क्रिकेटची अफू

नुकताच आयपीएल 2026 हंगाम संपला. काय बेफिकीर बनवून ठेवले त्याने! आणि या हंगामातील आकडे? ते तर या अफूची संपूर्ण कहाणी सांगतात. गणित ही फारच आश्चर्यकारक गोष्ट आहे. जरा विचार करा. आयपीएल 2026 तब्बल 220 अब्ज मिनिटे पाहिला गेला. 220 अब्ज मिनिटे म्हणजे 3,666,666,666.67 तास. म्हणजे 15.28 कोटी दिवस! म्हणजे 4.18 लाख वर्षे. डोके गरगरून जाईल नाहीतर काय होईल? म्हणजे केवळ आयपीएलचा एक हंगाम पाहण्यात युगे लोटली. आणि अफू अशी की त्याचा पत्ताही लागला नाही. जग कुठे फिरून आले आणि आपण आयपीएलमध्येच गुंग राहिलो. किती लोक होते यात? टीव्ही आणि डिजिटल व्यासपीठांवर 1.12 अब्ज. स्टेडियममध्ये 65 लाख.
यपीएल. देशातील एक भव्य आयोजन. 2 महिने आणि 7 डझनहून अधिक सामन्यांचा सोहळा. घर, गल्ली, दुकान, रेल्वे, बस, कार्यालय सर्वत्र चर्चेचा केंद्रबिंदू. क्रिकेटच क्रिकेट.
असा एक राष्ट्रीय उन्माद की ज्याच्या पुढे इराण-अमेरिका युद्ध, तेल-गॅस संकट, नीट पेपरफुटी, सीबीएसई उत्तरपत्रिका, सीयूईटी परीक्षा, आयटी क्षेत्रातून जाणाऱ्या नोकऱ्या, कॉकरोच पार्टी, आकाशातून बरसणारी आग हे सारे दुय्यम ठरतात. हे सगळे तर चालूच असते. हे सगळे वेदना आहेत. अशा वेदना की ज्यावर उपाय शोधणेही एक मोठी वेदना आहे. आणि त्या विसरण्यासाठी या सगळ्यांवर भारी पडणारे सदाबहार क्रिकेट. एक नशा. एक वेगळीच झिंग. एक विलक्षण किक. खरे सांगायचे तर क्रिकेट ही अफू आहे. चाहत्यांसाठी, प्रेक्षकांसाठी. याच्या पलीकडे जे काही आहे ते वेदना आहे. भयंकर वेदना आहे आणि ती दीर्घकालीन आहे. त्या वेदनेवरचा एक परिणामकारक इलाज म्हणजे अफूस्वरूप क्रिकेट. आपण 140 कोटी लोकांचा देश. क्रिकेट खेळणारे मूठभर, पण क्रिकेटच्या झिंगेत बुडालेले असंख्य. त्यातही बहुसंख्य तरुण. आपले कर्णधार, ज्यांना देश पुढे न्यायचा आहे. जे आपले भविष्य आहेत.
आणि अफू? नोकरी, बेरोजगारी, महागाई, नैराश्य, प्रेमभंग सर्व काही विसरवून टाकते. झोपवून टाकते. मेंदू बधिर करते. बेफिकीर बनवून ठेवते. अफूचीही अनेक रूपे असतात. आत्ता क्रिकेट, तर कधी निवडणुका, कधी धर्म आणि जात, तर कधी काहीतरी वेगळे.
असो, नुकताच आयपीएल 2026 हंगाम संपला. काय बेफिकीर बनवून ठेवले त्याने! आणि या हंगामातील आकडे? ते तर या अफूची संपूर्ण कहाणी सांगतात. गणित ही फारच आश्चर्यकारक गोष्ट आहे. जरा विचार करा. आयपीएल 2026 तब्बल 220 अब्ज मिनिटे पाहिला गेला. 220 अब्ज मिनिटे म्हणजे 3,666,666,666.67 तास. म्हणजे 15.28 कोटी दिवस! म्हणजे 4.18 लाख वर्षे. डोके गरगरून जाईल नाहीतर काय होईल?
म्हणजे केवळ आयपीएलचा एक हंगाम पाहण्यात युगे लोटली. आणि अफू अशी की त्याचा पत्ताही लागला नाही. जग कुठे फिरून आले आणि आपण आयपीएलमध्येच गुंग राहिलो. किती लोक होते यात? टीव्ही आणि डिजिटल व्यासपीठांवर 1.12 अब्ज. स्टेडियममध्ये 65 लाख.
