निवडणुका जवळ आलेल्या असल्यामुळं ठिकठिकाणच्या प्रचारफलकांवर ‘मानवी वाघ’ बघायला मिळताहेत. बर्याच ठिकाणी नेत्याच्या फोटोला वाघाच्या किंवा सिंहाच्या चित्राची पार्श्वभूमी ग्राफिक्सच्या माध्यमातून केली जाते. नेत्यांची तुलना वाघाशी किंवा सिंहाशी करण्याची मोठी परंपरा आपल्याकडे आहे. वाघ हा सर्वोच्च शिकारी म्हणजे ‘अपेक्स अॅनिमल’ म्हणून ओळखला जातो. म्हणजे जैवसाखळीचं सर्वोच्च टोक. आणि सिंह तर जंगलचा राजाच. या दोघांना संपूर्ण जंगल घाबरतं. जंगलचे राजे सुस्तावून …
Read More »TimeLine Layout
November, 2024
-
10 November
‘लाडकी बहीण’ ला मविआकडून ‘महालक्ष्मी’ ने उत्तर
विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघांडीने 5 गॅरंटी जाहीर केल्या आहेत. मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलात महाविकास आघाडीची सभा झाली. या सभेतून मविआकडून विधानसभा निवडणुकीसाठी पंचसूत्री जाहीर करण्यात आली. ज्यात 5 मोठ्या आश्वासनांचा समावेश आहे. यातील पहिले आश्वासन राहुल गांधी यांनी जाहीर केले.महायुतीच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला महालक्ष्मी योजनेला उत्तर शोधण्यात आले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या सभेत आरएसएसवरही हल्ला चढविला. …
Read More » -
10 November
सुरुक्षित पदार्पण
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी या प्रथमच निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. त्यांनी 23 ऑक्टोबर रोजी केरळच्या वायनाड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रियांका या अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या राजकारणात पडद्यामागे सक्रिय राहिल्या आहेत. 1990 च्या दशकाच्या शेवटच्या काळात त्यांनी आई सोनिया गांधी यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली. याशिवाय 2004 मध्ये अमेठीत राहुल गांधी उतरले तेव्हा प्रियांका गांधी यांनी त्यांच्यासाठी जोरदार जनसंपर्क अभियान …
Read More » -
10 November
परकीयांच्या हाती नकोत बँकांची सूत्रे
मार्च 2020 मध्ये भारताची एक नामांकित खासगी येस बँक ही व्यवस्थापनाने केलेल्या चुकांमुळे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोचली. एखादी पतसंस्था दिवाळीखोरीत निघाल्यावर ठेवीदारांची ज्याप्रमाणे शाखेबाहेर गर्दी होते, तशी गर्दी येस बँकेच्या शाखांबाहेर झाली. एटीएममधून ठरावीक रक्कमच काढता येत होती. कमी कालावधीत दबदबा निर्माण केलेल्या या बँकेच्या शेअरचे मूल्य तीन अंकीवरून दोन अंकावर आले. अशावेळी भारतीय स्टेट बँकेने 49 टक्के शेअर खरेदी करत …
Read More » -
3 November
किशोर कुमारांच्या भूमिकेत झळकणार?
