लेख-समिक्षण

दुर्लक्षित वैज्ञानिकाची प्रेरक कहाणी

भारताच्या प्राचीन विज्ञानाची जगभरात ओळख करून देणार्‍या वैज्ञानिकांमध्ये डॉ. शिवकर बापूजी तळपदेे यांचे नाव अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांनी 1895 साली मुंबईच्या चोपट्टी समुद्रकिनारी ‘मरुतसखा’ नावाचे पहिले स्वदेशी विमान यशस्वीरीत्या उडवले. परंतु त्यांचे नाव इतिहासाच्या पानांत मात्र झाकोळले गेले.
प्रारंभिक जीवन आणि प्रेरणा
शिवकर तळपदेे यांचा जन्म 1864 मध्ये मुंबई येथे झाला. त्यांना लहानपणापासूनच वेद आणि संस्कृत ग्रंथ वाचण्याची आवड होती. त्यांनी ‘विमान शास्त्र’ या प्राचीन भारतीय ग्रंथाचा सखोल अभ्यास केला. महर्षी भारद्वाज यांच्या ‘वायूयानिक प्रकरण’ ग्रंथात विमान उड्डाणाचे शास्त्र दिले आहे, हे वाचून त्यांनी भारतीय पद्धतीने विमान बनवण्याचा निर्णय घेतला.
पहिले भारतीय विमान
तळपदेे यांनी आपले विमान तयार करण्यासाठी पारा (मर्क्युरी) वापरण्याचा प्रयोग केला. आधुनिक जेट इंजिनसारख्या संकल्पनेवर आधारित हे विमान तयार करण्यात आले. 1895 मध्ये मुंबईच्या चौपाट्टी किनार्‍यावर त्यांनी आपले विमान उडवले आणि शेकडो लोकांनी त्याचा यशस्वी प्रयोग पाहिला. त्या वेळी इंग्रज सत्ताधारी होते आणि त्यांनी या संशोधनाला पाठिंबा दिला नाही. उलट, या शोधावर कुठलाही अधिकृत पुरावा ठेवला गेला नाही. पुढे, राइट बंधूंनी 1903 मध्ये विमान तयार करून इतिहासात नाव कमावले, पण त्याआधी 8 वर्षे शिवकर तळपदेे यांनी भारतीय भूमीवर पहिले विमान उडवले होते! शिवकर तळपदेे यांना त्यांच्या संशोधनासाठी योग्य पाठबळ मिळाले नाही. आर्थिक मदतीअभावी त्यांचे प्रयोग बंद पडले. पुढे, 1916 मध्ये त्यांनी अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत जगाचा निरोप घेतला. भारतीय विमानशास्त्राच्या इतिहासात त्यांचे योगदान अमूल्य आहे. त्यांना योग्य पाठिंबा मिळाला असता, तर कदाचित पहिल्या विमानाच्या शोधाचा मान भारताला मिळाला असता!
भारतीय विज्ञान आणि संस्कृतीत प्रचंड ज्ञान आहे. ही बाब वरील उदाहरणावरुन स्पष्ट होत नाही काय?

Check Also

जिद्दीच्या बळावर यशाला गवसणी

तमिळनाडूतील एका सर्वसामान्य तरुणानं सुरुवातीला 25 हजार रुपयांची नोकरी नाकारून अवघ्या 10 हजार रुपयांची इंटर्नशिप …