जेट विमानांच्या इंधनाबाबतही वेळोवेळी नवेनवे संशोधन होत असते. त्यामध्ये काही भन्नाट प्रकारही असतात. सडकी फळे, माती व कुजणारी पाने यांच्यावर नेहमी आढळणार्या काळ्या बुरशीपासून जेट विमानाचे इंधन तयार करण्याचा मार्ग अमेरिकी वैज्ञानिकांनी शोधून काढलेला आहे. त्यामुळे विमानांसाठी किफायतशीर इंधन तयार करणे भविष्यात शक्य होणार आहे. अतिशय आश्वासक असे हे संशोधन आहे, असे वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक बिरगिट एरिंग यांनी सांगितले. …
Read More »बिरदेवची संघर्षगाथा
खांद्यावर घोंगडे, डोयावर टोपी, पाणी पिण्यासाठी लोकरीचा काचोळा काखेत मारून पायात जाडजूड पायतान, मेंढ्या चारण्यासाठी रानोमाळ भटकंती, वर आभाळखाली धरती हेच आपले घर माणून जीवन कंठणार्या एका मेंढपाळाच्या मुलाने अथक प्रयत्नातून आयपीएस अधिकारी होण्यापर्यंत मजल मारली आहे. मेंढरं राखणारा पोरगा आता सायब झाला म्हणत अख्या महाराष्ट्रानं त्याला अक्षरश: डोयावर घेतलंय. दोन प्रयत्नात अपयश आलं मात्र जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक अभ्यासाच्या …
Read More »विज्ञानयुगातील दीपस्तंभ
जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान लेखक डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचे वृद्धापकाळाने पुण्यातील निवासस्थानी निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने वैज्ञानिक आणि साहित्यिक जगतात मोठी पोकळी निर्माण झाली असून खगोलशास्त्रातील तेजस्वी तारा निखळल्याची भावना व्यक्त होत आहे. खगोलशास्त्रातील त्यांचे महत्त्वपूर्ण संशोधन आणि विज्ञानाचा सामान्यांपर्यंत प्रसार करण्याचे कार्य कायम स्मरणात राहील. डॉ. नारळीकर हे ‘हॉईल-नारळीकर सिद्धांत’ मांडणारे एक थोर भौतिकशास्त्रज्ञ …
Read More »अपरिपक्वपणाचे दर्शन
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’चा पुढचा टप्पा म्हणून केंद्र सरकारने सात शिष्टमंडळे जगभरात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये निवडल्या गेलेल्या प्रतिनिधींवरुन सुरू झालेले राजकारण दुर्दैवी म्हणावे लागेल. यामध्ये दोन्ही बाजूंनी खुल्या मनाचा अभाव दिसतो. दोघेही याप्रसंगी मोठेपणा दाखवू शकले नाहीत. यावरुन असे दिसते की, राजकीय मतभेद आता मनभेदात रूपांतरित झाले आहेत. ही बाब देशासाठी चांगली नाही. अशा प्रकारची प्रतिनिधिमंडळे …
Read More »दंड झाले उदंड
वाहतुकीचा एकही नियम कधीच मोडला नाही, अशी व्यक्ती शोधून सापडेल का? जाणूनबुजून नसेल; पण नकळत का होईना आपल्या हातून कधी ना कधी, कोणत्या ना कोणत्या नियमाचं उल्लंघन होतंच. आपल्यामुळं कुणाला त्रास होऊ नये, कुणाचं नुकसान होऊ नये, कुणाच्या जिवाला धोका निर्माण होऊ नये, असा विवेकी विचार प्रत्येकानं केला असता तर नियम आणि कायद्यांची गरजच उरली नसती. रस्त्यांवरच्या अपघातांत दरवर्षी किती …
Read More »छत्तीसगडमध्ये २७ नक्षली ठार
