लेख-समिक्षण

Tag Archives: चालू घडामोडी

माणसांप्रमाणे प्राण्यांनादेखील पडतात स्वप्ने!

स्वप्न पडणे ही सामान्य गोष्ट आहे. जवळपास प्रत्येक मनुष्याला हा अनुभव येतो. पण माणसाप्रमाणे प्राण्यांनादेखील स्वप्न पडतात, असे संशोधनातून समोर आले आहे. अनेक महान तत्त्वज्ञानी, शास्त्रज्ञांनीदेखील यावर भाष्य केले आहे. प्राण्यांना स्वप्न कसे पडते, स्वप्न पडताना त्यांच्या शारीरिक हालचाली कशा असतात आणि याबाबत विज्ञान काय सांगते, ते लक्षवेधी आहे. केंब्रिज युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलेले संशोधन आणि जगभरात झालेल्या वेगवेगळ्या अभ्यासात प्राण्यांना …

Read More »

अश्वेत अभिनेत्याची यशोगाथा

सिडनी पॉइटियर हे बहामासमधील हॉलिवूड अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक होते. वर्ण किंवा रंग माणसाच्या यशाच्या आड येऊ शकत नाही, याचा वस्तुपाठ म्हणजे त्यांचा जीवनसंघर्ष. १९६४ मध्ये ‘लिलीज ऑफ द फील्ड’ या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा अकादमी पुरस्कार (ऑस्कर ) मिळवणारे ते पहिले आफ्रिकन अमेरिकन होते. पण त्यांना हे यश सहजासहजी मिळाले नाही. यासाठी त्यांना अनेक अडथळे आणि निराशेवर मात करावी …

Read More »

कोठडीतील मृत्यू कधी थांबणार?

सध्या तमिळनाडूत एका तरुणाचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्याचे प्रकरण गाजत आहे. या घटनेने पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर कायदा आणि पोलिस यंत्रणेच्या कामकाजाच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले गेले. हा प्रकार शिवगंगा जिल्ह्यातील आहे. ही घटना केवळ एका व्यक्तीचा मृत्यू नसून पोलिस यंत्रणेत कार्यरत असलेल्या काही जणांची मानसिकता आणि न्यायदान प्रक्रिया याकडे अंगुलीनिर्देश करणारी आहे. अजितकुमार नावाच्या एका तरुणाला कथित चोरीप्रकरणात कोणत्याही …

Read More »

स्वप्नांचं रेकॉर्डिंग

स्वप्नांबाबत प्राचीन काळापासूनच माणसाला कुतूहल वाटत आलेले आहे. आपल्याकडे उपनिषदांत ज्या तीन अवस्थांमधून आपण जातो, त्यामध्ये जागृती, स्वप्न व सुषुप्ती (स्वप्नरहीत गाढ झोप) यांचा समावेश केलेला आहे. स्वप्नाबाबत आधुनिक काळातही अनेक प्रकारची संशोधने झाली आहेत. अनेकजण रात्री पाहिलेले स्वप्न विसरून जातात. परंतु, स्वप्न विसरण्यास आता बाय बाय करता येणार आहे. तुम्ही पाहिलेले स्वप्न रेकॉर्ड होणार आहे. मग सकाळी उठून स्वप्न …

Read More »

विलक्षण क्षमतेचा दिव्यांग चित्रकार

स्टीफन विल्टशायर यांचा जन्म २४ एप्रिल १९७४ रोजी इंग्लंडमधील लंडन शहरात एका स्थलांतरित कुटुंबात झाला. तो जन्मतःच ऑटिझम स्पेट्रम डिसऑर्डर या न्यूरोलॉजिकल अडचणीने ग्रस्त होता. चार वर्षांचा होईपर्यंत स्टीफन बोलतही नव्हता. त्याला इतरांशी संवाद साधणे कठीण होते, आणि सामाजिक व्यवहारात तो सहभागी होऊ शकत नव्हता. त्याचे वडील स्टीफन लहान असतानाच एका अपघातात मृत्यूमुखी पडले. त्यानंतर त्याच्या आईने एकटीने त्याला वाढवलं. …

Read More »

पैशाचा पाऊस!

