लेख-समिक्षण
  • 9 august 2026

अंक मिळणेसाठी


एकूण वाचक संख्या : 4212

TimeLine Layout

September, 2024

  • 22 September

    विकासाच्या जमिनीवरचे वर्तमान

    दरवर्षी भारतातील तीन महिन्यांच्या सणासुदीत ऑटो डीलर्सपासून रेस्टॉरंट चेनपर्यंतचे व्यवसाय त्यांच्या वार्षिक विक्रीच्या 20 ते 30 टक्के पैसा कमवतात. पण यंदा देशातील पारंपारिक सणासुदीच्या खरेदीचा हंगाम सुरू होताच भारतीय शहरांमधील ग्राहक खर्चात कपात करत आहेत. जगातील सर्वात वेगाने वाढणार्‍या प्रमुख अर्थव्यवस्थेसाठी हे चिंताजनक लक्षण आहे. कार विक्री, विमान प्रवास आणि पॅकेज्ड फूडवर याचा प्रतिकूल परिणाम होत आहे. मारुती सुझुकीसारख्या कार …

    Read More »
  • 15 September

    श्रेयावर कौतुकवर्षाव

    कोलकाता येथील आरजी कार मेडिकल हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरची बलात्कारानंतर निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी देशभरात संतापाची लाट पसरली आहे. बंगालमध्ये भाजपचे ममता बॅनर्जी यांच्या सरकारविरोधात जोरदार आंदोलन सुरू आहे. याप्रकरणी अनेक बॉलीवूड कलाकारांनी देखील पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला. यादरम्यान, गायिका शेया घोषालने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. ज्यानंतर तिचे अनेकांकडून कौतुक केले जात आहे. श्रेेया घोषालने कोलकातामधील आयोजित कॉन्सर्ट …

    Read More »
  • 15 September

    निमित्त ‘इमर्जन्सी’चे

    सध्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या प्रदर्शनावरून वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी केली जात आहे. या चित्रपटात इतिहासातील अनेक गोष्टी चुकीच्या पद्धतीने सादर केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. पंजाबसह अन्य बिगर भाजपशासित राज्यांनी चित्रपट प्रदर्शन न करण्याचा निर्णय घेतला आहे. इतिहासात डोकावल्यास अनेकदा मजकुर, दृश्यावरून राज्य आणि केंद्र सरकारने चित्रपटावर बंदी घातलेली आहे. आतापर्यंत जवळपास 800 चित्रपटांना सेन्सॉर …

    Read More »
  • 15 September

    स्टायलीश हुडीज

    अलीकडच्या काळात ‘हुडीज’ किंवा स्वेटशर्टची फॅशन आली आहे. परदेशात थंडीचे प्रमाण अधिक असल्याने हुडीजचा सर्रास वापर होतो. आपल्याकडील वातावरण उष्ण आणि दमट असल्याने स्वेटर, स्वेटशर्टचा फारसा वापर होत नाही. काश्मीरमधील बहुतांशी नागरिक असा पेहराव करतात. परंतु युवकांमध्ये सध्या हुडीजची क्रेझ असून महाविद्यालय, प्रवास, पार्टीमध्ये अशा प्रकारचा पेहराव करताना दिसून येतात. विविध आकर्षक रंगाचे हुडीज किंवा स्वेट शर्ट घालून व्यक्तिमत्त्व अधिकच …

    Read More »
  • 15 September

    साचेबद्धपणा तोडा, छंद जोपासा

    रोजच्या आयुष्यातील साचेबद्धपणामुळे कंटाळून जायला होतं. अशा वेळी धकाधकीच्या जीवनात मागे राहून गेलेला एखादा छंद जोपासायला काय हरकत आहे? स्क्रॅपबुकवर काम करणे असो, बागकामाचे कौशल्य जोपासायचे असो किंवा काही बदल करून घराची अंतर्गत सजावट करायची असो, शिवणकाम, विणकाम किंवा भरतकाम असो या सर्व छंदांकडे एकदा नजर टाका. वेळेचे व्यवस्थापन करा आणि या छंदांच्या दिशेने मार्गक्रमण करा. अगदी शिलाईचे उदाहरण घेतल्यास …

