पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सध्या सर्व देशभरात चर्चिला जाणारा मुद्दा म्हणजे नेमकं भारताचं प्रत्युत्तर कसं राहील? खरं तर याची जाहीर चर्चा करायचीच नसते, ते करुन दाखवायचं असतं. दरवेळी तोच-तो उपाय काम करत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती असं शिकवते की, कधी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढायचा असतो, कधी सिद्धी जोहरच्या वेढ्यातून निसटून जायचं असतं तर कधी लाल महालावर छापा टाकून शायिस्तेखानाची बोटं छाटायची असतात. शत्रूला कळता कामा नये की तुझ्यावर काय मार्गानं आम्ही चालून येणार आहोत.
पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला म्हणजे पाकिस्तानला ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’. या एका ओळीमध्ये हल्ल्यानंतर प्रत्यंतर येत जाणार आहे. पाकिस्तानबाबत असं म्हटलं जातं की, इतर देशांना सैन्य असतं, पण पाकमध्ये सैन्याला देश आहे. पाकिस्तानातील तथाकथित लोकशाही ही फसवी आहे. पाकिस्तानातील लोकप्रतिनिधी किंवा पंतप्रधानांना वेगळे अधिकार नाहीत. त्यांना लष्करप्रमुखांचं ऐकावं लागतं. पाकिस्तानचा सध्याचा लष्करप्रमुख म्हणजेच तेथील खरा राज्यकर्ता जनरल असिम मुनीर काही दिवसांपूर्वी असं म्हणाला होता की, पाकिस्तान मुस्लिम म्हणून आम्ही वेगळे राष्ट्र आहे. आपण हिंदूंबरोबर राहू शकत नाही, म्हणून आपल्या पूर्वजांनी फार मोठा संघर्ष केला आणि पाकिस्तान निर्माण केला. त्यापाठोपाठ घडलेली पहलगामची घटना ही जोडून पाहावीच लागेल. ती पाहिल्यास हा हल्ला केवळ दहशतवादी हल्ला नसून त्यामागे पाकिस्तान, तेथील लष्कर आणि आयएसआय यांचं पद्धतशीर नियोजन आहे. आता तर त्यांचा मंतरी ख्वाजा अब्बास स्वतःच म्हणतोय की, ही कारवाई पाकिस्तानच्या लष्करानं केली असून याबाबत आम्हाला अंधारात ठेवण्यात आलं. या सगळ्यामध्ये सूक्ष्म फरक शोधावे लागणार आहेत.
पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला केवळ दहशतवादी हल्ला नसून त्यामागे पाकिस्तान, तेथील लष्कर आणि आयएसआय यांचं पद्धतशीर नियोजन आहे. आता तर त्यांचा मंंत्री ख्वाजा अब्बास स्वतःच म्हणतोय की, ही कारवाई पाकिस्तानच्या लष्करानं केली असून याबाबत आम्हाला अंधारात ठेवण्यात आलं. या सगळ्यामध्ये सूक्ष्म फरक शोधावे लागणार आहेत. खरे तर हा एकानं मारल्यासारखं करायचं आणि दुसर्यानं रडल्यासारखं करायचं असा हा प्रकार आहे. पण ते काहीही असलं तरी एक गोष्ट स्पष्ट आहे की, आताचा भारत हा गप्प बसून ऐकून घेणारा नाही.
आज पाकिस्तानची स्थिती हालाखीची आहे. अर्थव्यवस्था कोलमडल्यात जमा आहे. आयएमएफकडून मदत मिळाल्याशिवाय पाकिस्तानचा डोलारा टिकूही शकत नाही इतक्या डगमगणार्या अवस्थेत आहे. पाकिस्तानच्या चार प्रमुख प्रांतांपैकी तिघांना पाकिस्तानात राहायचंच नाहीये. खैबर पख्तुन ख्वा (केपीके), ज्याचं रुढ नाव नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्सेसमध्ये तालिबानशी लढाई सुरु आहे. तेथील फार मोठ्या भागावर पाकिस्तानचं नियंतरणही नाहीये. सिंधमध्येही पाकिस्तानपासून वेगळं होण्याची ‘जियो सिंध चळवळ’ सुरू आहे. बलुचिस्तानमध्ये तर पाकिस्तानातून फुटण्यासाठीच्या कारवाया कमालीच्या वाढलेल्या आपण पाहातो आहोत. इतक्या सगळ्या भीषण स्थितीत भारताबद्दलचा द्वेष, तोही हिंदूंबद्दलचा, ‘काफिर’ म्हणून इस्लामच्या आधारावर हा उरलेला एकमेव रस्ता पाकिस्तानकडे शिल्लक होता. त्यामुळं यातील स्ट्रॅटेजिक थिंकिंग समजून घ्यावं लागेल की, ठरवून, नियोजन करुन केलेला हा हल्ला होता.
आजची परिस्थिती पाहता दिसणारी लक्षणं युद्धाच्या दिशेनं जाणारी आहेत, असं हळूहळू स्पष्ट होत चाललं आहे. पण प्रत्येक पावलाला वाटा अनेक असतात. त्यामुळं परिस्थिती युद्धाच्या दिशेनं जाईल की नाही, हे पहावं लागेल. पण सर्वसाधारण दिशा पाहिल्यास पाकिस्ताननं युद्धाची तयारी सुरू केली आहे आणि मी सूक्ष्म शोध घेतला असता असं आढळलं की, चीननंही तिबेटमधील विमानतळांवर एअरफोर्सची विमानं आणि तोफा आणून ठेवल्या आहेत. याचा अर्थ वाटचाल युद्धाच्या दिशेनं सुरू आहे. पण अशा विषयांमध्ये नेहमी दोन अधिक दोन बरोबर चार असं नसतं. म्हणूनच भारतानं काही महत्त्वाची पावलं उचलत हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केलाय. यातील पहिलं पाऊल म्हणजे सिंधु नदी पाणीवाटप कराराला स्थगिती दिली आहे. पाकिस्ताननं त्यापुढं जाऊन सिमला करार रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला; पण हा निर्णय म्हणजे बुडत्याचा पाय खोलात नेणारा आहे.
