लेख-समिक्षण
  • 9 august 2026

अंक मिळणेसाठी


एकूण वाचक संख्या : 4212

TimeLine Layout

January, 2026

  • 11 January

    चिंतनशील व्यक्तिमत्वाचा वियोग

    नव्या वर्षाची सुरुवात एका दु:खदायक बातमीने झाली. ज्येष्ठ हिंदुत्ववादी विचारवंत व लेखक डॉ. अशोकराव मोडक यांचे नुकतेच निधन झाले. गेली काही वर्षेते आजारी होते हे खरे असले तरी ही बातमी दु:खद आहे. कारण ज्या व्यक्ती आपल्याबरोबर दीर्घकाळ असल्या पाहिजेत असे वाटत असते अशा अत्यंत कमी व्यक्तींपैकी अशोकराव होते. एक ज्ञानसंपन्न व सक्रीय आयुष्य जगून अशोकरावांनी ह्या जगाचा निरोप घेतला आहे. …

    Read More »
  • 11 January

    आकोटात भाजपा-एमआयएम युती?

    अकोला जिल्ह्यातील आकोट नगरपरिषदेत आक्रित घडले होते. साप आणि मुंगूस याप्रमाणे एकमेकांना पाण्यात पाहणारे जानी दुष्मन एकत्र आले. हिंदुत्ववादी भाजपाने इस्लामवादी एमआयएमसोबत युती केली होती. धर्माधर्मात भांडण लावून सामान्य लोकांना एकमेकांचे हत्याकांड करण्यास उद्युक्त करणारे हे दोन पक्ष सत्तेसाठी काहीही करण्यास तयार झाले. त्यावरून राज्यभरात विरोधकांनी भाजपावर टीका केली. हे प्रकरण अंगाशी येताच मुख्यमंत्र्ाी देवेंद्र फडणवीस यांनी यावर नाराजी व्यक्त …

    Read More »
  • 11 January

    बँकिंग क्षेत्राची नवी पहाट

    भारतीय बँकिंग क्षेत्राने गेल्या दशकभरात अत्यंत आव्हानात्मक प्रवास केला आहे. एकेकाळी थकीत कर्जांच्या (एनपीए) ओझ्याखाली दबलेल्या बँका आता सुदृढ आर्थिक आरोग्याचा अनुभव घेत आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने 31 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध केलेल्या सहामाही ‌‘वित्तीय स्थिरता अहवाला‌’नुसार, बँकांचे जीएनपीए म्हणजेच एकूण थकित कर्जांचे प्रमाण सप्टेंबर 2025 पर्यंत कमी होऊन 2.1 टक्क्यांवर पोहोचले आहे. रिझर्व्ह बँकेच्या अंदाजानुसार, सध्याची स्थिती कायम राहिल्यास …

    Read More »
  • 11 January

    ‌‘पाणीबळी‌’ ना जबाबदार कोण?

    ज्या शहराला गेल्या सात वर्षांपासून देशातील सर्वात स्वच्छ शहराचा मान दिला जात होता, त्या शहरात पिण्याच्या पाण्यात सांडपाण्याचे पाणी मिसळल्यामुळे डझनभराहून अधिक लोकांचा मृत्यू व्हावा ही बाब लाजिरवाणी आहे. सांगितले जाते की इंदूरच्या भागीरथपुरा परिसरात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या पाईपलाइनमध्ये सांडपाण्याचे पाणी झिरपल्याने हजारो लोकांचे जीवन धोक्यात आले. या घटनेनंतर सुमारे 100 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, शेकडो लोक …

    Read More »
  • 4 January

    येतोय ‌‘शूटआऊटचा‌’ तिसरा भाग

    बॉलिवूडमधील सर्वात चर्चिल्या गेलेल्या ‌’शूटआऊट‌’ या गुन्हेगारी विश्वावर आधारित फ्रँचायझीचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‌’शूटआऊट ॲट लोखंडवाला‌’ (2007) आणि ‌’शूटआऊट ॲट वडाळा‌’ (2013) या दोन यशस्वी चित्रपटांनंतर, निर्माती एकता कपूर आता या मालिकेचा विस्तार करण्यासाठी सज्ज झाली आहे. ताज्या अहवालानुसार, अभिनेता हर्षवर्धन राणे या ‌’शूटआऊट इन दुबई‌’ चित्रपटात प्रमुख भूमिकेत असेल. या चित्रपटाचे आधीचे दोन्ही भाग मुंबईतील …