    Read More »
  • 15 September

    आकाश दुभंगते तेव्हा

    निसर्गही कधी कधी अनोखी दृश्ये दाखवत असतो. आकाश कधी विभागले गेल्याचे तुम्ही पाहिले आहे का? असेही दृश्य आता पाहायला मिळाले आहे. आकाशाचा एक भाग केशरी रंगाचा आणि दुसरा काळवंडलेला असे दोन उभे भाग नुकतेच अमेरिकेत फ्लोरिडामध्ये पाहायला मिळाले. त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियात व्हायरल होत आहे. सूर्यास्त तर आपण रोजच पाहतो. संध्याकाळच्या वेळी जेव्हा सूर्य अस्ताला जातो तेव्हा आकाशात पसरलेला …

    Read More »
  • 15 September

    रियल हिरो

    कारगिल युद्धाचे नायक म्हणून ओळखल्या जाणार्‍या कॅप्टन विक्रम बत्रा यांची कहाणी तमाम तरुणांसह देशासाठी प्रेरणादायी आहे. आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी सीमेवर जाऊन हौतात्म्य पत्करलेल्या कारगिल युद्धातील जवानांचा ते चेहरा बनले होते. कारगिलमधील लढाईच्या काही महिने आधी कॅप्टन विक्रम बत्रा पालमपूरमधील त्यांच्या घरी आले होते, तेव्हा त्यांनी मित्रांना न्यूगल कॅफेमध्ये पार्टी दिली. तेव्हा त्यांचा एक मित्र म्हणाला, आता तू लष्करात आहेस. काळजी …

    Read More »
  • 15 September

    वायूप्रदुषणाबाबत स्वागतार्ह उपक्रम

    देशातील अनेक शहरे तीव्र वायू प्रदूषणाच्या विळख्यात आहेत. पावसाळ्यात किंवा इतर महिन्यात पाऊस पडला की प्रदुषणापासून काहीसा दिलासा नक्कीच मिळतो, पण या समस्येवर कायमस्वरुपी उपाय शोधणे आवश्यक आहे. या प्रयत्नात, पिंपरी चिंचवड आणि छत्रपती संभाजीनगर या महाराष्ट्रातील दोन शहरांना आणि ओडिशातील भुवनेश्वरमधील काही भागांना कमी उत्सर्जन क्षेत्र म्हणून निवडण्यात येणार आहे. या भागात अत्यंत कमी उत्सर्जन असलेल्या वाहनांनाच प्रवेश दिला …

    Read More »
  • 15 September

    देर है…

    भ्रष्टाचार हा शब्द कुणी उच्चारला तर हसू येईल की काय, अशी भीती वाटू लागलीय. मुळात तो कुणी उच्चारल्यास त्यातल्या त्यात खरा वाटेल, हा प्रश्न पडतो. आपण स्वतः सोडून कुणाचीही याविषयी बोलायची लायकी नाही, असंच प्रत्येकाला वाटतं. पण प्रत्येकाचे पाय मातीचे. हजारो कोटींचे आकडे टीव्हीच्या पडद्यावर येऊन टीआरपी खाऊन गेले. पुराव्यांच्या राशीच्या राशी डोळ्यांसमोर दिसता-दिसता नजरेआड झाल्या. कुणी ट्रकमधून, कुणी बैलगाड्यांमधून …

    Read More »
  • 15 September

    देशात पुन्हा सांप्रदायिक आग

    गणपती विसर्जनावेळी कर्नाटकातील नागमंगला शहरात बुधवारी दोन गटात झालेल्या हिंसाचारात मोठे नुकसान झाले आहे. विसर्जन मिरवणुकीवर झालेल्या दगडफेकीनंतर हाणामारी झाली आणि मग हिंसाचाराला सुरुवात झाली. यावेळी दगडफफेक करून अनेक दुकाने, वाहने पेटवली. त्याच दिवशी हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथील मशिदीच्या अनधिकृत बांधकामावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. अनधिकृत मशीद उभारल्या प्रकरणात हिंदू संघटना, स्थानिक हिंदू लोकांनी विरोध करत आंदोलन सुरू …

    Read More »