प्रत्येक प्राण्याचे किंवा प्रजातीचे आयुर्मान वेगवेगळे असते. ते तसे का असते याबाबत संशोधकांना कुतूहल वाटत होते. याचे कोडे डार्विनच्या काळापासून उत्क्रांतिवादी जीवशास्त्रज्ञांना सापडलेले नाही, पण आता एका नव्या प्रारूपानुसार कुठल्याही सजीवाच्या प्रजातीचे आयुर्मान हे उत्क्रांतीतील बदलांशी व त्यातून निर्माण होणार्या दडपणांशी संबंधित असते, असे आढळले आहे. या संशोधनाचा लाभ मानवातील वृद्धत्वाच्या प्रक्रियेचा वेग कमी करणारी तंत्रे व औषधांचा शोध लावण्यासाठी …
Read More »ऋणातून उतराई…
ही हृदयस्पर्शी घटना जरी १८७४ मधली असली, तरी तिचा शेवट अत्यंत नाट्यमय पद्धतीने १९३० मध्ये झाला. जगप्रसिद्ध संगीतकार, पोलंडचे रहिवासी असलेले पेड्रेवस्की अमेरिकेच्या दौर्यावर होते. त्यांच्या दौर्याचा उद्देश होतासंगीत कार्यक्रमांमध्ये भाग घेणे. प्रत्येक वेळी त्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी चुरस असायची. मात्र, या वेळी त्यांनी एका साध्या लोहाराच्या तरुण मुलाकडे हे आयोजन करण्याची जबाबदारी दिली. हेतू असा होता की, या निमित्ताने …
Read More »वाघांचे भविष्य धोक्यात
देशभरातील जंगलांमध्ये ज्या प्रकारे अतिक्रमण, खाणकाम आणि मानवी हस्तक्षेपाचा कहर सुरू आहे. यामुळे जंगलांमधील वाघांचे सुरक्षित अधिवास धोयात आले आहेत. जंगलांची सतत होत असलेली कत्तल त्यांच्या आहाराच्या समस्याही वाढवत आहे. जंगलाच्या आत रस्त्यांचे जाळे, पर्यटनामुळे होणारा गोंगाट आणि मानवी हालचालींमुळे नैसर्गिक वातावरणाचे संतुलन बिघडले आहे. याचा थेट परिणाम असा झाला आहे की, आता वाघ जंगलाबाहेर पडू लागले आहेत. पाणी व …
Read More »‘ट्रुथ सोशल’ च्या अंतरंगात….
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या संदर्भात वारंवार चर्चेत येणारे एक खास सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणजे ट्रुथ सोशल होय. ट्विटर, थ्रेड्स आणि फेसबुक यांसारखेच हेही एक सोशल मीडिया व्यासपीठ आहे, जिथे वापरकर्तेआपले विचार, पोस्ट किंवा प्रतिक्रिया शेअर करू शकतात. ट्रम्प यांच्या वक्तव्यांचा किंवा निर्णयांचा उल्लेख होताच या प्लॅटफॉर्मचे नाव पुढे येते, कारण ट्रम्प प्रामुख्याने याच माध्यमातून संवाद साधतात. त्यांच्या या पोस्ट्सचे …
Read More »दिवाळीनंतर पालिका निवडणुकीचा बार
राज्यात दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. पण या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅड मशीन वापरले जाणार नाहीत, असे संकेत राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले आहेत. ओबीसी आरक्षण लॉटरी पद्धतीने काढले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकत्रित होतील, या चर्चेने जोर धरला होता. परंतु मनुष्य बळाच्या अभावी निवडणुका एकत्रित निवडणूक घेणे शय नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. …
Read More »भारत झुकेगा नही…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसर्या कार्यकाळात भारत व अमेरिकेतील व्यापार आणि गाढ मैत्री ज्या चमकदार उंचीवर पोहोचेल, अशी जी अपेक्षा होती, ती १ ऑगस्ट रोजी ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केल्यानंतर आणि ६ ऑगस्ट रोजी रशियाकडून तेलखरेदीचे कारण पुढे करत अतिरिक्त २५ टक्के दंडात्मक शुल्कआकारणी जाहीर केल्यामुळे धुळीस मिळाल्याचे दिसत आहे. इतकेच नाही, तर ट्रम्प यांनी …
Read More »जेटिनल फीचर मॅपिंगची किमया
हासन लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आलेल्या आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवगौडा यांचे नातू असलेल्या प्रज्वल रेवण्णा याला नुकतेच बेंगळुरू येथील विशेष कोर्टाने बलात्काराच्या आरोपात जन्मठेपेची शिक्षा आणि ११.५० लाख रुपयांचा दंड ठोठावला. हे प्रकरण केवळ राजकीयदृष्ट्या नाही, तर न्यायवैज्ञानिक पातळीवरही ऐतिहासिक ठरले कारण भारतात पहिल्यांदाच जेनिटल फीचर मॅपिंग या फॉरेन्सिक तंत्रज्ञानाचा वापर न्यायालयीन साक्ष म्हणून करण्यात आला. प्रकरणाची …
Read More »किस्सा अशोक-सचिन मैत्रीचा
मराठी सिनेसृष्ठीतील नवदीचा काळ ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, महेश काठोरे, लक्ष्मीकांत बेर्डे आणि सचिन पिळगावकर यांनी गाजवला. आजही टीव्हीवर या कलाकारांचे चित्रपट लोकं मोठ्या आवडीने पाहतात. या तिघांची सिनेमातील केमिस्ट्री तर विलक्षण होतीच; पण प्रत्यक्ष जीवनातही ते चांगले मित्र होते. अलीकडेच अशोक सराफ यांनी रेडिओ नशाला दिलेल्या मुलाखतीत सचिन पिळगावकर यांच्याविषयीच्या काही आठवणी सांगितल्या. ते म्हणाले, सचिनसोबत माझी आधी कधीच …
Read More »संवेदनशील दिग्दर्शकाची जन्मशताब्दी
भारतीय सिनेमाच्या इतिहासात फारच कमी चित्रपट दिग्दर्शकांनी भांडवलशाही व्यवस्थेच्या पोकळपणाला आणि त्यातून जन्माला येणार्या अधोगामी मूल्यांना तीव्रतेने, जिव्हाळ्याने आणि कलात्मकतेने दाखवले आहे. या दुर्मिळ आणि संवेदनशील दिग्दर्शकांंमध्ये गुरुदत्त यांचे स्थान अग्रक्रमावर आहे. त्यांनी जे काही केले ते त्या काळात केवळ धाडसीच नव्हे, तर सामाजिक भान जागवणारे कार्य होते. त्या काळात भारत स्वतंत्र झाला होता आणि राष्ट्र उभं करण्याची प्रक्रिया सुरू …
Read More »नैराश्याने मेंदूचे आकुंचन
निसर्गाची सर्वात कुशल रचना म्हणजे मानवी मेंदू. मेंदू व पर्यायाने मानसिक आरोग्य चांगले ठेवण्याकडे गांभीर्याने लक्ष देणेही आवश्यक असते. सध्याच्या धकाधकीच्या, असुरक्षित वातावरणाच्या जीवनात अनेक लोक नैराश्यासारख्या मानसिक समस्यांच्या गर्तेत अडकत आहेत. अनेक वर्षांच्या जुन्या नैराश्यामुळे मेंदूतील हिप्पोकॅम्पस (अश्वमीन) भागाचे आकुंचन होण्याची शक्यता असते. मेंदूच्या याच भागात नवीन स्मृती तयार होत असतात, असे नऊ हजार लोकांचा अभ्यास करून सादर केलेल्या …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र