सध्या सर्व देशभरात चर्चिला जाणारा मुद्दा म्हणजे नेमकं भारताचं प्रत्युत्तर कसं राहील? पण याची चर्चा करायचीच नसते, ते करुन दाखवायचं असतं. दरवेळी तोच तोच उपाय काम करत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती असं शिकवते की, कधी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढायचा असतो, कधी सिद्धी जोहरच्या वेढ्यातून निसटून जायचं असतं तर कधी लाल महालावर छापा टाकून शायिस्तेखानाची बोटं छाटायची असतात. शत्रूला कळता कामा नये की तुझ्यावर काय मार्गानं आम्ही चालून येणार आहोत. याबाबत त्यांना सतत टेन्शनखाली ठेवणं, हाही एक रणनीतीचा भाग आहे. युद्धं ही कधीही गरम डोक्याने आणि भावनातिरेकानं चालून होत नाहीत. ती थंड डोक्यानं, आपल्या सोयीची वेळ, आपल्या सोयीचं गणित, आपल्या सोयीचं युद्धमैदान या सर्वांना मिळून मी शिवाजी महाराजांचा वारसा असं म्हणतो. तेव्हा पाकिस्तानच्या या कारवाईला उत्तर देताना भारत काय करेल याबाबत ‘आगे आगे देखिये होता है क्या’ हेच योग्य ठरेल.
बिहारमधल्या सभेत पंतप्रधानांनी मोजक्या शब्दांत योग्य तो इशारा दिलेला आहे. आम्ही हिशेब चुकता करू. लोकांमधील आताचा आक्रोश आणि भावनांचा अतिरेक स्वाभाविक असला तरी युद्ध जिंकण्यासाठी भावनातिरेक कामाचा नसतो. त्याला पद्धतशीर नियोजन असावं लागतं. बालाकोटनंतर आता मी तपशील सांगतोय की, बालाकोटमधील 150-200 मोबाईल ट्रॅक केले होते. आपल्या डिजिटल रेकॉर्डस्मध्ये माहीत होतं की, हे लष्करे तैय्यबाचे अतिरेकी आहेत. ते सर्व एकत्र असल्याचं डिजिटल ट्रॅकिंगमुळं लक्षात आलं तेव्हा आपण बॉम्ब टाकून त्यांना मारलं. हीच योग्य पद्धत असते. अशा गोष्टी सांगून केल्या जात नाहीत. राजनैतिक पातळीवर ‘टिट फॉर टॅट’नुसार गोष्टी घडताहेत. पण यावेळचं प्रत्युत्तर हे वेगळं असलंच पाहिजे.
पाकिस्तानचा भारत आणि हिंदूद्वेष इतका टोकाचा आहे की, पाकव्याप्तमध्ये जाणार्या किशनगंगा नदीला ते नीलम नदी म्हणतात. खरं तर नीलम हा शब्द मूळचा संस्कृतमधील आहे. पण यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, पाकिस्तानकडे एक राष्ट्र म्हणून टोकाचा धर्मांध इस्लामिक हिंदू द्वेष यापलीकडे त्यांना एकत्र ठेवणारं काहीही नाहीये. त्यामुळंच तेथील राजकीय नेत्यांकडून ‘खुनशी लबाडी’ करुन पाकिस्तान धोक्यात येतो तेव्हा धर्मांध इस्लामिक हाक दिली जाते. आज आपण सिंधु करार मोडणार म्हणजे पाकिस्तानच्या वाट्याचं 80 टक्के पाणी अडवणार. हे लगेच शक्य नाही. त्यामुळं पाकिस्तानला तात्क्ळ याची झळ बसणार नाही. पण पाकिस्तानातीलच एका अभ्क्षासकाच्या मते भारताने पाणी अडवल्यास दीर्घकालीन दृष्ट्या पाकिस्तानला मोठी झळ बसू शकेल. अर्थातच, या गोष्टीला वेळ लागेल.
शेवटचा मुद्दा म्हणजे 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्राईलवर हमासने केलेल्या हल्ल्याची पद्धत आणि पहलगाममधील हल्ल्याची पद्धत यामध्ये साधर्म्य आहे. त्यामुळे आता उत्तरही इस्राईल स्टाईलनेच द्यायला हवे. पाकिस्तानलाही याची कल्पना आहे की, आजचा भारत पूर्वीचा भारत नाहीये. तो घरात घुसून ठोकणारा आहे. प्रत्यक्ष युद्ध झाले तर पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडून जाईल. मुनीरच्या आधीचा लष्करप्रमुख जनरल बावेजा असे म्हटले होते की, पाकिस्तानकडे टँकमध्ये घालण्यासाठी तेल नाहीये. पण युद्धशास्रामध्ये एक पद्धत अशीही वापरली जाते की, शत्रूचे डोके फिरवून, त्याला पद्धतशीरपणे आपल्या सोयीच्या मैदानात खेचले जाते. त्यामुळं याचा सामना करताना शिवरायांची युद्धनीतीच गरजेची आहे. -अविनाश धर्माधिकारी ,निवृत्त सनदी अधिकारी (शब्दांकन ः हेमचंद्र फडके)
Check Also
तृणमूल बंडखोरांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेस आणि पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या अडचणी थांबण्याचे …
पांचजन्य वृत्तपत्र