अभिनेता आमिर खान दिग्गज गायक किशोर कुमार यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिकमध्ये काम करणार असल्याची माहिती समोर आली आहे.अनुराग बसू आणि भूषण कुमार किशोर कुमार यांच्या आयुष्यावर एक बायोपिक बनवत आहेत. यासाठी आमिर खानला ऑफर देण्यात आली आहे. समोर आलेल्या रिपोर्टनुसार, आमिर खानला किशोर कुमार खूप आवडतात आणि त्यांच्या वरील प्रोजेक्टमध्ये काम करण्यासाठी तो उत्सुक आहे. त्यातच दिग्दर्शक अनुराग बसूची एक …
Read More » -
3 November
पडद्यावरचा दीपोत्सव
दिवाळीचे वेध लागताच युट्यूबपासून ब्लूटूथपर्यंत एकच गाणे वाजत राहते, ते म्हणजे ‘अष्टविनायक’ चित्रपटातील मधुसुदन कालेलकर यांचे ‘आली माझ्या घरी ही दिवाळी…’ . अनुराधा पौडवाल यांचा स्वरसाज असलेल्या या गीताने प्रत्येक दिवाळीचा आनंद द्विगुणीत केला आहे. मराठी पडद्यावरच नाही तर हिंदीच्या पडद्यावरही कलाकारांनी दिवाळीच्या उत्सवाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र अलिकडच्या काळात मराठी आणि हिंदी चित्रपटांत दिवाळीचे फटाके कमी …
Read More » -
3 November
काळजी शरीरसंपदा कमावतानाची
नव्या वर्षात बहुतेकजणांच्या यादीत सिक्स किंवा एट पॅक बनवण्याची नोंद असेल. कुणाला शेपमध्ये यायचं असतं तर कुणाला कसरत करून कोणत्या तरी स्पोर्टसाठी शरीर तंदुरूस्त करायचं असतं. मात्र त्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळणं मात्र गरजेचं असतं. नाहीतर अतिव्यायाम आणि डाएटच्या नावाखाली अयोग्य आहारामुळे शरीर घडवण्याच्या वयात त्याची झीज होऊ लागते. याचे परिणाम लगेच दिसत नाहीत पण तरूणपणात केलेल्या चुकीच्या व्यायामाची शिक्षा शरीराला …
Read More » -
3 November
पांढर्या केसांवर उपाय
वाढते प्रदूषण, खराब आहार आणि जीवनशैली दिवसेंदिवस बिघडत चालल्यामुळे लोकांना अनेक गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या समस्यांमध्ये आढळणारी सर्वात सामान्य समस्या म्हणजे केस पांढरे होणे. महिलांमध्ये केस पांढरे होण्याची समस्या आता फक्त पन्नाशीनंतरच्या वयोगटात राहिलेली नसून तिशी-पस्तिशीत अनेक जणींचे केस पांढरे होताहेत. साहजिकच यामुळे व्यक्मित्वावर नकारात्मक प्रभाव पडतो. या समस्येवर बटाट्याच्या सालीपासून बनवलेल्या डायचा वापर प्रभावी ठरत असल्याचे …
Read More » -
3 November
दोन बेटांचा वेळफरक
अलास्का आणि सायबेरिया हे अमेरिका आणि रशियाचे असे दोन भाग अतिशय थंड प्रदेेश म्हणून ओळखले जातात. या दोन्हींमध्ये बियरिंग स्ट्रेट अर्थात पाण्याचा रस्ता आहे. याच रस्त्यावर दोन अनोखे बेट आहेत. यातील पहिला बेट बिग डायोमिड. हे दोन्ही बेट एकमेकांपासून केवळ 3 किलोमीटर अंतरावर आहेत. पण, तरीही या दोन्ही बेटात एक इतका मोठा फकर आहे की, एकमेकांपासून इतके जवळ असताना देखील …
Read More » -
3 November
गांधीविचारांचा जीवनप्रकाश
दिवाळी हा अंधःकार दूर करुन प्रकाश देणारा लोकोत्सव आहे. यानिमित्ताने मनातील नकारात्मक अंधार नाहीसा करण्याचा प्रयत्न केल्यास आणि सद्गुणांची पेरणी केल्यास आयुष्य मंगलदायी होईल. यादृष्टीने संपूर्ण जगासाठी शिरसावंद्य असणार्या गांधीजींचे विचारधन आत्मसात करणे गरजेचे आहे. काय आहेत हे विचार? * तुमचे विचार सकारात्मक ठेवा. कारण तुमचे विचार तुमचे शब्द बनतात. तुमचे शब्द सकारात्मक ठेवा. कारण तुमचे शब्द तुमचे वर्तन बनतात. …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र






