लेख-समिक्षण

Tag Archives: चालू घडामोडी

कहाणी जगावेगळ्या अब्जाधिशाची

रिचर्ड चार्ल्स निकोलस ब्रॅनसन 1970 सालात वीस वर्षाचा होता. पण डोक्यात स्वतःच व्यवसाय करायचा असे वारे शिरले होते. त्यांनी लोकांच्या घरी पार्सलने रेकॉर्ड पोहोचवण्याचा व्यवसाय करून पाहायचा असे ठरवले. त्यासाठी लंडनच्या ऑक्सफर्ड स्ट्रीट वर एक दुकान उघडले. तेव्हा निर्यातीच्या दर्जाच्या रेकॉर्डस विकण्याच्या प्रयत्नात चौकशी करण्यात आली. हे प्रकरण न्यायालयापर्यंत जाता-जाता राहिले कारण ब्रॅनसनने 33 टक्के कर चुकवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी …

Read More »

पुन्हा तारीख

महाप्रलय… कयामत… जजमेन्ट डे… बहुतांश धर्मविचारांमध्ये या संकल्पनेचा उल्लेख आढळतो. पृथ्वीचा आणि संपूर्ण सजीवसृष्टीचा नाश या संकल्पनेत अभिप्रेत आहे. या दिवसाचं स्मरण ठेवून आपली कृती असावी, पाप करण्याची दुर्बुद्धी होऊ नये, सत्कार्य करण्याची प्रेरणा मिळावी, हा हेतू यामागे आढळतो. महाप्रलय म्हणजे एका युगाचा अंत आणि दुसर्‍या युगाची सुरुवात, असं मानलं जातं. जगात पापाचा भार वाढला की प्रलय येतो. पुण्यवान लोकांना …

Read More »

सूर्याचा प्रवासवेग किती?

अंअतराळाच्या अनंत पसार्‍यात आपण कुठे आहे हे पाहायला गेलो तर कुणीही थक्क होऊ शकते. आपली पृथ्वी ज्या सौरमालिकेचा एक भाग आहे अशा लाखो सौरमालिका ‘मिल्की वे’ नावाच्या एकाच आकाशगंगेत आहेत. ब्रह्मांडात अशा ‘मिल्की वे’सारख्या अब्जावधी आकाशगंगा आहेत! ’मिल्की वे’ मध्ये आपला सूर्य किती वेगाने प्रवास करीत असतो हे जाणून घेणेही रंजक ठरेल. तुम्हाला माहिती आहे का, आपली पृथ्वी एकाच वेळी …

Read More »

टॉलस्टॉय आणि ती

जगप्रसिद्ध रशियन लेखक आणि तत्त्वज्ञ लिओ टॉलस्टॉय यांचा जन्म 9 सप्टेंबर 1828 या दिवशी एका श्रीमंत घराण्यात झाला. त्यांची जगभर गाजलेली साहित्यकृती म्हणजे ‘वॉर अँड पीस.’ मास्कोतील साहित्यप्रेमींना वाटते, की लिओ टॉलस्टॉय यांचा आपण मोठा सन्मान करावा. साहित्यप्रेमी त्यांच्या गावी जातात आणि निमंत्रण देतात. मॉस्कोला येण्यासाठी रेल्वेच्या तृतीय शेणीच्या डब्यात टॉलस्टॉय बसतात. अंगावर साधा कोट, साधेच कपडे आणि रेल्वे मास्कोच्या …

Read More »

खरा इशारा

कामाशिवाय घराबाहेर पडू नका,’ हा सरकारी इशारा आता ‘अफवांवर विश्वास ठेवू नका,’ या सल्ल्याइतकाच सपक, निरर्थक आणि वेडगळपणाचा वाटू लागलाय. डिजिटल कनेक्टिव्हिटीच्या युगात माहितीचा धबधबा डोक्यावर कोसळत असताना, त्यातली कोणती माहिती खरी आणि कोणती अफवा, हे ओळखण्याइतका नीरक्षीरविवेक 140 कोटी लोकांमध्ये आहे, असं गृहित का धरायचं? अफवांचं पीक येऊ नये असं वाटत असेल तर आणीबाणीच्या प्रसंगी सरकारी माहितीतंत्राची व्याप्ती वाढवायला …

Read More »

गुणकारी काळी गाजरे!

