लेख-समिक्षण

नव्या वाणांची संजीवनी, पण…

औद्योगिक क्रांतीपूर्व काळ ते आतापर्यंत पृथ्वीचे तापमान दीड अंश सेल्सिअसने वाढले आहे. उत्पादन, वितरण अणि ग्राहक याची संपूर्ण साखळीच पर्यावरणावर अवलंबून आहे. अशावेळी हवामान बदलाला अनुकुल असणार्‍या उपक्रमांतून खाद्योत्पादनाला सर्वसमावेशक स्वरुप देऊ शकतोे. या क्रमात भारतीय कृषी संशोधन केंद्राने अधिक उत्पादन देणार्‍या 61 पिकांचे 109 वाण जारी केले आहेत. यात शेतीचे 69 आणि बागायतीतील 40 वाणांचा समावेश आहे. हे वाण किडीचा प्रतिकार करणारे देखील आहे. या नवीन वाणांना प्रभावीपणे शेतकर्‍यांपर्यंत नेले तर पीक बदलासाठी ते वरदान ठरेल. कृषी क्षेत्रातील बियाणे, माती, पाणी अणि स्थानिक पातळीवर वीजेची उपलब्धता या आधारावरच शेतीला लाभदायक करता येऊ शकते.
हवामान बदलाचा सर्वाधिक दुष्परिणाम कृषी क्षेत्रावर होतात. वातावरणातील नकारात्मक बदलाचा परिपाक म्हणजे अवकाळी पाऊस, महापूर, दुष्काळ, माती शुष्क होणे यासारख्या गोष्टी. पृथ्वीवरच्या वाढत्या तापमानामुळे पिकाला पोषक ठरणारी माती आता निस्तेज होत आहे. मातीतील ओलावा, पिकांचे पोषण करणारे घटक, जमिनीला सुपिकता आणणारे, भूशभुशीत करणारे किटक कमी होत आहेत. परिणामी पिकांच्या उत्पादनात घट होत आहे. त्याचवेळी किडीचा प्रादूर्भाव, रोगराई यासारखे जैविक घटकही पिकांची नासाडी करण्यात कारणीभूत ठरताना दिसतात. औद्योगिक क्रांतीच्या अगोदर (1850-1900) पासून आतापर्यंत पृथ्वीचे तापमान दीड अंश सेल्सिअसने वाढले आहे. उत्पादन, वितरण अणि ग्राहक याची संपूर्ण साखळीच पर्यावरणावर अवलंबून आहे. अशावेळी हवामान बदलाला अनुकुल असणार्‍या उपक्रमांतून आपण खाद्योत्पादनाला सर्वसमावेशक स्वरुप देऊ शकतो तर दुसरीकडे जमिनीलाही पोषक ठरणारी बाब ठरू शकते. या क्रमात भारतीय कृषी संशोधन केंद्र (आयएआरआय) ने अधिक उत्पादन देणार्‍या 61 पिकांचे 109 वाण जारी केले. यात शेतीचे 69 आणि बागायतीतील 40 वाणांचा समावेश आहे.
भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) सह वेगवेगळ्या संशोधन संस्था तसेच कृषी विद्यापीठात अनुवंशिक निकषाच्या आधारावर हवामान बदलाच्या आव्हानांचा मुकाबला करतील, अशा वाणांची निर्मिती केली जात आहे. ते बायोफोर्टिफाइड म्हणूनही ओळखले जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत जारी केलेल्या हवामान बदलाला अनुकुल असणार्‍या वाणात तांदूळ, गव्हापासून ते कडधान्य, तेलबिया, डाळी आदींसह भाजीपाला, कंद, मसाले तसेच औषधी वनस्पतींचा यात समावेश आहे.