    Read More »
  • 4 January

    चरित्र अभिनेत्यांच्या दुनियेत…

    बॉलिवूडमध्ये आता केवळ ‌‘हिरो‌’ची चलती राहिलेली नाही. गेल्या काही वर्षांत चरित्र अभिनेत्यांचे (उहरॲरलींशॲ अॲींळीीीं) स्थान कमालीचे भक्कम झाले आहे. एकेकाळी नायकाच्या सावलीत वावरणारे हे कलाकार आता स्वतःच्या खांद्यावर चित्रपट पेलू लागले आहेत. परेश रावल, प्रकाश राज यांच्यापासून ते पंकज त्रिपाठी आणि मनोज बाजपेयींपर्यंतच्या कलाकारांनी हे सिद्ध केले आहे की, अभिनय सकस असेल तर पडद्यावरची ‌‘स्पेस‌’ महत्त्वाची नसते, तर भूमिकेची व्याप्ती …

    Read More »
  • 4 January

    अभिमान वाटाव्या अशा चार गोष्टी….

    कधी-कधी पालकांशी एखाद्या मुद्द्यावरून चर्चा करणारे मुले नकळतपणे बोलून जातात की, तुम्हाला काय माहित किंवा तुम्हाला त्यात काय कळते? असं जेव्हा मुलं किंवा मुली बोलतात तेव्हा पालकांना वाटू लागते की आपला पाल्य मोठा होऊ लागला आहे. परंतु त्याचवेळी मुलांनाहीअसा भास होतो की आपण आता मोठे होऊ लागलो आहेत. आई-वडिलांपेक्षा आपल्याला अधिक कळते किंवा समजते. परंतु स्वत:चा अभिमान बाळगण्यासाठी नोकरी असणे, …

    Read More »
  • 4 January

    व्यायाम जरुर करा; पण…

    अलीकडेच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. व्यायामाच्या अतिरेकामुळे 24 वर्षांच्या एका तरुणीचे स्नायू तुटण्याचा प्रकार घडला आहे. या युवतीला आधीपासूनच रॅबडोमायोलिसिस नावाचा एक गंभीर विकार होता. या व्याधीमध्ये स्नायू सहजगत्या तुटण्याची शक्यता असते. ती स्पिनिंग नावाचा इनडोअर सायकलिंग एक्सरसाईज करत होती. यामध्ये मुख्यत्वे करुन पायांच्या आणि नितंबांमधील मोठ्या स्नायूंवर मोठा ताण येतो. हा व्यायाम सुरु केल्यानंतर तिने याचे प्रमाण …

    Read More »
  • 4 January

    ‌‘एआय‌’ मुळे विचारक्षमतेवर परिणाम

    आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) वापरणाऱ्या व्यक्तींच्या टीकात्मक विचारक्षमतेवर परिणाम होत असून, त्यामुळे त्या अधिक अविचारी बनत असल्याचा इशारा एका नव्या संशोधनातून देण्यात आला आहे. मायक्रोसॉफ्ट आणि कार्नेजी मेलॉन विद्यापीठाच्या संयुक्त संशोधनात असे आढळून आले की, जे वापरकर्तेएआयच्या अचूकतेवर जास्त विश्वास ठेवतात, ते त्या साधनांच्या निष्कर्षांचा कमी विचार करतात. हे संशोधन व्यवसाय, शिक्षण, कला, प्रशासन आणि संगणक क्षेत्रातील 319 व्यावसायिकांवर आधारित आहे. …

    Read More »
  • 4 January

    पोलिओग्रस्त मुलगी ते यशस्वी उद्योजिका

    संकटे माणसाला संपवायला येतात की नवी उभारी द्यायला, हे सर्वस्वी त्या व्यक्तीच्या प्रबळ इच्छाशक्तीवर अवलंबून असते आणि हेच पाटण्याच्या ममता भारती यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे. वयाच्या पाचव्या वर्षी पोलिओने शरीराची साथ सोडली आणि संपूर्ण शरीर जवळपास अर्धांगवायूने ग्रासले गेले, मात्र मनाची उभारी तसूभरही कमी झाली नव्हती. पाटण्यातील अनेक रुग्णालयांचे उंबरठे झिजवूनही जेव्हा डॉक्टरांचे प्रयत्न अपयशी ठरले, तेव्हा …

    Read More »