लेख-समिक्षण

गरज सुधारणांची

देशात लक्षित सार्वजनिक वितरण प्रणालीची सुरुवात जून 1997 मध्ये झाली. त्याआधीही देशात अन्नधान्य वितरणासाठी व्यवस्था होती, पण ती मुख्यत्वे सर्वसामान्यांसाठी होती. देशात लक्षित सार्वजनिक वितरण प्रणालीची उद्देश गरजू आणि गरीब लोकसंख्येसाठी अन्नधान्याचा पुरवठा सुनिश्चित करणे हा होता. सप्टेंबर 2013 मध्ये मंजूर झालेल्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याने या प्रणालीला एक नवी दिशा दिली. तथापि, आयसीआरआयईआरच्या अभ्यासानुसार, दरवर्षी 20 दशलक्ष टन अन्नधान्य …

Read More »

पहिल्या कामाचा किस्सा

आपल्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांना मनमुराद हसायला भाग पाडणारा अभेनेता अंशुमन विचारे यानं अचूक पंच काढत कायमच प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. कॉमेडीची बुलेट ट्रेन, फू बाई फू, महाराष्ट्राची हास्यजत्रा यांसारख्या विनोदी कार्यक्रमांमधून चाहत्यांना रोजच्या कामातून थोडासा विरंगुळा मिळवून देणार्‍या अंशुमन विचारेला मनोरंजन विश्वात कोणताही गॉडफादर नव्हता. साहजिकच, या क्षेत्रात त्याला प्रचंड स्ट्रगल करावा लागला आहे. आता वेगवेगळ्या विनोदी नाटकांमधून सिनेमांमधून प्रेक्षकांना …

Read More »

कृष्णधवल चित्रपटांची मोहिनी

तंत्रज्ञानाच्या सुधारणांमुळे सिनेमांचे चित्रिकरण, संगीत आणि दिग्दर्शन, सादरीकरण यात आमूलाग्र बदल झाला. प्रारंभीच्या काळात कृष्णधवल असणारे चित्रपट कालांतराने इस्टमनकलर झाले. चित्रपटात वास्तवांतील रंग आल्यानंतर प्रेक्षकांना कृष्णधवल चित्रपटांचा विसरच पडला. नव्या पिढीतील मुले अपवादानेच कृष्णधवल चित्रपट पाहतात. मात्र त्या काळातील चित्रपट कथानक, दिग्दर्शन, चित्रिकरण आणि अभिनयाची ताकद या आघाडीवर आजही सरस मानले जातात. 1970 च्या दशकानंतर कृष्णधवल चित्रपटांची निर्मिती जवळपास बंदच …

Read More »

अभ्यासाच्या सवयी

शैक्षणिक आयुष्यात अभ्यास ही सर्वात प्राधान्याची गोष्ट आहे. परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी अभ्यास महत्त्वाचा आहे. काही साध्या गोष्टीचे पालन करून अभ्यासाच्या चांगल्या सवयी लावता येतील. र्ी विद्यार्थी दशेत यश प्राप्तीसाठी वेळेचे व्यवस्थापन हे खूप अवघड कौशल्य असावे लागले. ते ज्यांच्याकडे असते त्यांच्यासाठी यश दूर नाही. अभ्यासाचे वेळापत्रक आधीच तयार करा. कोणत्या गोष्टीसाठी किती वेळ द्यायचा ठरवून घ्या आणि त्याचे काटेकोर …

Read More »

गच्चीवर बाग फुलवताना…

बाल्कनी आणि सदनिका यांचे जसे जवळचे नाते तसेच काहीसे टुमदार बंगला आणि त्यावरील प्रशस्त गच्चीचे आहे. पूर्वी गच्चीवरच्या जागेचा वापर फक्त घरातील अडगळीचे सामान ठेवण्यापुरताच होता.काळ बदलला, बंगल्याची आकर्षक डिझाइन्स आकार घेऊ लागली. अडगळीच्या सामानाची विल्हेवाट झाली आणि गच्चीवर फुलझाडांची कुंडी अवतरली. गच्चीवरील या उद्यानात मोठ़या प्रमाणावर हिरवळ, छोटे वृक्ष, फुलझाडे यांना प्राधान्य द्यावे. या या बागांची निगराणी ठेवणे हे …

