गुजरातमधील अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे जाणारे एअर इंडियाचे विमान गुरुवारी दुपारी १.३८ वाजता उड्डाणानंतर अवघ्या पाच मिनिटांत मेघानी नगर परिसरात कोसळले. या भीषण अपघातात विमानातील २४१ प्रवासी आणि तीन बी. जे. मेडिकल कॉलेजचे २० डॉटर व स्थानिक नागरिक असे २६१ जण ठार झाले आहेत. दैव बलवत्तर असल्याने रमेश विश्वकुमार नावाचा केवळ एक प्रवासी विमानातून …
Read More »विशेष
का कोसळले विमान?
अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळून झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आणि तितकीच चिंताजनक आहे. वास्तविक, बोईंग ७८७ ड्रीमलाइनर ही विमाने सामान्यतः सुरक्षित मानली जातात. एअर इंडियाकडे आजघडीला २५ पेक्षा अधिक ड्रीमलायनर विमाने आहेत. याखेरीज कतार, एतिहाद, ब्रिटिश एअरवेज, चायना साउदर्न, एअर फ्रान्स, एअर कॅनडा यांच्याकडेही बोईंगची विमाने आहेत. हे त्याचे पहिलेच ‘फॅटल हुल-लॉस’ मानले जात आहे. सदर घटनेतील वैमानिकही अनुभवी आणि …
Read More »चीनचा कृषी दहशतवाद ः जगापुढे नवा धोका
पाच वर्षांपूर्वी जगाला कोरोना महामारीच्या गर्तेत ढकलणार्या चीनने पुन्हा एकदा जैविक युद्ध छेडण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. यावेळी त्यांनी थेट जागतिक महासत्ता असणार्या अमेरिकेला लक्ष्य केले असून तेथील तपास यंत्रणांच्या सजगतेमुळे भला मोठा अनर्थ होता होता टळला आहे. अमेरिकेतील न्यायालयात उघड झालेल्या माहितीनुसार, चीनमधून दोन नागरिकांनी एक अत्यंत घातक फंगस अमेरिकेमध्ये आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्याकडून ‘फ्यूजेरियम ग्रॅमिनेरम’ नावाचा …
Read More »चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू
१८ वर्षांत पहिल्यांदाच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी) आयपीएलचे विजेतेपद जिंकले. मात्र हा विजय मृत्यूचे तांडव घेऊन आला. बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या आयपीएल २०२५ च्या विजयाच्या जल्लोषादरम्यान एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर बुधवारी सायंकाळी चेंगराचेंगरी झाली. त्यात किमान ११ जणांचा मृत्यू झाला असून ३३ हून अधिक लोक जखमी झाले. अनेकजण गंभीर असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शयता व्यक्त करण्यात आली होती. या दुर्दैवी …
Read More »कोविड पुन्हा का पसरतोय?
कोविड-१९ हा सतत बदलत राहणारा विषाणू असल्यामुळे त्याचे नवे उपप्रकार (सब-व्हेरियंटस्) वेळोवेळी उद्भवत असतात. त्यामुळे अनेक वेळा रुग्णसंख्येतील अचानक वाढीचे कारण हे नवीन उपप्रकारच ठरतात. तसेच, हवामान आणि ऋतूंचाही कोविडच्या प्रसारावर ठळक प्रभाव पडतो. २०२० आणि २१ मध्ये जागतिक तज्ज्ञांनी खात्रीशीररित्या सांगितले होते की, आपल्याला कोविडबरोबरच जगायचे आहे. म्हणजेच कोविडचा विषाणू हा सतत आपल्या वातावरणात राहणारच असून त्याचे नवीन उपप्रकार …
Read More »मिमांसा मान्सूनच्या लहरीपणाची
भारतीय हवामान खात्याने यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवलेली असतानाच मे महिन्याच्या उत्तरार्धातच वरुणराजाने आगमन करत धुवाँधार बरसात केली खरी; पण त्यानंतर मान्सूनने दडी मारल्यामुळे पेरण्यांसाठी खोळंबलेला शेतकरी संभ्रमात पडला आहे. भारतात आजही शेती ही अर्थव्यवस्थेची कणा आहे. शेतकर्यांना मान्सून एक विशिष्ट वेळेला येईल अशी अपेक्षा असते. पण हवामान बदलांमुळे मान्सूनचा लहरीपणा वाढला आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे महासागराचे तापमान वाढत आहे. …
Read More »राज्यात अतिवृष्टीने २१ जणांचा मृत्यू
मुंबईत सोमवारला दिवसभर पडलेला मुसळधार पाऊस आणि ढगाळी वातावरणामुळे दाणादाण उडाली असताना या वाईट हवामानाचा फटका मुंबई-अमरावती फ्लाईटला बसला. त्याच वेळी राज्यात झालेल्या अतिवृष्टीने केवळ पाच दिवसांत २१ जणांचा मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले आहेत. त्यामध्ये पाण्यात बुडून, वीज कोसळून, भिंत पडून मृत्यू झालेल्यांची संख्या अधिक आहे. याशिवाय सुमारे २२ प्राण्यांचाही पावसामुळे मृत्यू झाला आहे. पावसाने निर्माण झालेल्या …
Read More »तिसर्या स्थानाकडे जाताना…
जगातील आघाडीच्या पाच प्रमुख अर्थव्यवस्था असलेल्या देशांत भारताचा समावेश झाला आहे. आता तो तिसर्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असताना सर्वसामान्य नागरिकांना त्याचा लाभ मिळतो का? हे देखील पाहिले पाहिजे.यासाठी प्रत्येक व्यक्तीचे, प्रत्येक कुटुंबाचे उत्पन्न वाढणे गरजेचे आहे. तरच ‘विकसीत भारत’ ही संकल्पना प्रत्यक्षात येऊ शकते. यादृष्टीने सरकारने आणि नागरिकांनी आणखी व्यापकपणे काम करणे महत्त्वाचे आहे. १९९० च्या आसपास भारत आणि चीनच्या …
Read More »रणरागिणी रणांगणात…
शुक्रवार,३० मे,२०२५ हा भारतीय लष्कर आणि त्याचे खडकवासलामधील मूलभूत गुरुकुल म्हणजेच एनडीए या दोघांसाठी एक ऐतिहासिक दिवस ठरला. या दिवशी एकूण १७ महिला कॅडेटसच्या पहिल्या बॅचने, ३०० समकक्ष पुरुष कॅडेट्सबरोबर एनडीएच्या विस्तीर्ण परेड ग्राउंडमधून मार्च करत आपला अंतिम पग मेन ब्लॉकमध्ये टाकला. एनडीएसाठी हा खूप अभिमानास्पद, ऐतिहासिक क्षण आहे. या महिला कॅडेट्सनी एनडीएचा झेंडा उंच फडकवला आहे. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनं …
Read More »अपरिपक्वपणाचे दर्शन
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’चा पुढचा टप्पा म्हणून केंद्र सरकारने सात शिष्टमंडळे जगभरात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये निवडल्या गेलेल्या प्रतिनिधींवरुन सुरू झालेले राजकारण दुर्दैवी म्हणावे लागेल. यामध्ये दोन्ही बाजूंनी खुल्या मनाचा अभाव दिसतो. दोघेही याप्रसंगी मोठेपणा दाखवू शकले नाहीत. यावरुन असे दिसते की, राजकीय मतभेद आता मनभेदात रूपांतरित झाले आहेत. ही बाब देशासाठी चांगली नाही. अशा प्रकारची प्रतिनिधिमंडळे …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र