लेख-समिक्षण

महिला

रुक्ष केसांसाठी हेअरपॅक

केसांची योग्य देखभाल न केल्यास किंवा केसांमध्ये पुरेशी आर्द्रता नसेल तर केस खूप कोरडे होतात. कोरडे केस हे खूपच रुक्ष आणि राठ होत जातात तसेच ते केस आकर्षक दिसत नाहीत. अशा केसांची कोणतीही हेअरस्टाईल बनवणे देखील अवघड होते, आणि केसांची नैसर्गिक चमकसुद्धा कमी होतो. हे केस मऊ बनवण्यासाठी रासायनिक सौंदर्य उत्पादने अजिबात वापरू नका. त्याऐवजी घरगुती हेअर पॅक वापरल्यास केस …

Read More »

रेफ्रिजरेट वापराचे तंत्र

रेफ्रिजरेट किंवा फ्रिजचा योग्य वापर केल्याने तो दीर्घकाळ टिकतो आणि अन्नाचा ताजेपणा कायम राहतो. काही तांत्रिक गोष्टींचे पालन केल्यास फ्रिज अधिक कार्यक्षमतेने काम करू शकतो. १. फ्रिजचे योग्य तापमान सेटिंग: फ्रिजचा मुख्य भाग: १ ते ४ अंश सेल्सियस दरम्यान तापमान ठेवा. फ्रीजर विभाग: -१८ अंश किंवा त्याहून कमी तापमानावर ठेवा. विविध खाद्यपदार्थांसाठी: दुग्धजन्य पदार्थ, भाज्या, आणि उरलेले अन्न योग्य तापमानात …

Read More »

स्वच्छता पर्सची

पर्स ही फक्त एक अ‍ॅसेसरी नसून आपल्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. पैसे, कार्ड्स, मोबाइल, मेकअप प्रॉडट्स, पेन, बिल्स यांसह इतर आवश्यक वस्तू आपण पर्समध्ये ठेवतो. त्यामुळे वेळोवेळी पर्सची साफसफाई करणे आवश्यक आहे. स्वच्छ आणि नीटनेटकी पर्स केवळ आकर्षक दिसत नाही, तर तिचा उपयोग करतानाही आपल्याला सोयीचे ठरते. सोपे उपाय • पर्समधील सर्व वस्तू बाहेर काढा आणि गरजेच्या आणि न …

Read More »

पहिल्यांदा मेकअप करताना…

मेकअप करणे हा स्रियांचा जन्मसिद्ध अधिकार आहे, असं म्हटलं जातं. बदलत्या काळात सौंदर्याविषयीची आणि एकंदरीतच राहणीमानाबाबतची जागरुकता किंवा अवेअरनेस वाढल्यामुळे नियमित किंवा वारंवार मेकअप करणार्‍या मुली-तरुणी-महिलांची संख्या वाढली आहे. अर्थात, तुम्ही जर पहिल्यांदाच मेकअप करत असाल तर काही गोष्टी आवर्जून लक्षात घ्यायला हव्यात. मेकअप करण्यापूर्वी चेहरा सौम्य फेसवॉशने किंवा कोमट पाण्याने धुवा. • मेकअप करण्यापूर्वी त्वचेवर ५-१० मिनिटे बर्फ चोळा. …

Read More »

नकोशा केसांपासून सुटका हवीय?

मासिक पाळी सुरू झाल्यानंतर हार्मोनल बदलांमुळे शरीरात अनेक बदल दिसू लागतात. हात, पाय आणि शरीराच्या इतर भागांवर केस वाढणे हा या बदलांचा एक भाग आहे. ही बाब अगदी सामान्य असल्याने त्याबाबत फारशी काळजी करण्याचे कारण नाही. पण सौंदर्याखातर जर मुलींना अशा केसांपासून सुटका हवी असेल तर लेझर उपचार सर्वात प्रभावी आहे. परंतु, हे उपचार वयाच्या १८ वर्षापूर्वी घेऊ नयेत. यावर …

Read More »

जीमेलमध्ये नवे फीचर

गुगलने जीमेल वापरणार्‍यांसाठी ‘मॅनेज सबस्क्रिप्शन’ नावाचे एक अतिशय उपयुक्त फिचर सुरू केलं आहे. या फिचरच्या माध्यमातून वापरकर्तेआता एका क्लिकमध्ये कोणत्याही इमेल सबस्क्रिप्शनमधून सहजपणे बाहेर पडू शकतात. एवढंच नव्हे, तर एखाद्या ईमेल आयडीकडून आतापर्यंत तुम्हाला किती इमेल आले आहेत, याचीही माहिती यामध्ये मिळेल.सध्या हे फिचर अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिले जात आहे. लवकरच हे फिचर आयओएष आणि वेब वापरकर्त्यांसाठीही लागू …

Read More »

अव्वल यशाची कहाणी

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीए प्रवेशासाठी घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत देशातील एकूण 792 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. या परीक्षेत इमॉन घोष हा देशात पहिला, तर तिसरे स्थान पुण्यातील ॠतुजा वर्‍हाडे हिने मिळविला आहे. ॠतुजा हिने मुलींमध्ये देशात पहिला क्रमांक मिळविला आहे. एनडीएच्या लेखी परीक्षेच्या निकालांच्या आधारे या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. …

Read More »

सोशल मीडियावर मुलांचे फोटो शेअर करताय?

ऑस्ट्रेलियाने 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यावर बंदी घातल्यानंतर भारतातही 18 वर्षांखालील लहान मुलांना सोशल मीडियावर अकाउंट उघडण्यासाठी पालकांची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. डेटा प्रोटेक्शन 2025 च्या नवीन मसुद्यामध्ये या नियमांचा उल्लेख आहे. मुलांवर सोशल मीडियाचा होणारा नकारात्मक परिणाम लक्षात घेता हा निर्णय महत्त्वाचा ठरणारा आहे. परंतु दुसर्‍या बाजूला आज पालकच आपल्या मुलांना फेसबुक, इंस्टाग्राम, आणि इतर माध्यमांसमोर …

Read More »

पांडा पॅरेटिंग म्हणजे काय?

सर्व पालकांना त्यांच्या मुलांमध्ये स्वावलंबी होण्याची गुणवत्ता असावी असे वाटत असते. असे असले तरी बरेचदा मुलांचे संगोपन करताना पालकांकडून झालेल्या काही चुका मुलांचा आत्मविश्वास कमी करण्यास कारणीभूत ठरतात. परिणामी, भविष्यात मुलांना स्वतःशी संबंधित कोणताही निर्णय घेताना खूप संकोच वाटतो. याबाबत वेळीच उपाययोजना केल्या नाहीत तर आयुष्याच्या परीक्षेत ते इतर मुलांपेक्षा मागे पडू लागण्याची शक्यता असते. • मुलांमधील हरवलेला आत्मविश्वास परत …

Read More »

बाळ वारंवार जीभ बाहेर काढतेय?

लहान मुलांच्या बहुतांश सवयी सर्वांनाच आवडतात. पण काही विचित्र सवयी पालकांना घाबरवूनही जातात. यापैकी एक सवय म्हणजे वारंवार जीभ बाहेर काढणे. खरे पाहता लहान मूल जीभ बाहेर काढते तेव्हा गोंडस दिसते. पण सतत जर मूल जीभ बाहेर काढत असेल तर पालकांना या सवयीबाबत चिंता वाटते. लहान मूल त्याच्या ओठांना स्पर्श झालेल्या एखाद्या गोष्टीला प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न करते तेव्हा जीभ बाहेर …

Read More »