अजूनही काही आकडे आहेत. त्यांच्याकडेही लक्ष द्या.केवळ अब्जावधी मिनिटांचाच नव्हे, तर अब्जावधी रुपयांचाही मोठा व्यवहार झाला. ही अफू उगाच नाही. खेळ हा वेगळा विषय आहे. येथे तळाशी असलेले सत्य दुसरे काही नसून केवळ पैसा आहे. जेव्हा जाहिरातींमधून 7,500 कोटी रुपयांची कमाई झाली असेल, जेव्हा सर्व 10 संघांनी मिळून खेळाडूंवर 1,510 कोटी रुपये खर्च केले असतील, जेव्हा प्रत्येक खेळाडूला प्रत्येक सामन्यासाठी साडेसात लाख रुपयांचे मानधन वेगळे मिळाले असेल, तेव्हा वातावरणात अफू का मिसळली जाणार नाही?
या अफूसदृश क्रिकेटचा आणखी एक पैलू आहे. स्टेडियम, टीव्ही, डिजिटल, जाहिराती वगैरे जर वरवरचे जग असेल, तर सट्टेबाजी हे त्याचे अंडरवर्ल्ड आहे. प्रत्येक सामना, प्रत्येक चेंडूवर लागणारे पैजांचे व्यवहार. ॲप्स बंद झाले असतील, पण हजारो कोटी रुपयांची उलाढाल ज्या व्यवसायात होते तो व्यवसाय कधी बंद होत नाही. हीदेखील त्या अफूचीच एक बाजू आहे. क्रिकेट खरोखरच अफू आहे. अशी सवय लागली आहे की ती सुटणे अशक्य वाटते. आणि ती सोडवून घेण्याची कुणाला गरजही काय वाटणार? शेवटी इतक्या वेदनांवरचा इतका सोपा उपाय दुसरीकडे कुठे मिळणार?
आणखी एक गोष्ट. अफूची सर्वात मोठी करामत हीच असते की ती माणसाला सहभागी नव्हे, तर केवळ प्रेक्षक बनवते. आपण खेळतो कमी, पाहतो जास्त. आणि खेळणार तरी कुठे? मैदाने उरलेली नाहीत. जी आहेत, तिथे खेळ शिकवण्याचा व्यवसाय आहे. खेळण्यासाठी वेळही कुठे उरला आहे? आणि वेळ असलाच, तर चिंता इतक्या आहेत की खेळण्याची इच्छाच मरून जाते. सत्य हे आहे की खेळ आता शरीराचा भाग राहिलेला नाही, तर उपभोगाचा भाग बनला आहे. काही लोक खेळून कोट्यधीश होत आहेत, काही लोक खेळ घडवून अब्जाधीश होत आहेत आणि कोट्यवधी लोक खेळ घडताना पाहण्यात आपला वेळ खर्च करत आहेत. हीच त्या अफूची खरी करामत आहे.
आणि कदाचित हीच तिची सर्वात मोठी यशोगाथा आहे. आपण खेळ जगत नाही, तर खेळाचा तमाशा जगत आहोत. कोट्यवधी डोळे पडद्यांवर खिळलेले आहेत, तर जमिनीवर काही वेगळाच खेळ सुरू आहे. प्रश्न क्रिकेटचा नाही. प्रश्न त्या समाजाचा आहे, जो सहभागापेक्षा प्रेक्षक बनून राहण्यात अधिक सहजता अनुभवू लागला आहे. जोपर्यंत आपण खेळ खेळण्यापेक्षा तो पाहण्यात आणि जीवन बदलण्यापेक्षा ते विसरण्यात आनंद शोधत राहू, तोपर्यंत ही अफू विकली जाईल, चढत राहील, बेफिकीर बनवत राहील. आणि आपल्याला हे जाणवूही देणार नाही की नशेत आपण आहोत, क्रिकेट नाही.
(लेखक पत्रकार आहेत.)-योगेश मिश्र,ज्येष्ठ विश्लेषक, स्तंभलेखक

Check Also

कर्नाटकातील खांदेपालटाचा अन्वयार्थ

कर्नाटकामध्ये अखेर सत्तापालट झाला असून सिद्धरामैया यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. प्रदीर्घ ओढाताण आणि पक्षाच्या …