लेख-समिक्षण

दावोसमध्ये 14.50 लाख कोटींचे करार

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे वार्षिक बैठकीत पहिल्याच दिवशी तब्बल 14 लाख 50 हजार कोटींचे गुंतवणूक करार करण्यात आले. या गुंतवणुकीसोबतच राज्यात 15 लाख रोजगार संधी निर्माण होणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, गुंतवणूक आणि सेवा विभागाच्या माध्यमातून यंदा विविध विभागांनी आणि विविध क्षेत्रातील उद्योगांच्या प्रतिनिधी समवेत मुख्यमंत्री फडणवीस, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. …

Read More »

अर्थसंकल्प दिलासादायक ठरेल?

येत्या 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून सादर होणारे 2026-27 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प अनेकार्थांनी महत्त्वाचा असणार आहे. हा अर्थसंकल्प देशाच्या आर्थिक परिस्थितीला ऐतिहासिक वळण देणारा असेल. अर्थमंत्र्यांना मध्यमवर्गाची क्रयशक्ती वाढवण्याच्या अनेक वर्षांच्या जुन्या अपेक्षा, गुंतवणूकदारांच्या आकांक्षा आणि सरकारच्या दिलासा व वेगवान विकासाच्या रणनीतीनुसार संतुलित, दूरदर्शी आणि संवेदनशील बजेटसाठी अतिशय विचारपूर्वक ताळमेळ राखावा लागेल. सामान्य माणसासाठी दिलासा, बाजारासाठी गती आणि …

Read More »

रथसप्तमीचा भावार्थ

माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी ‌‘रथसप्तमी‌’ हा उत्सव देशभरात विविध पद्धतींनी साजरा केला जातो, पण त्यामागील भावना समान आहे. उत्तर भारतात छठपूजेसारखी सूर्योपासना, दक्षिणेत भव्य मंदिर विधी, पश्चिम भारतात तिळगुळाचे पदार्थ,तर पूर्व भारतात कृषीपर परंपरा, असे त्याचे विविध रंग दिसतात. तरीही सूर्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे, निसर्गाशी सुसंवाद साधणे आणि जीवनातील अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा संकल्प करणे, हाच रथसप्तमीचा केंद्रबिंदू आहे. मकर …

Read More »

मुक्या प्राण्यांप्रती मिका सिंहचे दातृत्व

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक मीका सिंह आपल्या गाण्यांसोबतच सढळ हाताने केलेल्या मदतीसाठीही ओळखला जातो. सध्या उत्तर भारतात असलेल्या कडाक्याच्या थंडीत भटक्या कुत्र्यांचे हाल होत असल्याचे पाहून मीका सिंहने त्यांच्या कल्याणासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. मीकाने आपल्या मालकीची 10 एकर जमीन भटक्या कुत्र्यांच्या निवाऱ्यासाठी आणि त्यांच्या देखभालीसाठी दान करण्याचा संकल्प केला आहे. देशभरात भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर आणि सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या …

Read More »

खलनायकीचा नवा सुवर्णकाळ

सध्याच्या चित्रपटसृष्टीत खलनायक केवळ काळ्या-पांढऱ्या रंगातील नैतिक विभागणीपुरता मर्यादित राहिलेला नाही. तो आता अँटी-हिरो, ग्रे-झोन आणि गुन्हेगारी केंद्रित कथानकाचा प्रतीक बनला आहे. ‌‘के.जी.एफ.‌’, ‌‘पुष्पा‌’, ‌‘मिर्झापूर‌’, ‌‘छावा‌’ आणि ‌‘ॲनिमल‌’ यांसारख्या कलाकृतींनी हा ट्रेंड अधिक मजबूत केला. बॉक्स ऑफिसची आकडेवारी सांगते की, प्रेक्षक आता या गडद आणि हिंसक पात्रांमध्ये थरार शोधत आहेत. या पार्श्वभूमीवर अक्षय खन्ना आणि बॉबी देओल यांनी ‌‘स्टार व्हिलन‌’चे …

