लेख-समिक्षण

दिल्लीत ‘भाजप सरकार’

भाजपला 48 आणि आप ला 22 जागा मिळाल्या. तसेच माजी मुख्यमंत्री व आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि माजी मुख्यमंत्री मनिष सिसोदीया यांचा दारुण पराभव झाला.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी 58 टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. ‘आप’ला झटका बसला आहे. मतदानोत्तर एक्झिट पोलच्या सर्वेक्षणामध्ये त्याचे संकेत मिळाले होते. दिल्ली भाजपची लाट निर्माण करण्यात आली. या निवडणुकीचा दिल्लीमध्ये ‘अब की बार, भाजप सरकार’ स्थापन होण्याचे संकेत मिळाले. दीर्घ 27 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार आले आहे.
शनिवारी सकाळी ईव्हीएमवर मतमोजणीला सुरुवात झाली. त्यामध्ये पहिल्या फेरीपासूनच भाजपने आघाडी घेतली. आप पक्षाला सत्ताविरोधी लाटेचा फटका बसला. दिल्ली विधानसभेच्या एकूण 70 जागांसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान झाले. त्यामध्ये निवडणूक लढवणार्‍या 699 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये कैद झाले. केंद्रशासित प्रदेशाच्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी आम आदमी पक्ष (आप), भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि काँग्रेस यांच्यात जोरदार स्पर्धा झाली. तथापि, सत्तेच्या बाबतीत, मुख्य स्पर्धा आप आणि भाजपमध्ये होती. गेल्या दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसला खातेही उघडता आले नाही. दिल्ली विधानसभा क्षेत्रात देशाच्या सत्तेचे केंद्र आहे. त्यामुळे राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू, मुख्य सरन्यायाधीश संजीव खन्ना, उपराष्ट्रपती जगदीश धनखड, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा आदी विविध व्हीआयपी मतदारांनी मतदान केले. या मतदानात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 57.70 टक्के मतदान झाले होते.
त्यानंतर मतदानोत्तर एक्झिट पोल सर्व्हे जाहीर करण्यात आले. त्यामध्ये आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसत असल्याचे दिसून आले. या सर्व्हेनुसार भाजप दिल्लीत सरकार स्थापन करू शकते, असे संकेत मिळाले. पीपल्स पल्स एक्झिट पोलने भाजपला 51-60 जागांचे पूर्ण बहुमत दाखवले तर आपला 10-19 जागा आणि काँग्रेसला शून्य जागा मिळाली आहे. पीपल्स इनसाइट एक्झिट पोलनुसार, ‘आप’ला 25 ते 29 जागा, भाजपला 40 ते 44 जागा आणि काँग्रेसला दोन जागा आणि डीव्ही रिसर्चच्या एक्झिट पोलनुसार, सत्ताधारी ‘आप’ला 70पैकी 26 ते 34 जागा तर भाजपला 36 ते 44 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मॅट्रिजच्या एक्झिट पोलनुसार, ‘आप’ला 32 ते 37 जागा, भाजपला 35 ते 40 जागा आणि काँग्रेसला 0-1 जागा, जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार, भाजपला 39-45 जागा आणि ‘आप’ला 22 ते 31 जागा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. चाणक्य स्ट्रॅटेजीजनुसार, आम आदमी पक्षाला 25-28 जागा, भाजपला 39-44 जागा आणि काँग्रेसला 2-3 जागा आणि पी-मार्क एक्झिट पोलनुसार, आपला 21-31 जागा, भाजपला 39-49 जागा आणि काँग्रेसला 0-1 जागा मिळण्याची शक्यता आहे. या एक्झिट पोलमध्ये भाजपला बहुमत मिळेल असा दावा करण्यात आला.

Check Also

तृणमूल बंडखोरांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेस आणि पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या अडचणी थांबण्याचे …