गुजरातमधील अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे जाणारे एअर इंडियाचे विमान गुरुवारी दुपारी १.३८ वाजता उड्डाणानंतर अवघ्या पाच मिनिटांत मेघानी नगर परिसरात कोसळले. या भीषण अपघातात विमानातील २४१ प्रवासी आणि तीन बी. जे. मेडिकल कॉलेजचे २० डॉटर व स्थानिक नागरिक असे २६१ जण ठार झाले आहेत. दैव बलवत्तर असल्याने रमेश विश्वकुमार नावाचा केवळ एक प्रवासी विमानातून …
Read More »TimeLine Layout
June, 2025
-
15 June
का कोसळले विमान?
अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळून झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आणि तितकीच चिंताजनक आहे. वास्तविक, बोईंग ७८७ ड्रीमलाइनर ही विमाने सामान्यतः सुरक्षित मानली जातात. एअर इंडियाकडे आजघडीला २५ पेक्षा अधिक ड्रीमलायनर विमाने आहेत. याखेरीज कतार, एतिहाद, ब्रिटिश एअरवेज, चायना साउदर्न, एअर फ्रान्स, एअर कॅनडा यांच्याकडेही बोईंगची विमाने आहेत. हे त्याचे पहिलेच ‘फॅटल हुल-लॉस’ मानले जात आहे. सदर घटनेतील वैमानिकही अनुभवी आणि …
Read More » -
15 June
चीनचा कृषी दहशतवाद ः जगापुढे नवा धोका
पाच वर्षांपूर्वी जगाला कोरोना महामारीच्या गर्तेत ढकलणार्या चीनने पुन्हा एकदा जैविक युद्ध छेडण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. यावेळी त्यांनी थेट जागतिक महासत्ता असणार्या अमेरिकेला लक्ष्य केले असून तेथील तपास यंत्रणांच्या सजगतेमुळे भला मोठा अनर्थ होता होता टळला आहे. अमेरिकेतील न्यायालयात उघड झालेल्या माहितीनुसार, चीनमधून दोन नागरिकांनी एक अत्यंत घातक फंगस अमेरिकेमध्ये आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्याकडून ‘फ्यूजेरियम ग्रॅमिनेरम’ नावाचा …
Read More » -
8 June
कपिलच्या पुनरागमनाची धमाल!
आपल्या विनोदाने प्रेक्षकांना खळखळून हसवणारा विनोदी अभिनेता कपिल शर्मा बहुप्रतीक्षित सिक्वेल ‘किस किसको प्यार करू २’साठी तयार आह़े ‘किस किसको प्यार करू’ या सुपरहिट कॉमेडी चित्रपटाच्या सिक्वलचे शूटिंग अनुकल्प गोस्वामी यांच्या दिग्दर्शनाखाली मुंबईत सुरू झाले आहे. या चित्रपटात कपिल शर्मा मुख्य भूमिकेत असून, हा चित्रपट विनोद आणि गोंधळाचा डबल डोस देणार आहे. या चित्रपटाचे निर्माते रतन जैन, गणेश जैन आणि …
Read More » -
8 June
मनोरंजनसृष्टीतली धोयाची घंटा
कधीकाळी ज्या रूपेरी पडद्यावर आयुष्यातील आनंदाचे, दु:खाचे, प्रेमाचे, बंडाचे रंग पाहायला मिळायचे, तोच पडदा आज गोंधळलेल्या कोलाहलांनी व्यापलेला आहे. एकेकाळी गल्लोगल्लीतील रसिकांच्या काळजाला स्पर्श करणार्या कथा असायच्या; गीतांमध्ये लोकभावना झिरपत असत, संवादांमध्ये आशयसंपन्नता आणि भावनात्मकता असायची; पण आज सिनेसृष्टीवर कार्पोरेट गणितांचं स्वामित्व आहे. आज भावनांपेक्षा बजेट जास्त बोलतं. परिणामी, सिनेमांमध्ये कथा नसते, फक्त ‘कंटेंट’ असतो. अभिव्यक्ती हरवते चालल्याने निखळ, निरलस …
