पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकाने हुलकावणी दिलेली कुस्तीगीर विनेश फोगट आणि कुस्तीगीर बजरंग पुनिया निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. ते काँग्रेसच्या तिकिटावर हरयाणा विधानसभा निवडणूक लढवण्याची चर्चा सुरू झाली आहे. दोघांनीही बुधवारी सकाळी संसदेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतली. त्यांनी नंतर काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्याशीही चर्चा केली. मात्र दोघांनीही चरखी दादरी व बादलीसह जे …
Read More »विशेष
निकाल ठरवतील दिशा
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशाचे राजकारण वेगाने बदलले आहे. राजकीय पंडितांनी, पक्षांनी व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा वेगळे निकाल लागले आणि लोकसभेला एकट्या जीवावर बहुमत मिळवत सरकार स्थापन करण्याचे भाजपचे स्वप्न भंगले. पुन्हा एकदा आघाडी सरकारचे पर्व सुरू झाले.तिसर्यांदा भाजप आघाडी सत्तेवर आल्यानंतरच्या देशभरातील राजकीय घडामोडी पाहिल्या तर मोदी सरकारची राजकीय अपरिहार्यता प्रकर्षाने समोर आली. उदा. ‘लॅटरल एंट्री’वर यूटर्न किंवा वक्फ बोर्ड दुरुस्ती …
Read More »अवकाशातील संघर्ष अडचणींच्या अवकाशात सुनीता
बोइंग स्टारलायनर यानातून झेप घेणार्या सुनीता विल्यम्स यांनी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर पाऊल ठेवताच सहकार्यांची अतिशय उत्साहाने घेतलेली भेट सर्व जगाने पाहिली. त्यांची ऊर्जा आणि आशा आकांक्षा अनेकांच्या जिद्दीला बळ देणार्या ठरल्या. परंतु, बोइंगचे स्टारलायनर अवकाश स्थानकावर उतरले तेव्हापासूनच सुनीता विल्यम्स यांच्या माघारी दौर्याच्या कार्यक्रमावर अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यात अनेक तांत्रिक बिघाड असल्याचे निदर्शनास आले. यानाची दिशा निश्चित करणारे पाच …
Read More »दिज्ञी बंदरात औद्योगिक कॅरिडोर
राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडोर विकास प्रकल्पांतर्गत नऊ राज्यांमध्ये 12 नवीन ग्रीनफिल्ड औद्योगिक कॉरिडोरना बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. महाराष्ट्रातील दिघी बंदराचाही यात समावेश करण्यात आला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीआधी केंद्राने राज्याला दिलेली ही भेट मानली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या व मंत्रिमंडळाच्या आर्थिक घडामोडी विषयक समितीने घेतलेल्या निर्णयांची माहिती केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. या …
Read More »सामरीक सामर्थ्याला नवे बळ
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अमेरिका दौर्यात भारत आणि अमेरिका यांच्यात महत्त्वाचे संरक्षण करार झाले आहेत. दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्याला चालना देण्यासाठी ‘सिक्युरिटी ऑफ सप्लाय अरेंजमेंट’चा करार करण्यात आला आहे. दोन्ही देशांनी फायटर जेट इंजिनच्या निर्मितीसाठी संयुक्तपणे पुढे जाण्यास सहमती दर्शवली आहे. मानवरहित प्लॅटफॉर्म, आधुनिक शस्त्रे, ग्राउंड मोबिलिटी सिस्टम इत्यादींच्या सह-उत्पादनाबाबतही बोलणी पुढे सरकली आहेत. अमेरिका भारताला पाणबुडीविरोधी शस्त्र सोनोवॉय …
Read More »अजितदादांची कोंडी झालीय?
लोकसभेत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिकेत बदल केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर मतदारांशी ताळमेळ बसविण्यासाठी ते वेगळी रणनिती आखत आहेत. सुनेत्रा पवार यांना लोकसभेला उतरवून मोठी चूक केली असे खळबळजनक विधान अलीकडेच दादांनी केले. काकांशी संघर्ष करून काही फायदा होत नसून उलट शरद पवार यांना अधिक सहानुभूती मिळत असल्याचे दादांच्या लक्षात आले आहे. लोकसभेला पवार …
Read More »अमरावती, अकोला, बदलापुरात लैंगिक शोषण
सोशल मीडियावर ओळख झालेल्या अमरावती येथील एका तरुणीला आपली खरी ओळख लपवत प्रेमजाळ्यात फसवून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. ही संतापजनक घटना कोतवाली ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी उशिरा रात्री दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अकोला जिल्ह्यात शिक्षकाने सहा विद्यार्थिनीचा विनयभंग केला. त्याला शासकीय नोकरीतून बडतर्फ करण्यात आले. नाशिक जिल्ह्यातही अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करण्यात आले. पश्चिम बंगालच्या कोलकाता येथे …
Read More »अत्याचार दाही दिशा!
शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, कामाची जागा, सार्वजनिक ठिकाण, घर कुठेही मुली, महिला आणि मुले सुरक्षित नाहीत. अलीकडच्या काळात समाजात लैंगिक विकृती एवढी वाढली आहे की, तीन-चार वर्षांच्या मुलीही सुरक्षित नाहीत आणि 60 ते 80 वर्षे वयाच्या महिलाही सुरक्षित नाहीत. लैंगिक हिंसाचाराच्या घटना सर्वत्र उघडकीस येत असल्याचे पाहून संपूर्ण सामाजिक स्थिती निरोगी नसल्याचे दिसून येते. कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणाने देश हादरला असतानाच महाराष्ट्रातील …
Read More »नव्या वाणांची संजीवनी, पण…
औद्योगिक क्रांतीपूर्व काळ ते आतापर्यंत पृथ्वीचे तापमान दीड अंश सेल्सिअसने वाढले आहे. उत्पादन, वितरण अणि ग्राहक याची संपूर्ण साखळीच पर्यावरणावर अवलंबून आहे. अशावेळी हवामान बदलाला अनुकुल असणार्या उपक्रमांतून खाद्योत्पादनाला सर्वसमावेशक स्वरुप देऊ शकतोे. या क्रमात भारतीय कृषी संशोधन केंद्राने अधिक उत्पादन देणार्या 61 पिकांचे 109 वाण जारी केले आहेत. यात शेतीचे 69 आणि बागायतीतील 40 वाणांचा समावेश आहे. हे वाण …
Read More »मोठ्या सुधारणांसाठी सरकार बांधिलःपंतप्रधान
आपल्या देशाला स्वातंत्र्य तर मिळाले, पण दुर्दैवाने, लोकांना एक प्रकारे ‘मायबाप संस्कृती’तून जावे लागले. सरकारकडे हात पसरत राहा, मागत राहा, कुणाच्यातरी ओळखीसाठी मार्ग शोधत राहा हीच पद्धत होती. आम्ही ही पद्धत बदलली आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी पंतप्रधानांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आले. देशभरात 78व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह होता. ध्वजारोहण केल्यानंतर लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदी …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र