लेख-समिक्षण

विशेष

प्रश्न डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा

पश्चिम बंगालमधील एका प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर झालेला अमानुष, पाशवी अत्याचार आणि नंतर तितक्याच नृशंसतेने झालेली तिची हत्या ही मानवतेला काळीमा फासणारी आहे. या प्रकरणातील आरोपीला अटक केली असली तरी यामुळे डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आजघडीला वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या असंख्य तरुणी शिक्षणाच्या निमित्ताने अन्य शहरांत राहत असून अशा घटनांमुळे पालकवर्गांत चिंता वाढणे स्वाभाविक आहे. अशा घटनांना चाप बसणे काळाची …

Read More »

हिंडेनबर्ग प्रकरणाचा धडा

भारतीय बँका आजघडीला ठेवीच्या कमतरतेसारख्या गंभीर समस्येचा सामना करत आहेत. कर्जाच्या तुलनेत ठेवी कमी राहण्याचे प्रमाण 80 टक्क्यांपर्यंत पोचू शकते अशी भीती व्यक्त होत असताना 2015 नंतर पहिल्यांदाच ठेवी कमी असण्याचे प्रमाण उच्चांकी पातळीवर पोचले आहे. पूर्वी ठेवीचे प्रमाण वाढविण्यासाठी सर्व बँका या ताळेबंदाच्या आधारावर जमा असलेल्या ठेवीवर चांगला व्याजदर देत असत. मात्र आता ठेवीवरची तूट वाढल्याने निव्वळ व्याजाच्या मार्जिनवर …

Read More »

सुवर्णभंग, तर दुसरीने नाक कापले

भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाट हिचे पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील सुवर्ण पदकाचे स्वप्न भंगल्यानंतर निराश झालेले देशवासीय झोपेत असतानाच विनेशने धक्कादायक निर्णय घेतला. विनेशने कुस्तीला अलविदा करण्याची ‘ब्रेकिंग न्यूज’ गुरुवारी पहाटे 5 वाजून 17 मिनिटांनी जाहीर केली. पॅरिस ऑलिम्पिकमधील महिलांच्या 50 किलो वजनी गटातील फ्र ीस्टाईल कुस्तीच्या अंतिम फेरीत अपात्र ठरल्यानंतर विनेशने हा मोठा निर्णय घेतला आहे. ट्विटरवर पोस्ट लिहित …

Read More »

विनेश प्रकरणाचा बोध

हरियानाची कुस्तीपटू विनेश फोगाटने पॅरिस ऑलिंपिकच्या बाराव्या दिवशी होणार्‍या अंतीम सामन्यात स्थान मिळवून इतिहास घडविलेला असतानाच तिला अपात्र केल्याची बातमी धक्कादायक होती. अशा प्रकारचा अनुभव हा कोणत्याही खेळाडूला मानसिक आघात ठरणारा राहू शकतो. मात्र विनेश फोगाटने ज्या पद्धतीने जिद्द दाखवत पॅरिसमधील मजल मारली, ते पाहता देशच नाही तर संपूर्ण जगभरातील क्रीडा प्रेमींच्या भावना तिच्यासोबत असणे स्वाभाविक होते. आता देशातील संपूर्ण …

Read More »

बँकांपुढे ठेवींचे संकट

भारतीय बँका आजघडीला ठेवीच्या कमतरतेसारख्या गंभीर समस्येचा सामना करत आहेत. कर्जाच्या तुलनेत ठेवी कमी राहण्याचे प्रमाण 80 टक्क्यांपर्यंत पोचू शकते अशी भीती व्यक्त होत असताना 2015 नंतर पहिल्यांदाच ठेवी कमी असण्याचे प्रमाण उच्चांकी पातळीवर पोचले आहे. पूर्वी ठेवीचे प्रमाण वाढविण्यासाठी सर्व बँका या ताळेबंदाच्या आधारावर जमा असलेल्या ठेवीवर चांगला व्याजदर देत असत. मात्र आता ठेवीवरची तूट वाढल्याने निव्वळ व्याजाच्या मार्जिनवर …

Read More »

अखेर पूजा खेडकर यांची आयएएस नियुक्ती रद्द

अखेर केंद्रीय लोकसेवा आयोगाने वादग्रस्त व नखरेल प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पूजा खेडकर या नागरी सेवा परीक्षा नियम 2022 नुसार दोषी ठरल्याचे आयोगाने म्हटले आहे. त्याचबरोबर पूजा खेडकर यांना भविष्यात सर्व परीक्षा देण्यास मनाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र कॅडरच्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर या गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहेत. चुकीची माहिती …

Read More »

बस झाले आता

महाराष्ट्राच्या समाजकारणामध्ये अलीकडील काळात एक चिंतेची बाब समोर येत आहे. राज्यामध्ये एकतर्फी प्रेमातून तरुणींवर हल्ले करण्याचा एक घातक प्रवाह पुन्हा डोके वर काढताना दिसत आहे. गेल्या वर्षी घडलेले दर्शना पवारचे प्रकरण असो, पुण्यामध्ये तरुणीवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न असो, वसईतील तरुणीची निर्घृण हत्या असो यांसारख्या घटनांमधून मुलींना नकार देण्याचा अधिकार नाही, हा पुरुषसत्ताक अहंकार नव्याने बळावत चालल्याचे दिसू लागले आहे. …

Read More »

मनात उमटतो श्रावण

श्रावण आला की मनात निराळ्या लहरी उमटू लागतात. त्याच्या उन पावसाच्या खेळाबरोबर मनही आशा – निराशेच्या लपंडावात रमतं. निसर्गानेही श्रावण महिना तयार केला असेल तो मानवी मनाचं प्रतिबिंब म्हणूनच. त्याच्या आगमनाने पुढच्या सणांची चाहूल लागते,जशी मनाला एखाद्या पुढच्या चांगल्या घटनेचे वेध लागून त्यात उत्साह भरावा. पावसाचं मळभ दूर करून त्याची रिमझिम जशी निसर्गात बदल घडवून आणते तसंच श्रावणाच्या आगमनाने येणार्‍या …

Read More »

बिहार, आंध्र प्रदेशचा अर्थसंकल्प

मोदी सरकारच्या तिसर्‍या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प मंगळवारी जाहीर झाला. या अर्थसंकल्पातून बिहार आणि आंध्र प्रदेशसाठी मोठ्या प्रकल्पांची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या भाषणात महाराष्ट्राचा उल्लेख कुठेच नव्हता. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर आलेली असताना निर्मला सीतारामन यांनी महाराष्ट्रासाठी कोणतीही मोठी घोषणा न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. इतर चार राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त …

Read More »

धोक्याचा घंटानाद

आधुनिक काळात सर्वांचे आयुष्य आता संगणकावर अवलंबून आहे. एक दिवस जरी संगणक बंद पडला तर काय होईल? याचा कदाचित विचार आपल्यापैकी कोणी केला नसेल. परंतु जे काही घडेल, ते कल्पनेपलीकडचे असेल आणि त्याचे परिणाम अणुबॉम्ब पडण्यापेक्षा भयानक असतील. याचा अनुभव काही दिवसापूंर्वीच आला आहे. 1980 च्या दशकांत आपण संगणकाच्या बिघाडामुळे मोठ्या घटना घडलेल्या पाहिल्या. सॉफ्टवेअरमधील चुकीमुळे क्षेपणास्त्र चुकीच्या ठिकाणी पडलेले …

Read More »