Read More » -
8 June
पर्यावरणपूरक उद्योगभरारीचा आदर्श
दिल्लीतील विशाल सिंह यांनी २०२० मध्ये एक वेगळा मार्ग निवडला. पर्यावरणपूरक, टिकाऊ आणि नैतिक व्यापाराचे स्वप्न घेऊन त्यांनी हेम्पलूम या ब्रँडची स्थापना केली. विशेष म्हणजे, त्यांनी ही सुरुवात फक्त ५०,००० रुपयांत केली. आज, अवघ्या चार वर्षांत, हेम्पलूम वर्षाला ७० ते ८० लाख रुपयांचा व्यवसाय करत आहे. हा ब्रँड भारतातला एकमेव असा ब्रँड आहे जो भांग या वनस्पतीपासून तयार होणार्या सूताचा …
Read More » -
8 June
रुक्ष केसांसाठी हेअरपॅक
केसांची योग्य देखभाल न केल्यास किंवा केसांमध्ये पुरेशी आर्द्रता नसेल तर केस खूप कोरडे होतात. कोरडे केस हे खूपच रुक्ष आणि राठ होत जातात तसेच ते केस आकर्षक दिसत नाहीत. अशा केसांची कोणतीही हेअरस्टाईल बनवणे देखील अवघड होते, आणि केसांची नैसर्गिक चमकसुद्धा कमी होतो. हे केस मऊ बनवण्यासाठी रासायनिक सौंदर्य उत्पादने अजिबात वापरू नका. त्याऐवजी घरगुती हेअर पॅक वापरल्यास केस …
Read More » -
8 June
एटीएमला आता फेस डिटेक्शन
बँक खात्यातील पैसे काढण्यासाठी एटीएम मशिनचा वापर आता सर्वसामान्य बनलेला आहे. जगात पाण्यापासून सोन्यापर्यंत अनेक वस्तू मिळवण्याचेही असे मशिन्स आहेत. मात्र, बँकेच्या व्यवहारासाठी मनुष्याची ओळख पटवणे हे गरजेचे असते. चीनच्या संशोधकांनी प्रथमच चेहरा पाहून माणसाची ओळख पटवणारे एटीएम यंत्र तयार केले आहे. त्यामुळे एटीएम यंत्रांवर दरोडे पडण्याची जोखीम कमी होईल. तिंगशुआ विद्यापीठ व हांगझाऊची झेकवान टेक्नॉलॉजी कंपनी यांनी हे यंत्र …
Read More » -
8 June
अद्वितीय अभियांत्रिकीतील कौशल्य‘लता’
जम्मू आणि काश्मीरच्या उंच कड्यांमध्ये उभारलेला चिनाब रेल्वे ब्रिज म्हणजे केवळ एक अभियांत्रिकी आश्चर्य नव्हे, तर भारतीय विज्ञान, चिकाटी आणि नवे तंत्रज्ञान यांच्या अद्वितीय संगमाचे प्रतीक आहे. ६ जून २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन झाले. या प्रकल्पाच्या यशामागे भारतीय विज्ञान संस्था, बेंगळुरू येथील प्रा. जी. माधवी लता यांचे योगदान विशेष महत्त्वाचे ठरले आहे. त्या सिव्हिल …
Read More » -
8 June
पुन्हा एकदा संशयकल्लोळ
काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी जी ’ऑपरेशन सिंदूर’ ही कारवाई केली ती निश्चितच अभिनंदनीय असली, तरी आता या कारवाईचा धुरळा खाली बसल्यानंतर संशयाचे जे नवीन धुके निर्माण होऊन पहात आहे त्याचाही विचार करावा लागणार आहे. या संपूर्ण मोहिमेमध्ये देशातील सर्वच राजकीय पक्षांनी सरकारच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतली असली, तरी काँग्रेस पक्षातर्फे सातत्याने …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र






