स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणाचा इतिहास पाहिला तर ज्या पक्षांमध्ये लोकशाही पद्धती आहे म्हणजेच एकचालकानुवर्तीत्व नाहीये अशा पक्षांमध्ये पक्षातील प्रमुख स्थानावर अनुभवी, बुजुर्ग नेत्यांची निवड करण्याचा प्रघात आहे. याचे कारण पक्षसंघटना चालवताना अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडताना जुन्या-नव्या कार्यकर्त्यांशी जुळवून घेत पक्षविस्तार करावा लागतो. असे असताना 45 वर्षे वय असणाऱ्या बिहारच्या नितीन नबीन यांना भाजपाने राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष बनवण्याचा निर्णय घेतल्याने सर्वांनाच …
Read More »द्वेषमूलकतेला लगाम, पण…
भारतामध्ये द्वेषमूलक विधाने किंवा विघातक वक्तव्ये याबाबत दीर्घकाळ चर्चा सुरू आहे. भारतीय दंड संहिता असो किंवा तिच्या जागी आलेली भारतीय न्याय संहिता, या दोन्हींमध्ये सामुदायिक किंवा धार्मिक तेढ वाढवणाऱ्या कृत्यांविरोधात विविध तरतुदी करण्यात आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयानेही सर्व राज्य सरकारांना द्वेषमूलक विधानांची दखल घेऊन कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. मात्र यानंतरही काही राज्य सरकारांना असे वाटले की, त्यांच्या राज्यात …
Read More »‘तारक मेहता…’ बंद होणार?
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ हा गेली 18 वर्षेसुरू असलेला विनोदी सिटकॉम भारतीय घराघरांत लोकप्रिय झाला आहे. गोकुळधाम सोसायटीतील व्यक्तिरेखांभोवती फिरणारा हा कार्यक्रम लाखो प्रेक्षकांना भावला आहे आणि त्यातील कलाकारांबद्दल प्रेक्षकांमध्ये वेगळीच आपुलकी निर्माण झाली आहे. 2008 मध्ये सुरुवात झालेली ही मालिका भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वाधिक पसंती मिळवलेल्या सिटकॉमपैकी एक मानली जाते. अनेक प्रेक्षकांनी या मालिकेमध्येच बालकलाकारांना वाढताना पाहिले आहे. गेल्या …
Read More »कलाकारांचे बहुविवाह
भारतीय समाजात आजही दुसऱ्या विवाहाला मान्यता मिळताना दिसत नाही. विशेषतः पहिली पत्नी हयात असताना किंवा तिच्यासोबत घटस्फोट झालेला नसताना दुसरा विवाह करणे ही सरळसरळ प्रतारणाच असते. परंतु सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांचे आयुष्य पाहिल्यास त्यांनी ही प्रतारणा लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाही केल्याचे दिसते. दिलीप कुमार, धर्मेंद्र, राज बब्बर, राजेश खन्ना, विनोद खन्ना, आमीर खान, सैफ अली खान यांसारख्या नायकांच्या दुसऱ्या-तिसऱ्या विवाहांच्या चर्चांमुळे …
Read More »जॉब ॲप्लिकेशन करताय..?
