19 मार्च 2025 रोजी यशस्वीरित्या स्पेसएक्सच्या ड्रॅगन कुपीतून घरवापसी झाली. त्यांच्यासमवेत नासाचे अंतराळवीर निक हेग आणि रशियाचे अंतराळवीर अ‍ॅलेक्झांडर गोर्व्हुनोव्ह देखील भूतलावर परतले. हे चौघेही अवकाश स्थानकावर (आयएसएस) क्रु-9 चे सदस्य होते. त्यांची जागा घेण्यासाठी चार अन्य अंतराळवीर नासाचे अ‍ॅनी …

Read More »

‘शिवशाही’ची दारुणावस्था

आठ वर्षांपूर्वी भाजपा-शिवसेना युतीच्या काळात राज्यात शिवशाही बससेवेची सुरुवात झाली. राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना किफायतशीर दरामध्ये वातानुकूलित गाडीतून लांबचा प्रवास करता यावा या उद्देशाने शयन आणि आसनी अशा दोन्ही स्वरुपात या बससेवेचा प्रारंभ झाला खरा; परंतु सुरुवातीपासूनच या बसेसविषयी नागरिकांच्या तक्रारी पाहायला मिळाल्या. विशेषतः शिवशाहीला होणार्‍या अपघातांनी नागरिकांमध्ये भीती पसरलेली दिसून आली आणि आजही ती कायम आहे. नादुरुस्त बस, अधूनमधून बंद …

Read More »

मशिदीचे भोंगे फडणवीसांच्या निशाण्यावर

राज्यात यापुढे मशिदींवरील भोंग्यांचा आवाज एका मर्यादेपालिकडे वाढल्यास त्यावर कारवाई होणार आहे. ही कारवाई करण्याची जबाबदारी संबंधित पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाची असेल. तसेच कर्तव्यात कसुर करणार्‍या पोलिस निरीक्षकावर कारवाई होईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. पोलिसांना थेट कारवाई करण्याचे फारसे अधिकार नसल्याने संबंधित कायद्यात सुधारणा करण्याबाबत केंद्राशी संपर्क साधण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली. राज्यात अनेक …

Read More »