कर्नाल येथील मध्यवर्ती माती क्षारयुक्तता संशोधन केंद्र (उशपीींरश्र डेळश्र डरश्रळपळीूं ठशीशरीलह) ने विकसित केलेले आणि शेतात बहरण्यासाठी सज्ज असलेल्या भाताचे सीएसआर-101 (आयईईटी-30827) वाण आर्द्रता आणि खार्‍या पाण्यातही चांगले उत्पादन देणारे आहे. 125 ते 130 दिवसांत तयार होणारे पिक क्षारयुक्त पाण्यातही 35.15 क्विंटल प्रती हेक्टर तसेच सामान्य स्थितीत 55.88 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन देणारे राहू शकते. हे वाण किडीचा प्रतिकार करणारे देखील आहे. त्याला तमिळनाडू, उत्तर प्रदेश, हरियाना, कर्नाटकसाठी तयार करण्यात आले आहे. पंजाबच्या लुधियाना येथील भारतीय मका संशोधन केंद्रामार्फत आयएमएच 231 आयएमएचएसबी-20 के- 10 वाण जमीन ओलिताखाली जाणे किंवा मान टाकण्याच्या स्थितीचा देखील सामना करू शकते. हे वाण पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, आसामसाठी विकसित केले आहे. बागायतीर्तंगत सादर केलेले टोमॅटोचे वाण मे महिना आणि ऑक्टोबरदरम्यान शेतीसाठी पुरक ठरणारे आहे. ते उच्च तापमानतही टिकून राहते आणि त्याचे सरासरी उत्पादन 351 क्विंटला प्रति हेक्टर आहे. एकुणातच प्रत्येक नवीन वाण हे कोणत्या कोणत्या जैविक आणि अजैविक घटकाचा मुकाबला करणारे आहे.
प्रयोगशाळा ते शेतीपर्यंतचे नवे संशोधन
पर्यावरण अनुकुल तसेच उच्च उत्पादन देणारे वाण तयार करण्यासाठी शेतीतून नमुने गोळा केली जातात. उदा. एखाद्या पिकाचे कोणतेही वाण 45 अंश सेल्सिअसवरही चांगले उत्पादन देत असेल तर त्याचे ‘जर्मप्लाझम’ गोळा केले जाते. प्रयोगशाळेत त्याच्या अनुवांशिकता पटविली जाते आणि त्याला अन्य उच्च उत्पादन क्षमता असलेल्या वाणात, बियाणात स्थानांतरित केले जाते. त्यानंतर त्याच्यावर देशातील वेगवेगळ्या संशोधन केंद्रात चाचणी घेतली जाते. त्याचे निकष निश्चित केल्यानंतर वेगवेगळ्या राज्यांत व भागात नव्या बियाणांवर होणार्‍या प्रभावांचा, परिणामाचा अभ्यास केला जातो. त्यापासून येणार्‍या निष्कर्षाच्या आधारावर प्रयोगशाळेत तयार केलेले नवे वाण, बियाणे शेतकर्‍यांपर्यंत नेले जाते.
मातीची पोषण क्षमता वाढवा
अनुवांशिकतेच्या आधारावर तयार होणार्‍या बियाणांची उत्पादनक्षमता वाढविताना मातीचे आरोग्य देखील जोपासले पाहिजे. माती परीक्षणावरून देशात अनेक दावे प्रतिदावे केले जातात. परंतु प्रत्यक्षात मातीची स्थिती ही कोणापासून लपून राहिलेली नाही. पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी खतांचा होणारा बेसुमार वापर ही मातीला निष्प्राण करण्याबरोबरच मानवी आरोग्यासमोरही मोठे संकट उभा करत आहे. किमान आधारभूत मूल्यांच्या गणिताने शेतकर्‍यांना धान आणि उसासारख्या नगदी पिकांवरचे अवलंबित्व वाढविले आहे. त्यामुळे जमिनीतील पाण्याचा उपसा वाढला असून पातळी अप्रत्यक्षपणे घसरली आहे. अशावेळी प्रयोगशाळेत चाचणी करताना मातीच्या सुपिकतेकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. मातीच्या