लेख-समिक्षण

विशेष

रेल्वेने 50 प्रवाशांना चिरडले, 13 ठार

जळगाव जिल्ह्यात परधाडे रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या रेल्वे दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला, तर 40 जण जखमी झाले. लखनौवरून येणार्‍या पुष्पक एक्स्प्रेसमध्ये लागल्याची अफवा पसरल्याने काही प्रवाशांनी ट्रेनमधून खाली उड्या मारल्या. मात्र याच वेळी समोरून येणार्‍या कर्नाटक एक्स्प्रेसने सुमारे 50 प्रवाशांना चिरडले. या अपघातानंतर एकच कल्लोळ माजला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, इतर मंत्र्यांनी तातडीने दखल घेऊन जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल केले. जळगावच्या परधाडे …

Read More »

गणतंत्र आणि आपण

1857 ते 1947 ही सशस्त्र क्रांतीकारकांची परंपरा ते सनदशीर चळवळ, त्यावेळच्या काँग्रेसची स्थापना, मवाळ आणि जहाल गट, पुढे त्याला मिळालेले महात्मा गांधींचे नेतृत्त्व आणि स्वातंत्र्यानंतर सर्वसमावेशक अशा संविधानाची निर्मिती व त्यानंतर प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून जागतिक पटलावर झालेला भारताचा उदय यामध्ये असंख्य प्रभृतींनी प्रचंड त्याग आणि समर्पण दिले आहे. त्यामुळे आज आपण इथे आहोत. भारतीय प्रजासत्ताकाच्या पंच्याहत्तरीनिमित्त स्वाभीमानाने राष्ट्रध्वजाला सलाम करताना …

Read More »

हिप हिप हुर्ये…

कबड्डी आणि खोखोसारखे क्रीडाप्रकार हे वर्षानुवर्षे गावाखेड्यातील शाळांमधील मुले-मुली खेळत आले आहेत. या मैदानी खेळातून शारीरिक विकासाबरोबरच सांघिकतेचे गुण विकसित होत जातात. परंतु तरीही या क्रीडाप्रकारांची क्रिकेटच्या तुलनेत उपेक्षाच झाली होती. मध्यंतरी कबड्डी प्रो लिगमुळे या खेळाचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनद्वारे खो-खो विश्वचषक स्पर्धांचे आयोजन करुन आणखी एक मोठे पाऊल टाकण्यात आले. या स्पर्धेमध्ये भारताच्या पुरुष …

Read More »

राम मंदिरानंतरच खर्‍या स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ – सरसंघचालक

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असणार्‍या कुंभमेळ्यामध्ये नेहमीप्रमाणेच नागा साधूंकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात नागा साधूंबरोबर विविध रिल्सही तयार केल्या जात आहेत. नागा साधूंचा संबंध शैव परंपरेशी जोडलेला आहे. सनातन परंपरेचे रक्षण करण्यासाठी आणि या परंपरेला पुढे नेण्यासाठी प्रत्येक महाकुंभात वेगवेगळ्या संन्यासी आखाड्यांमध्ये नागा साधू बनण्याची प्रक्रिया अवलंबली जाते. नागा साधूंना प्रपंचाशी, संसाराशी काही देणेघेणे नसते. …

Read More »

नागा साधूंचे गूढ

प्राचीन काळापासून दर 12 वर्षांनी भरणार्‍या कुंभमेळ्याला हिंदू परंपरेमध्ये मानाचे स्थान आहे. कुंभमेळा हा केवळ धार्मिक मेळावा नाही तर भारतीय संस्कृती आणि परंपरेचे प्रतीक आहे. हा मेळा लाखो लोकांना एकत्र आणतो आणि सामाजिक ऐक्याची प्रचिती देतो. यासंदर्भात अनेक पारंपरिक प्रथा आहेत. यादरम्यान अशी एक भावना असते, ती म्हणजे कुंभमेळ्यामध्ये हिमालयामध्ये जाऊन खूप वर्षे कठोर साधना, तपश्चर्या केलेले अनेक साधू, संत, …