हिवाळा आला की बाजारात लालचुटुक गाजरंही दिसू लागतात. गाजरांचे सेवन आरोग्यासाठी लाभदायक असते. मात्र, केवळ लालच गाजरं असतात असे नाही. काळीही गाजरे असतात व ती लाल गाजरापेक्षाही अधिक गुणकारी असतात हे तुम्हाला माहिती आहे का? ‘सायन्स डायरेक्ट’वर प्रकाशित झालेल्या संशोधनात असे म्हटले आहे की काळ्या गाजरांमध्ये लाल आणि केशरी गाजरपेक्षिा जास्त फ्लेव्होनॉइडस् असतात. यापैकी क्वेरसेटीन, ल्यूटोलिन, केम्पफेरॉल आणि मायरिसेटिन प्रमुख …

Read More »

प्रतिभावंत खगोलशास्त्रज्ञ

डॉ. जयंत नारळीकर यांना नुकतीच 86 वर्षेपूर्ण झाली. 19 जुलै 1938 रोजी कोल्हापूर येथे जन्मलेल्या नारळीकर यांना घरातूनच विद्वत्तेचा वारसा लाभला. 1959 मध्ये केंब्रिज विद्यापीठाची ’ट्रायपास’ ही गणितातील अवघड परीक्षा वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी पास होऊन वडिलांप्रमाणे ते रँगलर झाले. यानंतर त्यांनी खगोलशास्त्रज्ञ डॉ. फ्रेड हॉएल यांच्या मार्गदर्शनाखाली विश्व उत्पत्तीसंबंधी संशोधन करून सिद्धांत मांडला. ’अंतर्गत स्फोट होऊन सूर्यापासून पृथ्वी आणि …

Read More »

विचित्र वास्तव

णूस जास्तीत जास्त किती वर्षेजगू शकतो? शतायुषी व्यक्ती अतिभाग्यवान मानली जाते. अर्थात, आपण किती जगतो यापेक्षा कसे जगतो हे अधिक महत्त्वाचं असतं. आपण सामाजिक नीतिनियम मोडले तर तो गुन्हा ठरतो आणि गांभीर्यानुसार त्याची शिक्षाही मिळते. गुन्हा अतिगंभीर असेल तर आजीवन कारावासाची शिक्षा मिळते. अशी व्यक्ती शतायुषी झाल्यास ती भाग्यवान नव्हे तर शापित ठरेल. हा विचार मनात येण्याचं कारण अ‍ॅडम ब्रिटन …

Read More »

मातीतल्या सोन्याची कमाई

आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील शीकलाहस्ती क्षेत्राजवळील गावांमध्ये मातीतून सोने काढले जाते. हे लोक अनेक पिढ्यांपासून हे काम करत आहेत. बंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नईसारख्या मोठ्या शहरांमध्ये अनेक प्रसिद्ध दुकानं आहेत, जिथे सोन्याचे दागिने बनवले जातात. दागिने बनवताना त्यातून धूळ, माती आणि इतर अनेक गोष्टी बाहेर टाकल्या जातात. हे लोक या निरुपयोगी वस्तू खरेदी करतात. त्यानंतर त्याच्यातून सोनं काढण्याचं काम सुरू होतं. …

Read More »

गौतम भंगीरची यशोगाथा

टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये विजेतेपद मिळविणार्‍या भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी गौतम गंभीर यांची निवड करण्यात आल्याने आगामी कालावधीमध्ये भारतीय क्रिकेटला निश्चितच वेगळी दिशा मिळण्याचे संकेत मिळत आहेत.एक खेळाडू म्हणून गौतम गंभीर यांची कारकीर्द निश्चितच महत्त्वाची होती. 2007 ची पहिली टी20 विश्वचषक स्पर्धा असो किंवा त्यानंतर 2011 मध्ये भारताने जिंकलेली एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा असो या दोन्ही स्पर्धेमध्ये 11 खेळाडूंमध्ये गौतम गंभीरचे …

Read More »