हवामानाची स्वतःची एक गती असते आणि सामान्य परिस्थितींमध्ये तो परिसंस्थेच्या चक्राला टिकवून ठेवण्याचा एक आवश्यक भाग असतो. पण गेल्या काही काळापासून हवामानाच्या चक्रात झपाट्याने बदल नोंदवला जात आहे. विशेषतः पावसामुळे होणार्या तडाख्यांमुळे स्थिती चित्र अधिकच बिघडत चालली आहे. प्रत्येक वर्षी संपूर्ण मान्सूनच्या हंगामात पावसामुळे देशाचे बहुतेक भाग कमीअधिक प्रमाणात प्रभावित होतात, पण आता आपत्तींची एक अखंड मालिकाच सुरू झाल्यासारखी स्थिती उद्भवली आहे.
गेल्या काही दिवसांत उत्तराखंडच्या धराली आणि हर्षिल येथेढगफुटी आणि त्यातून झालेल्या प्रचंड जीवितहानीसारख्या घटना घडल्या आणि त्यांनी देशाच्या इतर भागातील लोकांनाही हादरवून टाकले. आता काश्मीरच्या कठुआमध्येही ढगफुटी आणि भूस्खलनाच्या घटनेत सात जणांचा जीव गेला आहे. दुसरीकडे, महाराष्ट्रात पावसाच्या तडाख्याने १८ जणांचा मृत्यू झाला आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पुन्हा एकदा पावसाने दाणादाण उडवली आहे. मराठवाडा भागात ढगफुटीच्या घटनेत नांदेडचे पाच लोक बेपत्ता झाले आहेत. हिमाचल प्रदेशातील मंडी सहित अनेक भागांत ज्या पद्धतीने सतत वारंवार ढगफुटीच्या घटना घडत आहेत, त्यामुळे संपूर्ण स्थानिक लोकसंख्येसमोर स्वतःचा जीव वाचवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. अनेक भागांत आता पावसाच्या समांतर ढगफुटीच्या घटनेतही इतया झपाट्याने वाढ का दिसून येत आहेत? हा बकाल शहरी विकासाचा परिणाम आहे. शहरात रस्ते चांगले बांधले जाताहेत; पण पाण्याच्या निचर्याची योग्य आणि पुरेशी व्यवस्था केली जात नाही. परिणामी, थोड्याशा मुसळधार पावसातच पाणी साचणे, वाहतूक कोंडी याने त्रस्त होतो आणि झाडे पडल्याने जीवितहानी व मालमत्तेच्या हानीच्या अनेक घटना समोर येतात.
संपूर्ण जगात हवामानाच्या बिघडलेल्या स्वरूपाबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे आणि याला जागतिक तापमानवाढीचा परिणाम मानला जात आहे. नैसर्गिक आपत्ती कदाचित थांबवता येणार नाहीत, पण त्यापासून बचावाची योग्य तयारी केली गेली, तर आपत्तीमुळे होणारी जीवितहानी-मालमत्तेची हानी कमी नक्कीच करता येईल. पण सद्यस्थितीत डोंगराळ भागांत नद्यांच्या काठावर वस्ती बसवली जाते, पर्यटनाच्या दृष्टीने मोठमोठी हॉटेल्स उभारली जाताहेत. निसर्गातील हा हस्तक्षेप थांबत नाही तोवर जीवित व वित्तहानी टाळणे अशक्य आहे.– रंगनाथ कोकणे
Check Also
दिलासादायक माघार
केंद्र सरकारने बहुचर्चित ‘ऊस (नियंत्रण) आदेश 2026’ चा मसुदा तूर्त मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. …
पांचजन्य वृत्तपत्र