अनेकजण दुपारी जेवणावर आडवा हात मारून लगेचच आडवे होतात. दुपारची ‘वामकुक्षी’ या नावाने अनेक लोक तासाभराची का होईना झोप काढत असतात. अर्थात, दुपारच्या जेवणानंतर झोप येणे किंवा सुस्ती येणे, हे अगदी साहजिक आहे. ऑफिसमध्ये दुपारच्या जेवणानंतर आपल्या आजूबाजूचे बरेच लोक जांभई देताना दिसतात. कधीकधी आपल्याला शरीरातून सर्व ऊर्जा निघून गेली आहे आणि झोपेशिवाय पर्याय नाही, असेही वाटते. पण, दुपारच्या जेवणानंतर आपल्याला झोप का येते, हे माहिती असणे देखील गरजेचे आहे.
आहारतज्ज्ञांच्या मते, दुपारच्या जेवणानंतर झोप, आळस आणि अशक्तपणा जाणवणे सामान्य नाही. या अवस्थेला फूड कोमा म्हणून ओळखले जाते. या अवस्थेमागे कोणतेही ठोस कारण नाही आणि लोक बऱ्याचदा जेवणानंतर झोप येते म्हणून याकडे दुर्लक्ष करतात. पण, यामागे काही गंभीर कारणे देखील असू शकतात, ज्याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकते. यापैकी काही कारणे अशी : मेंदूतील रक्ताभिसरण कमी होणे-आहारतज्ज्ञांच्या मते दुपारच्या वेळी हलक्या अन्नाचे सेवन करावे. पौष्टिक आहार घेतल्यास पचनासाठी अधिक ऊर्जेची आवश्यकता असते. अन्न पचविण्यासाठी पचनसंस्थेला अधिक रक्ताची आवश्यकता असते. दुपारच्या जेवणानंतर मेंदूतील रक्ताभिसरण कमी होते. हेच कारण आहे की दुपारच्या जेवणानंतर आपल्याला आळस आणि झोप येते. रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होणे- आपल्या शरीराला कार्य करण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते. हे आपण वेळोवेळी नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण यासारख्या जेवणातून मिळवतो. आपण जे अन्न खातो त्यात असलेले पोषण हे आपल्या शरीराच्या ऊर्जेचा प्राथमिक स्रोत आहे. अन्नाच्या सेवनानंतर लगेचच पचन प्रक्रियेमुळे रक्तातील साखरेच्या पातळीत लक्षणीय घट होते. यामुळे तंद्री आणि झोप येते. तज्ज्ञांच्या मते, जे लोक नाश्ता सोडून थेट दुपारचे जेवण करतात त्यांना ही स्थिती जाणवण्याची शक्यता जास्त असते.
Check Also
सर्वात भयावह आणि महाकाय पक्षी
सुमारे 1 कोटी 20 लाख वर्षांपूर्वी या पृथ्वीतलावर एक महाकाय व भयावह पक्षी अस्तित्वात होता. …
पांचजन्य वृत्तपत्र