डोळे हा चेहर्याचे सौंदर्य खुलवणारा सर्वांत महत्त्वाचा भाग असतो. मेकअप करतानाही डोळ्यांकडे दुर्लक्ष झाल्यास अपेक्षित परिणाम साधले जात नाहीत. डोळ्यांचा मेकअप करताना आयलिड म्हणजे पापण्या अधिक आकर्षक, उठावदार आणि बोलक्या कशा दिसतील, याकडे लक्ष देणे गरजेचे ठरते. आयलिड मेकअपचे महत्त्व
डोळ्यांचा नैसर्गिक आकार अधिक उठून दिसतो.
चेहर्याला फ्रेश, यंग आणि ग्लॅमरस लुक मिळतो.
वेगवेगळ्या प्रसंगांसाठी स्टायलिश व ट्रेंडी लुक मिळतो.
हलकासा आयलिड मेकअपदेखील तुमच्या संपूर्ण मेकअपला परिपूर्ण लुक देतो.
आयलिड मेकअपचे प्रकार
न्यूड आयलिड मेकअपः रोजच्या लुकसाठी हलया बेज, पिंक आणि ब्राऊन शेड्सचा वापर.
स्मोकी आयलिड मेकअप ः— नाईट पार्टी किंवा ग्लॅमरस लुकसाठी ब्लॅक, ग्रे, चॉकलेट ब्राऊन शेड्स.
कट-क्रीज आयलिड मेकअप ः आयलिडचा उठावदार आणि डोळे मोठे दिसण्यासाठी दोन वेगवेगळ्या शेड्सचा वापर.
शिमरी किंवा ग्लिटर आयलिड मेकअप ः खास फंशन किंवा सण-उत्सवांसाठी सोनेरी, चंदेरी किंवा मेटॅलिक टच.
रंगीत किंवा पॉप कलर आयलिड मेकअप ः— फंकी आणि ट्रेंडी लुकसाठी निळे, जांभळे, हिरवे किंवा लालसर शेड्स.
कसा करायचा मेकअप?
आयशॅडो दीर्घकाळ टिकण्यासाठी आणि क्रिजिंग टाळण्यासाठी चांगला आय प्राइमर लावा. ब्लेंडिंगसाठी फ्लफी ब्रश, कट-क्रीजसाठी फ्लॅट ब्रश आणि स्मोकी इफेटसाठी पेन्सिल ब्रश वापरा. कोणत्याही शेड्समध्ये हार्श लाईन्स राहणार नाहीत याची काळजी घ्या. आयलिडवर हलया हाताने प्रॉडट लावा. जास्त रंग वापरल्यास मेकअप अनैसर्गिक दिसू शकतो.
डोळ्यांच्या आकारानुसार शेड्स निवडा. लहान डोळ्यांसाठी हलके आणि ब्राईट शेड्स, तर मोठ्या डोळ्यांसाठी गडद व मॅट फिनिश शेड्स उत्तम ठरतात. अधिक लाँग-लास्टिंग आणि इन्टेन्स लुकसाठी लिक्विड किंवा क्रीम-बेस्ड आयशॅडो निवडा. भुवयांच्या हाडावर आणि डोळ्याच्या आतील कोपर्यात हायलाइटर लावल्याने डोळे अधिक फ्रेश आणि मोठे दिसतात. पापण्यांवर मस्करा आणि परफेट विंग आयलाइनर लावल्याने मेकअपचा लुक पूर्ण होतो.
आयलिड मेकअप हा फक्त रंग लावण्यापुरता मर्यादित नाही, तर तो तुमच्या संपूर्ण लुकला नवा आकार देतो. योग्य शेड्स, टेनिस आणि प्रॉडट्स वापरून तुम्ही ग्लॅमरस कोणताही लुक सहज मिळवू शकता.
Check Also
लहान मुलांना लिहिण्यास शिकवण्याची योग्य पध्दत
लहान मुलांना लिहिण्यास शिकवणे हे पालकांसाठी मोठे आव्हान असते. अनेकदा पालक थेट अक्षरे गिरवण्यापासून सुरुवात …
पांचजन्य वृत्तपत्र