Read More »

अग्नितांडवाचा शोध आणि बोध

दक्षिण कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिसच्या जंगलात भडकलेल्या वणव्याच्या ज्वालांपुढे जागतिक अर्थसत्ता, महासत्ता, सामरीक सत्ता असणारी अमेरिका हतबल ठरताना दिसत आहे. ही आग मानवतेवरचे, जीवसृष्टीवरचे किती मोठे नैसर्गिक संकट आहे, याचा अंदाज अमेरिकेचा सर्वात मोठा शत्रू इराणही यामध्ये अमेरिकेला मदतीचा हात देत आहे, यावरून समजू शकतो. या आगीत जळून खाक झालेल्या इमारती नवतंत्रज्ञानाने काही दिवसांत पुन्हा उभ्या करता येतीलही; पण शेकडो वर्षांपासून …

Read More »

दिल्लीत काँग्रेसविरुद्ध इंडिया आघाडी

दिल्ली विधानसभा निवडणूक 5 फेब्रुवारी रोजी होत आहे. ही निवडणूक इंडिया आघाडीची परीक्षा घेत आहे. विरोधकांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी स्थापन केलेल्या इंडिया आघाडीतून काँग्रेस आता जवळपास बाहेर काढल्या गेली आहे. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध इंडिया आघाडी अशी लढाई सुरू झाली आहे. आम आदमी पार्टी (आप)ला इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी समर्थन जाहीर केले आहे. तृणमूल काँग्रेसनेदेखील नुकतेच ‘आप’ला समर्थन दिले असून …

Read More »

महांकुभाची महती

प्राचीन काळापासून दर 12 वर्षांनी भरणार्‍या कुंभमेळ्याला हिंदू परंपरेमध्ये मानाचे स्थान आहे. कुंभमेळा हा केवळ धार्मिक मेळावा नाही तर भारतीय संस्कृती आणि परंपरेचे प्रतीक आहे. हा मेळा लाखो लोकांना एकत्र आणतो आणि सामाजिक ऐक्याची प्रचिती देतो. यासंदर्भात अनेक पारंपरिक प्रथा आहेत. यादरम्यान अशी एक भावना असते, ती म्हणजे कुंभमेळ्यामध्ये हिमालयामध्ये जाऊन खूप वर्षे कठोर साधना, तपश्चर्या केलेले अनेक साधू, संत, …

Read More »

नव्या वर्षात आर्थिक संधी

आशावादी असल्याने आपण नेहमीच कॅलेंडरवर्षापासून सुरुवात करतो. नव्या वर्षात कितीही आव्हाने असली तरी आशावादी हे नेहमीच निराशावादापेक्षा उजवे ठरतात. अर्थतज्ज्ञांनी कितीही अडचणीचे चित्र आणि गणित मांडलेले असले तरी आशावादी हे आशेची कास सोडत नाहीत. या पार्श्वभूमीवर 2025 मध्ये आव्हानात्मक चित्र आहे आणि त्यावर तोडगा काढण्याचे काम आशावादी विचार ठेवणार्‍या लोकांना देखील जड जाणार आहे. नवीन वर्ष हे अनिश्चितेने व्यापलेले असल्यामुळे …

Read More »

तारक्कासह 11 जहाल नक्षलवादी शरण

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नक्षलवादी चळवळीला मोठा हादरा बसला. मागील 38 वर्षापासून नक्षल चळवळीत सक्रिय असलेली जहाल नक्षलवादी, दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीची सदस्य आणि नक्षल्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य भूपती याची पत्नी विमला सिडाम उर्फ तारक्का हिच्यासह 11 नक्षलवाद्यांनी बुधवारी गडचिरोली पोलीस मुख्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. त्यात 1 डीकेएसझेडसीएम, 3 डीव्हीसीएम, 2 एसीएम व 4 दलम …

Read More »