लेख-समिक्षण

पहिल्यांदा मेकअप करताना…

मेकअप करणे हा स्रियांचा जन्मसिद्ध अधिकार आहे, असं म्हटलं जातं. बदलत्या काळात सौंदर्याविषयीची आणि एकंदरीतच राहणीमानाबाबतची जागरुकता किंवा अवेअरनेस वाढल्यामुळे नियमित किंवा वारंवार मेकअप करणार्‍या मुली-तरुणी-महिलांची संख्या वाढली आहे. अर्थात, तुम्ही जर पहिल्यांदाच मेकअप करत असाल तर काही गोष्टी आवर्जून लक्षात घ्यायला हव्यात. मेकअप करण्यापूर्वी चेहरा सौम्य फेसवॉशने किंवा कोमट पाण्याने धुवा. • मेकअप करण्यापूर्वी त्वचेवर ५-१० मिनिटे बर्फ चोळा. …

Read More »

नाज्का लाईन्समध्ये एलियन्स?

पेरू देशातील वाळवंटी मैदानात प्राचीन काळात भव्य रेषांच्या सहाय्याने काही आकृत्या निर्माण करण्यात आलेल्या आहेत. त्यांना ‘नाज्का लाईन्स’ म्हणून संबोधले जात असते. या आकृत्या आकाशातून किंवा उंच ठिकाणांवरून पाहिल्यावरच समजतात. अशा भव्य आकृत्या व आखीव सरळ रेषांची कशी निर्मिती झाली, याचे कुतूहल आजही कायम आहे. आता ‘एआय’ म्हणजेच ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’च्या सहाय्याने तिथे यापूर्वी पाहण्यात न आलेल्या तीनशेपेक्षाही अधिक नाज्का लाईन्स …

Read More »

सायकल ब्रँडची प्रेरणादायी कहाणी

१९१२ मध्ये सर्वसाधारण कुटुंबात जन्मलेल्या एन रंगा राव यांचे वडील शिक्षक होते. रंगा राव ६ वर्षांचे असताना त्याच्या वडिलांचं निधन झालं. वडिलांच्या निधनाने सर्व जबाबदारी रंगा राव यांच्यावर आली. लहान वयात कुटुंबाची इतकी मोठी जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. त्यांना शिक्षणाची मोठी आवड होती, पण खिशात पैसे नव्हते. घरची परिस्थिती चांगली नव्हती, अशात शिक्षण सुरूच ठेवण्यासाठी त्यांनी शाळेच्या बाहेर व्यवसाय सुरू …

Read More »

उपहासमर्यादेची आठवण

हास्य हा उत्स्फूर्त मानवी भावनाविष्कार आहे. मानवी जगणे आनंददायी बनण्यासाठी हास्य ही सर्वांत महत्त्वाची बाब आहे. पण आपल्याला किंवा इतरांना हसू यावे यासाठी एखाद्याच्या व्यक्तिमत्वाचा, परिस्थितीचा समाजघटकाचा किंवा ओळखीचा उपमर्द करणे, अवहेलना करणे किंवा अश्लील शेरेबाजी करणे याचा अधिकार कोणालाही दिलेला नाहीये. ही बाब आपल्या कुटुंबाच्या आणि भवतालातल्या संस्कारांमधून मनावर आपोआपच रुजलेली असते. सुसंस्कृत समाजात लोकांमध्ये याबाबतची जाण महत्त्वाची असते. …

Read More »

अंतरिक्षातील पहारेकरी

‘घार हिंडते आकाशी, झाप घाली पिल्लांपाशी,’ हे संत जनाबाईंचे शब्द आपल्या परिचयाचे आहेत. आधुनिक काळात या शब्दांची आठवण करून देतात ते आपण अवकाशात सोडलेले उपग्रह. पृथ्वीच्या वातावरणाबाहेर, भूस्थिर कक्षेत काम करणारे हे उपग्रह आपल्या संरक्षणाच्या दृष्टीनं खूप मोलाची जबाबदारी पार पाडतात. सीमेवर युद्धजन्य परिस्थिती आणि तणाव आपण सध्या अनुभवतो आहोत. दहशतवाद्यांच्या तळांवर भारताने अचूक हल्ला करून ते उद्ध्वस्त केले. शत्रूची …