Read More »

मातीतले खेळ

मैदानी खेळ म्हणजे कोणते, असा प्रश्न हल्ली एखाद्या शाळकरी मुलाला विचारला, तर कदाचित मैदानी म्हणजे काय असा प्रतिप्रश्न येण्याची भीती वाटते. मोकळी मैदानेच कमी झाल्याने अनेक शाळांनाही मोठी ग्राऊंड्स नसतात. जी काही मैदाने असतात, त्यावर संध्याकाळी पैसे भरून कॅम्प चालवले जातात. त्यामुळे रस्त्यावर क्रिकेट, फुटबॉल खेळणे किंवा इतर दंगामस्ती करण्याची आपल्या पिढीने घेतलेली मजा कदाचित यापुढे मुलांना घेता येईल, की …

Read More »

नातेसंबंध बिघडवणाऱ्या सवयी सोडा !

जोडीदार असो, मित्र असो किंवा अन्य कौटुंबिक नाते असो, किंबहुना प्रोफेशनल रिलेशन्स असले तरी हे नाते निभावणे आणि टिकवणे ही कला आहे. ज्यांना ही कला जमली त्यांचं आयुष्य आनंदमय आणि आनंददायी झालं. पण ही कला काही नियमांसह येते. यामध्ये सर्वांत महत्त्वाची आणि लक्षात ठेवण्याजोगी गोष्ट म्हणजे अगदी छोट्या-छोट्या सवयीही या नात्याच्या आरोग्यावर वाईट परिणाम करू शकतात. सबब तुम्हाला तुमचे नाते …

Read More »

समुद्रातील सूक्ष्मजीवांबाबत नवं संशोधन

का लघुग्रहाच्या धडकेने पृथ्वीवर 6.5 कोटी वर्षांपूर्वी डायनासोरसारख्या प्राण्यांसह अनेक प्रजाती नष्ट झाल्या. डायनासोरप्रमाणेच समुद्रातील सरीसृप, अपृष्ठवंशीय व अनेक सूक्ष्मजीवही नष्ट झाले होते, त्याला कारण या लघुग्रहाचा आघात हे मानले जाते. त्यावेळी जगातील समुद्रात मोठे बदल झाले, तरी अगदी खोलवर असलेले काही सूक्ष्मजीव मात्र त्यातून वाचले होते. ते कसे वाचले असावेत याचे कोडेच आहे. या आघातावेळी समुद्रातील सजीवांचे मुख्य अन्न …

Read More »

प्रामाणिकपणाचा असाही आदर्श

चेन्नईमध्ये स्वच्छता कामगार म्हणून कार्यरत असलेल्या पद्मा यांनी आपल्या प्रामाणिकपणाने संपूर्ण देशासमोर मानवतेचा एक नवा आदर्श उभा केला आहे. कचरा साफ करत असताना पद्मा यांना सुमारे 45 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने सापडले. एवढी मोठी मालमत्ता हाती लागूनही, त्याचा एक छोटासा भागही स्वतःकडे न ठेवता त्यांनी ते दागिने पूर्णपणे परत केले. त्यांच्या या कृत्याने कोट्यवधी भारतीयांची मने जिंकली आहेत. मला …

Read More »

अमरावतीत त्रिशंकु, नागपूर, अकोल्यात भाजप

अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून 87 जागांच्या महापालिकेत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. निकालानुसार भाजपने सर्वाधिक 25 जागा जिंकत पहिल्या क्रमांकावर मजल मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी 11 जागांवर यश मिळवले आहे. अकोल्यात भाजप तर चंद्रपूर महापालिकेत काँग्रेस पहिल्या क्रमांकावर आहे. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीत संपूर्ण राज्यात भाजपने वर्चस्व सिद्ध केले आहे. मुंबईत …

Read More »