बेंगळुरू येथील 14 वर्षीय सूर्य उत्कर्ष याने वयाच्या अवघ्या 6 व्या वर्षी एका मोठ्या रस्ते अपघाताचा अनुभव घेतला होता. या अपघाताने सूर्याला भारतात रस्ते सुरक्षेबाबत पुरेशी जागरूकता आणि पायाभूत सुविधांचा अभाव असल्याचा प्रत्यक्ष अनुभव दिला. कालांतराने इतर अपघातग्रस्तांच्या संपर्कात आल्यावर त्याला याबाबत काहीतरी ठोस करावे असे वाटू लागले आहे. दोन वर्षांपूर्वी, वयाच्या 12 व्या वर्षी त्याने ‘द मार्ग इनिशिएटिव्ह’ ही स्वयंसेवक-आधारित संस्था स्थापन केली, जी भारतातील मुलांना रस्ते सुरक्षेचे धडे देते.
ही संस्था पूर्णपणे विद्यार्थ्यांमार्फत चालवली जाते. सध्या यामध्ये 20 स्वयंसेवक असून त्यापैकी 8 बेंगळुरूमध्ये, 7 दिल्लीत, 4 सुरतमध्ये आणि 2 अमेरिकेत कार्यरत आहेत. सूर्याच्या या कार्याची दखल युनिसेफ इंडिया आणि बेंगळुरू ट्रॅफिक पोलीस यांनी घेतली आहे. ’द मार्ग इनिशिएटिव्ह’ प्रामुख्याने शालेय अभ्यासक्रमातील रस्ते सुरक्षेच्या अभावावर काम करते. हे स्वयंसेवक शाळा आणि अनाथाश्र्मांमध्ये जाऊन मुलांना प्रशिक्षित करतात.
सूर्याच्या मते, शाळांना अशा सत्रांसाठी तयार करणे कठीण जाते. त्यांनी देशभरातील विविध शाळांना 2,000 पेक्षा जास्त ईमेल (एारळश्र) पाठवले, परंतु प्रतिसाद अत्यंत कमी मिळाला. याउलट, अनाथाश्र्म नवीन ज्ञान आत्मसात करण्यासाठी अधिक उत्सुक असतात. पालकांना वाटते की आपली मुले स्वतंत्र व्हावीत, पण रस्ते सुरक्षा शिकवण्याबाबत ते मागे पडतात.
दोन वर्षांच्या प्रवासात अनेक आव्हाने आली, पण सूर्य डगमगला नाही. त्याने आपल्या वयाचा वापर संधी मिळवण्यासाठी ’लिव्हरेज’ म्हणून केला. जेव्हा मी ईमेल किंवा कॉल करताना माझे वय सांगतो, तेव्हा समोरच्या व्यक्तीमध्ये कुतूहल निर्माण होते, असे तो सांगतो. सरकारी कायदे आणि नोकरशाहीच्या चौकटीत प्रवेश करणे सोपे नसले तरी, चिकाटीने तो आपले काम पुढे नेत आहे, ही गोष्ट कौतुकास्पद आहे.
Check Also
दहावी शिकलेला तरुण बनला कोट्यधिश उद्योगपती
जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस शून्यातूनही विश्व निर्माण करू शकतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे …
पांचजन्य वृत्तपत्र