लेख-समिक्षण

अधिकारी संवेदनशील का नसतात?

कोणत्याही बांधकाम स्थळी सुरक्षेची खात्री करणे ही सर्वात मूलभूत जबाबदारी असते. मात्र प्रत्यक्षात तिथे उपस्थित अधिकारी किंवा कर्मचारी या जबाबदारीबाबत सजग आणि संवेदनशील का नसतात, हा प्रश्न वारंवार निर्माण होतो. रस्त्याच्या कडेला उघडे ठेवलेले गटार, खड्डे किंवा मॅनहोल यात जर एखादा व्यक्ती चुकून पडला तर त्याचे परिणाम जीवघेणे ठरू शकतात.
पावसाळ्यात असे खड्डे वा गटार पाण्याने भरून जातात आणि त्यांचा अंदाज बांधणे सामान्य लोकांना शय होत नाही. दुर्दैवाची बाब म्हणजे अशा ठिकाणी पडून मृत्यू झाल्याच्या घटना प्रामुख्याने ‘अपघात’ म्हणून दुर्लक्षित केल्या जातात आणि निष्काळजीपणास जबाबदार असणारे अधिकारी सहजपणे वाचतात. मात्र आसाममधील गुवाहाटी येथे घडलेली अलीकडील घटना या संदर्भात नवा धडा शिकवणारी आहे. गुवाहाटीतील एका उड्डाणपुलाच्या बांधकामस्थळी अनेक गटार व मॅनहोल उघडे सोडण्यात आले होते. त्यापैकी एका गटारात तीन वर्षांचा मुलगा पडला आणि त्याचा मृत्यू झाला. जर यालाही फक्त अपघात मानले गेले असते, तर कदाचित कुणीही या घटनाक्रमावर गंभीरतेने विचार केला नसता. पण मुलाच्या वडिलांनी कंपनीच्या निष्काळजीपणाबद्दल औपचारिक तक्रार दाखल केली. परिणामी संबंधित तीन अधिकार्‍यांना अटक करण्यात आली. यातून एक गंभीर प्रश्न समोर येतो, तो म्हणजे कोणत्याही बांधकामस्थळी सुरक्षेचे मूलभूत नियम पाळण्याबाबत अधिकारी इतके असंवेदनशील का असतात? सार्वजनिक ठिकाणी उघडे ठेवलेले गटार वा मॅनहोल ही साधी चूक नसून ती सरळसरळ आपराधिक निष्काळजीपणा मानली जावी, कारण यातून लोकांचे प्राण धोयात येतात. मग या घटनांना फक्त अपघात म्हणून का मानले जाते? लोकांच्या सततच्या गर्दीच्या ठिकाणी अशी प्रचंड बेपर्वाई केल्यामुळे जर कोणाचा जीव गेला, तर त्याची जबाबदारी नेमकी कोणावर टाकली जावी? गटार, मॅनहोल वा खड्डे योग्यरीत्या झाकून ठेवणे आणि परिसराला सुरक्षित बनवणे ही जबाबदारी संबंधित विभाग, कंपनी आणि अधिकारी यांचीच आहे. जर त्यांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले नाही आणि त्यामुळे कुणाला प्राणहानी वा मोठा अपघात सहन करावा लागला, तर त्याची संपूर्ण जबाबदारी या निष्काळजी अधिकार्‍यांवर आणि संस्थांवर निश्चितच ठरली पाहिजे. या घटनेने हे अधोरेखित केले आहे की अशा प्रकरणांना केवळ अपघात न मानता, ती आपराधिक लापरवाही म्हणून हाताळणे आवश्यक आहे. अन्यथा निष्काळजीपणा सुरूच राहील आणि निर्दोष जीवांचा बळी सतत घेतला जात राहील.– नरेंद्र क्षीरसागर

Check Also

वाढते विमान अपघात आणि प्रशिक्षण संस्था

देशातील हवाई क्षेत्राला सध्या एकामागून एक घडणाऱ्या अपघातांच्या मालिकेचे ग्रहण लागल्याचे दिसत आहे. आसाममध्ये झालेल्या …