Read More »

अमरावतीच्या सुपुत्राने घेतली सरन्यायाधीशपदाची शपथ

अमरावतीचे सुपूत्र आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांनी भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून बुधवारी शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात त्यांना शपथ दिली. माजी सरन्यायाधीश संजीव खन्ना हे मंगळवार १३ मे रोजी निवृत्त झाले. बी. आर. गवई हे आता २३ नोव्हेंबर २०२५ रोजीपर्यंत भारताचे सरन्यायाधीश म्हणून काम पाहणार आहेत. न्या. गवई यांना सरन्यायाधीश म्हणून काम करण्यासाठी …

Read More »

संघर्ष शमला,पण प्रतिकारहीन मानसिकतेचे काय?

भारताच्या शूर जवानांनी दिलेल्या आक्रमक प्रत्युत्तरानंतर पाकिस्तानने अखेर गुडघे टेकले आहेत. संघर्षविराम झाला आहे. दहशतवाद्यांना आणि पाकिस्तानला योग्य तो धडा देऊन भारताने आपले पहिले उद्दिष्ट साध्य केले आहे. पण यादरम्यान एक प्रश्न सतत मनाला अस्वस्थ करतो आहे… तो म्हणजे बैसरन व्हॅलीत ४०० लोकांच्या नजरेसमोर २६ पर्यटक मारले गेले. यामध्ये घोडेवाला सय्यद वगळता एकाही व्यक्तीने प्रतिकार का केला नाही? एकाने जरी …

Read More »

संघर्षविरामावरुन अनाठायी गहजब

’ऑपरेशन सिंदुर’ अंतर्गत भारताने पाकिस्तानला योग्य तो धडा शिकवला आहे. तरीही संघर्षविरामानंतर समाजमाध्यमांमधून काही अनाठायी प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पण आपण लक्षात घेतले पाहिजे की भारताने आपल्या सैन्याला पाकिस्तानी लष्करी तळ काबीज करण्याचे किंवा पाकव्याप्त भारतीय काश्मीरला आपल्या प्रजासत्ताक काश्मीरमध्ये परत जोडण्याचे आदेश अथवा उद्दिष्ट दिलेलेच नव्हते. आपला उद्देश दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करणे आणि प्रतिहल्ला करणार्‍या पाकिस्तानला धडा शिकवणे …

Read More »

अभिनेत्री ते आयएएस

कन्नड अभिनेत्री एचएस कीर्तना वडिलाचे स्वप्न साकार करण्यासाठी अभिनय सोडून आयएएस अधिकारी बनली. लहान वयातच अभिनय सुरू करून तिने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले. मात्र, वडिलांच्या इच्छेप्रमाणे सरकारी अधिकारी होण्यासाठी तिने सिनेमा सोडून स्पर्धा परीक्षेच्या रिंगणात उडी घेतली. तिचा अभिनय सोडण्याचा निर्णय आणि स्पर्धा परीक्षेचे शिवधनुष्य उचलण्यासाठी तिने घेतलेली अपार मेहनत खरोखरच कौतुकास्पद आहे. एका प्रसिद्ध अभिनेत्रीने इतकी मेहनत …

Read More »

तंत्रज्ञानाने बॉलिवूडचा कायापालट!

अलिकडच्या काळात माहिती आणि तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटिलिजन्सने सर्वच क्षेत्रावर व्यापक परिणाम केला आहे. यास मायानगरी देखील अपवाद राहिलेली नाही. चित्रपट निर्मितीच्या तंत्रात काळानुसार बदल झाला. पूर्वी चित्रपट तयार करताना बर्‍याच अडचणींचा सामना करावा लागत असे. कालांतराने तंत्रज्ञानाच्या विकासामुळे याचा वापर वाढत गेला आणि चित्रपट तयार करणे तुलनेने सोपे राहू लागले. आता तर एआयमुळे चित्रपट निर्मिती ही खूपच सुलभ झाली आहे. …

Read More »