तुम्ही नव्या नोकरीच्या शोधात असाल तर ॲप्लीकेशन करताना घडणाऱ्या या कॉमन चुका सहज टाळता येण्यासारख्या आहेत. या चूकांमुळे तुमची नवी नोकरी मिळण्याची संधी धुसर होऊ शकते किंवा आहे त्या जॉबपासून हात धुवावा लागतो. तुम्ही नोकरी शोधत आहात हे तुमच्या ऑफिसमधल्या कोणालाही( कितीही बेस्ट फ्रेंड असला तरी) सांगू नका.तुमच्या बॉसला तुम्ही नोकरी सोडत असल्याची कुणकुण लागली तर त्याचा परिणाम तुमच्याशी असलेल्या …
Read More »हळद वापरुन सौंदर्य खुलवताना…
चेहऱ्यावर नैसर्गिक चमक असावी अशी प्रत्येकीचीच इच्छा असते. बाजारात मिळणाऱ्या विविध क्रीम्स आणि ब्युटी प्रॉडक्टस अनेक मोठमोठे दावे करतात, पण अनेकदा असे दिसून येते की, घरात सहज उपलब्ध असलेल्या नैसर्गिक गोष्टींचा परिणाम जास्त चांगला आणि सुरक्षित असतो. यामध्ये सर्वांत पहिल्या स्थानावर आहे ती हळद. हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल (जंतुनाशक), अँटी-ऑक्सिडंट (ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करणारे) आणि अँटी-इंफ्लेमेटरी (दाह कमी करणारे) गुणधर्म असतात. यामुळे …
Read More »मन जाणून घेणारी आज्ञावली
खाद्याने आपल्या मनातली गोष्ट ओळखली तर आपण त्याला मनकवडा म्हणतो खरे, पण तो केवळ योगायोग असतो. एखाद्या व्यक्तीच्या मेंदूतून आलेले संदेश गोळा करून त्यांचे विश्लेषण करून लोकांचे विचार जाणून घेण्याचा प्रयोग वैज्ञानिकांनी यशस्वी केलेला असून, त्यात एका भारतीय वैज्ञानिकाचा समावेश आहे. या प्रयोगात माणसाच्या मनातील विचार ओळखण्यात 96 टक्के यश आले आहे. माणसाचे मन म्हणजे त्याचे विचार सांगणारी आज्ञावली तयार …
Read More »कृषी रागिणीची यशोगाथा
हरियाणातील महमूदपूर गावातील सरला देवी यांनी आपल्या पतीच्या उपचारांसाठी औषधी उत्पादनांचा शोध घेतला आणि त्यातूनच त्यांनी स्थानिक महिलांना व शेतकऱ्यांना शेवग्याच्या उत्पादनांच्या माध्यमातून रोजगाराचे नवे दालन मिळवून दिले. शेवग्याच्या उच्च गुणवत्तेमुळे मिळणाऱ्या फायद्यांची जाणीव झाल्यानंतर त्यांनी शेतीत अनेक प्रयोग केले आणि या प्रयत्नांमुळे त्यांना दिवसेंदिवस नवी ओळख मिळत गेली. औषधी उत्पादनांच्या वाढत्या मागणीचा अभ्यास करून त्यांनी शेवग्याच्या पानांपासून ते शेंगांपर्यंत …
Read More »आता हापूसवरही दावा
महाराष्ट्रातील उद्योगधंदे आणि इतर उपक्रम इतर राज्यांमध्ये विशेषतः गुजरातमध्ये वळवण्याबाबत नेहमीच आरोप केले जात असतानाच, आता महाराष्ट्राची शान असलेल्या हापूस आंब्याबाबतही अशीच काही कारस्थाने होताना दिसत आहेत. गुजरात सरकारने हापूस आंब्यावर दावा करत वलसाड हापूस नावाने भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. हापूस हा शब्द फक्त महाराष्ट्रातील कोकणात तयार होणाऱ्या आंब्यासाठीच वापरला जातो, असे असताना गुजरात येथील कृषी विद्यापीठांनी …
Read More »सौर विकिरणांचा परिणाम
ज्या काळात इथियोपियाच्या दिशेने उसळलेल्या ज्वालामुखीच्या प्रचंड धुरामुळे विमानसेवेसमोर अडथळे उभे राहिले होते, त्याच वेळी सूर्यकिरणांमधून निर्माण होणाऱ्या तीव्र विकिरणामुळे जगभरात परिचित असलेल्या सुमारे साडेसहा हजार एअरबस ए320 विमानांच्या सॉफ्टवेअरमध्ये अनाकलनीय बिघाड दिसू लागला आणि अनेक उड्डाणे स्थगित करावी लागली. 30 ऑक्टोबर रोजी न्यूयॉर्ककडे उड्डाण करणाऱ्या जेटब्लूच्या विमानाला आलेल्या विकिरणाच्या धक्क्यामुळे विमानात अचानक झटके बसले, त्याची उंची झपाट्याने कमी झाली …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र