बॉलीवूड अभिनेता आमिर खानच्या निर्मिती संस्थेद्वारे साकारण्यात येत असलेल्या आणि दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होत असलेल्या ‘लाहोर 1947’ या चित्रपटाच्या शीर्षकात बदल होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. चित्रपट प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर असतानाच समोर आलेल्या या माहितीनुसार, आता हा चित्रपट ‘बटवारा 1947’ या नावाने प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो. फाळणीच्या काळातील भीषण वास्तव आणि त्यातील भावनिक खोली अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी निर्मात्यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे समजते.राजकुमार संतोषी आणि आमिर खान यांच्यात झालेल्या वरिष्ठ पातळीवरील चर्चेनंतर हे नाव बदलण्याचे संकेत मिळाले आहेत. या चित्रपटाची व्याप्ती केवळ लाहोर शहरापुरती मर्यादित नसून ती फाळणीच्या संपूर्ण शोकांतिकेला स्पर्श करणारी आहे, असा विचार यामागे असल्याचे चित्रपट वर्तुळात बोलले जात आहे. विशेषतः स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने त्याचे शीर्षक अधिक व्यापक आणि परिणामकारक असावे, असा निर्मात्यांचा प्रयत्न आहे.या निमित्ताने पुन्हा एकदा सनी देओल आणि राजकुमार संतोषी ही जोडगोळी अनेक वर्षांनंतर एकत्र येत आहे. या चित्रपटाचे कथानक ज्येष्ठ नाटककार असगर वजाहत यांच्या ‘जिस लाहोर नई देख्या, ओ जम्याई नी’ या प्रसिद्ध नाटकावर आधारित आहे. – राधिका बिवलकर
Check Also
रामायण, राम, रणबीर आणि वाद
सध्या बहुचर्चित, बहुप्रतिक्षित ‘रामायर्ण या चित्रपटाच्यानिमित्तान रणीबर कपूरने साकारलेल्या रामाच्या व्येितेखेवरुन वाद सुरू आहेत. वास्तविक …
पांचजन्य वृत्तपत्र