छत्तीसगडमधील बिजापूर परिसरात बुधवारी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठ्या चकमकीला सुरुवात झाली आहे. दंतेवाडा, नारायणपूर, विजापूर आणि कोंडागाव जिल्ह्यांच्या सीमेवर जंगलात ही चकमक झाली. अबूझमाड परिसरातील या चकमकीत २७ नक्षलवादी मारले गेले आहेत. त्यात सीपीआय (माओवादी) चा सरचिटणीस नंबला केशव राव, ज्यांना बसवराजू म्हणून ओळखले जाते, ते २६ इतर नक्षलवाद्यांसह ठार झाले, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली. वसवा राजू हा वयस्कर नक्षली नेता असून त्याच्यावर तब्बल १.५ कोटी रुपयांचे बक्षीस सरकारने लावलेले होते.
गृहमंत्री अमित शाह यांनी ‘एस’ या सोशल मीडिया प्लॅटफफॉर्मवर पोस्ट शेअर करत यासंदर्भातील माहिती दिली आहे. आपल्या पोस्टमध्ये अमित शाह म्हणाले की, आज, छत्तीसगडमधील नारायरणपूरमध्ये सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईमध्ये २७ नक्षलवाद्यांना ठार करण्यात यश आलं आहे. यामध्ये सीपीआय-माओवादी पक्षाचा सरचिटणीस, सर्वोच्च नेता आणि नक्षलवादी चळवळीचा कणा असलेल्या नंबला केशव राव उर्फ बसवा राजू याचाही समावेश आहे. भारताच्या नक्षलवादाच्या विरोधातल्या तीन दशकांच्या लढाईत पहिल्यांदाच आपल्या सैन्याने सरचिटणीसपदाच्या नेत्याला निष्क्रिय करण्यात यश मिळवलं आहे. या मोठ्या यशाबद्दल मी आपल्या शूर सुरक्षा दलांचे आणि एजन्सींचे कौतुक करतो. तसेच, ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट पूर्ण झाल्यानंतर, छत्तीसगड, तेलंगणा आणि महाराष्ट्रात ५४ नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे आणि ८४ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे, हे सांगण्यासदेखील मला आनंद होत आहे. मोदी सरकारने ३१ मार्च २०२६ पूर्वी नक्षलवाद संपवण्याचा संकल्प केला आहे, असेही त्यांनी म्हटलं आहे.
नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या काही भागांत मागच्या काही दिवसांपासून सुरक्षा दलांकडून धडाकेबाज मोहिमा सुरू आहेत. या कारवाईच्या माध्यमातून अनेक भागातून नक्षलवाद्यांना हुसकावून लावण्यात सुरक्षा दलाला यश मिळाले आहेत. तसेच या चकमकींमध्ये अनेक नक्षवलादी मारले जात आहेत. दरम्यान, छत्तीसगडमधील बिजापूर परिसरात आज सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठ्या चकमकीला सुरुवात झाली आहे. अबूझमाड परिसरात झालेल्या या चकमकीत २७ नक्षलवादी मारले गेल्याचे वृत्त आहे. तसेच चकमक सायंकाळपर्यंत सुरू असल्याने मृत नक्षलवाद्यांची संख्या वाढू शकते, अशी शयताही वर्तवली जात आहे. मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांमध्ये नक्षली नेता वसावा राजू याचाही समावेश असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
छत्तीसगडमधील नारायणपूर, बिजापूर आणि दंतेवाडा डीआरजीचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये ही चकमक झाली. घटनास्थळी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावर गोळीबार सुरू आहे. तसेच डीआरजीच्या जवानांनी काही बड्या नक्षलवादी नेत्यांना घेराव घातल्या आहे. दंतेवाडा, विजापूर, नारायणपूर आणि कोंडागाव येथून डीआरजी सैनिकांना बाहेर काढण्यात आले. सकाळी या भागात एक चकमक झाली.या चकमकीत नक्षलवादी संघटनेचा सरचिटणीस वसावा राजू हा मारला गेल्याचेही सांगण्यात येत आहे. वसवा राजू हा वयस्कर नक्षली नेता असून, तो दंडकारण्यामध्ये नक्षलवादी चळवळीची पायाभरणी करणार्यांपैकी एक होता. मागच्या अनेक वर्षांपासून तो माड येथे लपलेला होता. तसेच त्याच्यावर तब्बल १.५ कोटी रुपयांचे बक्षीस सरकारने लावलेले होते. आजच्या चकमकीवेळी सुरक्षा दलांच्या जवानांनी नक्षलवाद्यांच्या सर्वात गोपनीय अड्ड्यावर हल्ला केला.
Check Also
पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा
केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामध्ये आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू …
पांचजन्य वृत्तपत्र