कबड्डी आणि खोखोसारखे क्रीडाप्रकार हे वर्षानुवर्षे गावाखेड्यातील शाळांमधील मुले-मुली खेळत आले आहेत. या मैदानी खेळातून शारीरिक विकासाबरोबरच सांघिकतेचे गुण विकसित होत जातात. परंतु तरीही या क्रीडाप्रकारांची क्रिकेटच्या तुलनेत उपेक्षाच झाली होती. मध्यंतरी कबड्डी प्रो लिगमुळे या खेळाचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनद्वारे खो-खो विश्वचषक स्पर्धांचे आयोजन करुन आणखी एक मोठे पाऊल टाकण्यात आले. या स्पर्धेमध्ये भारताच्या पुरुष …
Read More »TimeLine Layout
January, 2025
-
20 January
अरमान अडकला विवाहबंधनात
बॉलिवूड चित्रपटांमध्ये अनेक लोकप्रिय गाणी गाणारा गायक अरमान मलिक विवाहबंधनात अडकला आहे. अरमानने त्याची प्रेयसी आशना शॉफसोबत लग्न केले आहे. दोघांनी त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दोघे अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. अखेर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. अरमान आणि आशना हे 2017 पासून एकमेकांना डेट करत होते. ऑगस्ट 2023 मध्ये त्यांनी साखरपुडा देखील केला आहे. अखेर …
Read More » -
20 January
बॉलिवूडच्या मानगुटीवर ‘डिजिटल लीक’चे वेताळ
सिध्याच्या इंटरनेटयुगात डाटा चोरीला उधाण आले आहे. सिनेसृष्टीही त्यापासून दूर राहिलेली नाहीये. ‘डिजिटल लीकेज’ ही समस्या बॉलीवूडच नव्हे तर जगभरातील सर्वच चित्रपट उद्योगांसाठी चिंतेचे कारण ठरत आहे. एखादा चित्रपट किंवा वेब मालिका लीक झाल्यास टॉकीज सोडा ओटीटीवर देखील प्रदर्शित होत नाही. त्याचवेळी लीक म्हणजे फुटलेला चित्रपट आवडला नाही तर त्याबाबत प्रेक्षकांचे नकारात्मक मत तयार होते. म्हणजेच या फुटीचा कळत नकळतपणे …
Read More » -
20 January
नवरदेव आणि फेटा
दुल्हे का सेहरा सुहाना लगता है’ असं एक प्रसिद्धी चित्रपटगीत आहे. लग्न चित्रपटाच्या पडद्यावरचं असो किंवा वास्तव आयुष्यातील असो, नवर्या मुलाचा चेहरा खर्या अर्थाने त्याच्या डोक्यावरील फेट्यामुळेच उठून दिसत असतो. नवर्या मुलाच्या डोक्यावर फेटा बांधणं हा केवळ आपल्या परंपरेचाच भाग आहे असं नाही तर तो नवर्या मुलाचा लूकही खास बनवतो. फॅशनेबल नवर्या मुलाने फेट्याची निवड करताना थोडीशी चूक केली तर …
Read More » -
20 January
थंडीत फ्रीज वापरताना…
थंडीचे दिवस सुरू झाले की बहुतांश लोक घरातील एअर कंडिशनर, फॅनचा वापर बंद करतात.रेफ्रिजरेटरचे पाणी पिणेही बंद करतात. किंबहुना, फ्रीजचा वापरही कमी होतो. संपूर्ण हिवाळ्यात मर्यादित तापमानात फ्रीज चालवू शकतो. पाण्याच्या बाटल्या फ्रीजमध्ये ठेवणे बंद केले असेल तर तुम्ही ते कमी तापमानावर देखील सेट करू शकता. हिवाळ्यात, दूध, भाज्या, फळे, शिजवलेले अन्न ताजे ठेवणसाठी तुम्ही कमी तापमान ठेवूनही काम करू …
Read More » -
20 January
खोबरे कोणते खावे?
नारळ पाण्याबरोबरच त्याचे खोबरेही आरोग्यासाठी लाभदायक ठरत असते. मात्र ओले खोबरे अधिक गुणकारी की सुके असा प्रश्नही अनेकांना पडत असतो. आता तज्ज्ञांनी याचे उत्तर दिले आहे. ओल्या नारळाचा स्वाद हलका गोड आणि नटी टेस्टचा असतो. सुके खोबरेही गोड असते पण ते अधिक चावावे लागते. नारळ आतून कोरडा पडला की त्याचे खोबरे करवंटीपासून वेगळे होते. असे खोबरे वाळवून ते साठवून ठेवले …
Read More » -
20 January
यशाचा राजमार्ग
प्रयत्ने वाळूचे कण रगडता तेल ही गळे… हे सुवचन आपण अनेक वर्षे ऐकत आहोत. ध्येयवेड्या तरुणांना आदर्श आणि प्रेरणा देणारी आयएएस विजय वर्धन यांची ही यशोगाथा आहे. 35 वेळा विविध शासकीय सेवांच्या परीक्षांमध्ये अपयश आले. पण त्यांनी हार मानली नाही. अतोनात प्रयत्न करून ते ’आयपीएस’ आणि मग ’आयएएस’ झाले. विजय वर्धन हे मूळचे हरियाणाचे. त्यांचे शालेय शिक्षण हरियाणातील सिरसा येथे …
Read More » -
20 January
पंतप्रधानांचा कानमंत्र
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत यशानंतर महायुतीच्या रथाचे घोडे चौखूर उधळणे स्वाभाविक होते. महायुतीच्या घटक पक्षातील राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार अतिउत्साहात येणे साहजिकच होते. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईमध्ये आल्यानंतर गोपनीय संवाद कार्यक्रमात महायुतीच्या आमदारांना निमंत्रित केले होते. मोदी यांनी या नवनिर्वाचित आमदारांना आणि राज्यातील ज्येष्ठांनाही गोपनीय मंत्र देण्याचे ठरविले होते. स्वत: मोदी यांनी …
Read More » -
20 January
आजारावर पाळत
नव्वद तास काम करण्याची अपेक्षा व्यक्त झाल्यानंतर कार्यसंस्कृतीवर बरीच चर्चा सुरू आहे. विनोदही चाललेत. मीम्स बनतायत. कर्पोरेट कल्चर तारक की मारक याविषयी उद्बोधक आणि गंभीर संवादही सुरू आहेत. खरंच आपण दिवसाकाठी किती तास काम केलं पाहिजे? आठवड्यातून एक दिवस सुट्टी गरजेची आहे का? गरजेची नसेल तर साप्ताहिक सुट्टीची कल्पना पुढे कशी आली? वर्षानुवर्षेअंगवळणी पडल्यानंतर रविवारची सुट्टी अचानक रद्दच झाली तर..? …
Read More » -
20 January
राम मंदिरानंतरच खर्या स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ – सरसंघचालक
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असणार्या कुंभमेळ्यामध्ये नेहमीप्रमाणेच नागा साधूंकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात नागा साधूंबरोबर विविध रिल्सही तयार केल्या जात आहेत. नागा साधूंचा संबंध शैव परंपरेशी जोडलेला आहे. सनातन परंपरेचे रक्षण करण्यासाठी आणि या परंपरेला पुढे नेण्यासाठी प्रत्येक महाकुंभात वेगवेगळ्या संन्यासी आखाड्यांमध्ये नागा साधू बनण्याची प्रक्रिया अवलंबली जाते. नागा साधूंना प्रपंचाशी, संसाराशी काही देणेघेणे नसते. …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र