छत्तीसगडमधील बिजापूर परिसरात बुधवारी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठ्या चकमकीला सुरुवात झाली आहे. दंतेवाडा, नारायणपूर, विजापूर आणि कोंडागाव जिल्ह्यांच्या सीमेवर जंगलात ही चकमक झाली. अबूझमाड परिसरातील या चकमकीत २७ नक्षलवादी मारले गेले आहेत. त्यात सीपीआय (माओवादी) चा सरचिटणीस नंबला केशव राव, ज्यांना बसवराजू म्हणून ओळखले जाते, ते २६ इतर नक्षलवाद्यांसह ठार झाले, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली. …
Read More »भुजबळांचे पुनरागमन
ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा समावेश अखेर राज्य मंत्रिमंडळात झाला आहे. त्यांना महायुतीच्या विद्यमान सरकारमध्ये प्रारंभी डावलले जाणे आणि आता आकस्मिकपणे मंत्रिपद बहाल केले जाणे, या दोन्ही बाबी असंख्य राजकीय कार्यकर्त्यांसाठी अनाकलनीय आहेत. हाविकास आघाडीने गेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात घवघवीत यश मिळविले. असाच निकाल त्यानंतर जेमतेम सहा महिन्यांनी होत असलेल्या विधानसभेच्या रिंगणातही लागेल, असा आत्मविश्वास आघाडीच्या नेत्यांना होता. प्रत्यक्षात त्याच्या …
Read More »कबीरा परततोय…
हसवाफसवीपटाच्या क्रमवारीत वरच्या श्रेणीवर असलेला ‘हेरा फेरी’चा तिसरा भाग येण्याची शक्यता आहे. अद्याप या चित्रपटाबद्दल अधिकृत माहिती बाहेर आली नसली तरी इतर कलाकारांच्या माध्यमातून ती येत आहे. ‘माझ्याशिवाय हेराफेरी पूर्ण कसा होईल’, असे सांगत तब्बूने आपली हजेरी चित्रपटात निश्चित केल्याचे दिसते. दुसरीकडे पहिल्या भागातला कबीरा म्हणजेच गुलशन ग्रोव्हर पुन्हा तिसक्तया भागात दिसणार आहे. पहिल्या भागातल्या सर्व कलाकारांना परत आणण्याचा दिग्दर्शक …
Read More »युद्धकथा-गीतांचे योगदान
हिंदी सिनेसृष्टीने युद्धकथांच्या आधारे राष्ट्रीयत्व, राष्ट्रवादी भावना, देशनिष्ठा, जाज्वल्य राष्ट्राभिमान याबाबत जनसामान्यांना स्फुरण चढवतानाच युद्धाच्या परिणामांबाबतही आत्मचिंतन करण्यास भाग पाडले. युद्धाचं वातावरण असो वा नसो, युद्धभूमीवर आधारित चित्रपटांच्या कथा आणि गाणी प्रेक्षकांच्या मनात खोलवर रुजतात. सीमेवर तैनात सैनिक युद्धभूमीत असोत, जखमी असोत किंवा आपल्या प्रियजनांपासून दूर असण्यामुळे खचलेले असोत त्यांना प्रेरणा देण्यासाठी, उद्दिष्ट दृढ करण्यासाठी आणि आशेचा किरण दाखवण्यासाठी चित्रपटांच्या …
Read More »पाच वेळा अपयश येऊनही…
आयआयटी पदवीधर विशाल नरवडे यांनी युपीएससी परीक्षा पाच वेळा दिली आणि दरवेळी अपयश आलं. मात्र त्यांनी हार मानली नाही. अखेर सहाव्या प्रयत्नात ९१वी रँक मिळवून आयएएस अधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण केलं. भारतात युपीएससी सिव्हिल सेवा परीक्षा उत्तीर्ण होणं हे लाखो तरुणांचं स्वप्न असतं. या परीक्षेचा प्रवास अत्यंत कठीण आणि चढ-उतारांनी भरलेला असतो. परंतु सातत्य, प्रामाणिक प्रयत्न आणि जिद्द यांच्या जोरावर …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र