Read More »

आता अन्न पदार्थांचं स्कॅनिंग

सध्या अनेक लोक ‘कॅलरी कॉन्शस’ झालेले आहेत. त्यामुळे समोर आलेल्या अन्नपदार्थांमध्ये किती कॅलरीज आहेत, याबरोबरच त्यामध्ये कोणकोणते घटक आहेत हे जाणून घेण्याची त्यांची इच्छा होत असते. शिवाय अन्नात अनेक अपायकारक तसेच उपकारक घटकही असतात व ते ओळखणारा स्कॅनर संशोधकांनी विकसित केला आहे. तो सहज वापरता येणारा तर आहेच, पण स्मार्टफोनलाही तो जोडता येतो. आपण जे अन्न खातो त्यात अ‍ॅलरजेन, रसायने, …

Read More »

उद्देश महत्वाचा

कोणत्याही कार्यामागील, कर्मामागील कार्यकारणभाव हा महत्त्वाचा असतो. यामध्ये वैयक्तिक हिताचा उद्देश असेल तर त्याला स्वार्थ म्हणतात आणि लोककल्याणाचा उद्देश असेल तर त्याला परोपकार म्हणतात. बहुतेकांचा जीवनातील जास्तीत जास्त काळ हा स्वार्थासाठीच व्यतीत होतो. त्यातून आनंद मिळत असेलही; पण त्यापेक्षाही आंतरीक आनंद हा परोपकारातून मिळतो. स्वामी विवेकानंदांची ही कहाणी यासाठी उद्बोधक आहे. एकदा स्वामी विवेकानंद प्रवासात अलवरला पोहोचले. अल्वरचे महाराज स्वामीजींच्या …

Read More »

दावेबाज ‘किंगमेकरांना’ धडा

आमच्याशिवाय सरकार बनणार नाही, आम्हीच सरकार स्थापन करणार, माझ्याकडे अमुक समाजाला आरक्षण देण्याचा फॉर्म्युला आहे, पण मी सांगणार नाही, सत्तेत सहभागी होणार, आता अमुक पक्षाचा मुख्यमंत्री होणार, पुढच्या निवडणुकीत आमचाच मुख्यमंत्री होणार, आता ताकद दाखवून द्या, सुपडा साफ झाला पाहिजे, ही गेल्या काही महिन्यांपासून सतत कानावर धडकणारी विधाने आहेत. अशी विधाने करणार्‍या नेत्यांचा मतदारांनी विधानसभेच्या या निवडणुकीत एकदाचा सोक्षमोक्ष लावून …

Read More »

भीतीदायक घर

महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा निवडणुकीच्या धामधुमीत अधूनमधून चर्चेला येत होता. अर्थात, चर्चेत तसे बरेच मुद्दे येतात आणि जातात. नंतर त्यांचं गांभीर्य किती उरतं, हे उघड गुपित आहे. पण महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा प्रत्येक कुटुंबाशी निगडीत आहे आणि केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जवळजवळ सर्वच राज्यांमध्ये गंभीर बनलाय. घरातून बाहेर पडणारी स्त्री, मग ती कोणत्याही वयोगटातील असो, घरी येईपर्यंत सुरक्षित राहील की नाही याबाबत …

Read More »

अखेर फडणवीस पुन्हा आले…

2019 मधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये ‘मी पुन्हा येणार’, असे म्हणणारे देवेंद्र फडणवीस भाजपच्या मुख्यमंत्रिपदावर पुन्हा आले आहेत. अखेर एकनाथ शिंदे यांनी त्यांना मुख्यमंत्री होण्यासाठी पाठिंबा दिला. अडीच वर्षे मुख्यमंत्री म्हणून मला फडणवीस यांनी सहकार्य केले, असे शिंदे म्हणाले. त्यानंतर भाजप नेते अमित शहा यांनी फडणवीस यांच्या राज्याभिषेकाचे सोपस्कार पूर्ण केले. दोन दिवस माध्यमांशी न बोललेल्या मुख्यमंत्री शिंदे यांनी बुधवारी …

Read More »