चाचणीचे काम जीपीएसमार्फत केले जात आहे. त्याला आणखी प्रोत्साहन द्यायला हवे. कृषी विज्ञान केंद्राकडून दिले जाणारे प्रशिक्षण, सल्ला, प्रयोग हे केवळ प्रगतशील शेतकर्‍यांपुरतीच मर्यादित न राहता अल्पभूधारक आणि सामान्य शेतकर्‍यांपर्यंत पोचणे गरजेचे आहे. शेतीतून प्रयोगशाळामार्गे पुन्हा शेतीकडे येणार्‍या उच्च प्रतीच्या बियाणांचे अधिकाधिक उत्पादन करण्याचा मुख्य हेतू म्हणजे शेती हवामान बदलाला अनुकूल करणे. मात्र मातीची सुपिकता, पाण्याची उपलब्धता आणि पिकांचे योग्य वेळापत्रक पाळले गेले तरच त्याचे अनुकुल फायदे पदरात पडतील. बीटी कॉटनचे अपयश हे त्याचे धडधडीत उदाहरण आहे.हरित क्रांतीच्या अनुभवातून सर्वांनी धडा घेतला पाहिजे. पीक अणि बागायतीच्या नव्या वाणांना सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी आणि लोकप्रिय करण्यासाठी राज्यांच्या कृषी विभागाबरोबरच विद्यापीठाशी संंबधित कृषी विज्ञान केंद्राची भूमिका देखील महत्त्वाची राहणार आहे.
खाद्यान्न संकट दूर होईल
भारत हा स्वातंत्र्याचा शतकमहोत्सव साजरा करेल तेव्हा देशाची लोकसंख्या ही 1 अब्ज 60 कोटींवर पोचलेली असेल. भारतीय कृषी संशोधन केंद्राच्या एका अहवालानुसार देशात 2050 पर्यंत 400 दशलक्ष टन खाद्यान्नांची गरज भासणार आहे. देशात 2022-23 मध्ये 329 दशलक्ष टन खाद्यान्नांचे उत्पादन झाले आहे. कृषी शास्त्रज्ञांकडून तयार होणार्‍या नव्या वाणांमुळे कडधान्य, डाळी, तसेच टोमॅटो, भोपळा, बटाटे आदींच्या शेतीला चालना मिळणार आहे. यानुसार औषधी वनस्पतीत अश्वगंधा, अर्क धन्वंतरी, मंडूकापर्णो यासारख्या पिकांचे प्रमाणही वाढणार आहे.
नवीन वाणांना प्रभावीपणे शेतकर्‍यांपर्यंत नेले तर पीक बदलासाठी हे वाण वरदान म्हणून सिद्ध होईल. देशातील विविध विद्यापींठ तसेच संशोधन केंद्रामार्फत पिकांचे हजारो प्रकारचे वाण आणि बियाणे विकसित केले जात आहेत. आजचा बाजार संकरित बियाणांनी भरलेला आहे. शिवाय देशातील बहुतांश शेतकर्‍याला प्रत्येक वातावरणात नवीन बियाणे खरेदी करावे लागतात. पण काही वर्षांपूर्वी शेतकरी दरवर्षी पिकांतून मिळणार्‍या बियाणांची साठवणूक करत असत. परिणामी या शेतीचा खर्च देखील कमी असायचा. देशी बियाणे स्थानिक वातावरण, हवामानास अनुकुल असायचे. हरित क्रांतीनंतर बियाणे ते कृषी संबंधित सर्व घडामोडी बाजारपूरक करण्यात आले आणि त्यामुळे शेतकर्‍यांचे उत्पादन वाढले असले तरी खर्चातही तितकीच वाढ झाली. यामुळे शेतकर्‍यांच्या हाती फारसा पैसा राहिला नाही. अशावेळी कृषी क्षेत्रातील बियाणे, माती, पाणी अणि स्थानिक पातळीवर वीजेची उपलब्धता या आधारावरच शेतीला लाभदायक करता येऊ शकते.– अरविंद मिश्र,कृषी-ऊर्जा-सहकार क्षेत्राचे अभ्यासक

Check Also

तृणमूल बंडखोरांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेस आणि पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या अडचणी थांबण्याचे …