डेट्रॉईट शहराचे आकाश त्या दिवशी वेगळेच दिसत होते. संपूर्ण ईस्टसाईडवर एक वेगळा आनंद दरवळत होता ‡ धुयाने भरलेल्या आभाळातून अचानकच काहीतरी शुभ्र व सुवर्ण झेपावत खाली येऊ लागलं. गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये मिसळलेले ते झळाळते हिरवे नोटांचे तुकडे… जणू काही स्वर्गातूनच आलेली एखादी भेट होती. लोक एकमेकांकडे पाहू लागले, काहींनी डोळे विस्फारले, काहींनी आकाशाकडे हात उचलले आणि काहींच्या डोळ्यांत पाणी आलं. कारण …

Read More »

ऑफिस स्ट्रेस टाळण्यासाठी

सध्याच्या व्यस्ततेच्या जीवनात अनेक लोकांवर कामाचा ताण सतत वाढतोय. या वाढत्या कामाच्या दबावामुळे अनेकांना मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतोय. अधिक ताण आणि दडपण केवळ आपल्या कामावर परिणाम करत नाही, तर आपल्या आरोग्यावरही याचे गंभीर परिणाम दिसू लागतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. हा ताण टाळण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. एका अहवालानुसार, जास्त कामाचा ताण चिंता, नैराश्य आणि …

Read More »

ऊर्जादायी यशोगाथा

विल्यम कमक्वांबा यांचा जन्म ५ ऑगस्ट १९८७ रोजी आफ्रिकेतील मलावी देशाच्या कसुलु नावाच्या एका खेड्यात झाला. त्यांचे कुटुंब अतिशय गरिब होते. घरात वीज नव्हती, शौचालय नव्हते आणि जगण्यासाठी शेती हाच एकमेव आधार होता. विल्यम लहानपणापासूनच जिज्ञासू होता, पण घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे शिक्षण सुरू ठेवणे कठीण झाले. २००१ साली मलावीत भीषण दुष्काळ पडला. अन्नधान्याचा तुटवडा झाला, हजारो लोक उपाशी राहू …

Read More »

व्हॉट्सअपची कोलांटउडी

व्हॉट्सअपच्या निर्मात्यांनी कधीकाळी अभिमानाने म्हटले होते की या सोशल मीडियावर कधीही जाहीरात दिसणार नाही ना कोणत्याही प्रकारचे खेळ. म्हणजेच सतत जाहीरातींचा मारा करणारे अन्य मेसेंजिग प्लॅटफॉर्म जसे फेसबुक आणि इन्स्टाग्रामप्रमाणे आमचे प्लॅटफॉर्म नसेल. अर्थात या दोन्ही प्लॅटफॉर्मवर दिसणार्‍या जाहीरातींनी युजर त्रस्त झाले आहेत. फेसबुकने २०१४ रोजी व्हॉट्सअप ताब्यात घेतले आणि तेव्हापासून त्यांनी जाहीरात न दाखविण्याचे दिलेले आश्वासन पाळले. मात्र आता …

Read More »

बुरशीजन्य संसर्गाचा धोका वाढला

जगभरात सध्या बुरशीजन्य संसर्गाचा धोका वाढत असल्याचे दिसून आले आहे. एवढंच नव्हे तर याच्या उपचाराकरिता वापरली जाणारी औषधे प्रभावहिन होत असल्याचे संशोधनात आढळले आहे. या चोरपावलांनी पसरत असलेल्या धोक्याची वेळीच दखल घेणे गरजेचे असल्याचेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ब्रिटनच्या मँचेस्टर विद्यापीठातील आण्विक जीवशास्त्रज्ञ नॉर्मन व्हॅन रिजन यांच्या मते, जागतिक आरोग्य चर्चांमध्ये बुरशीजन्य रोगजनक आणि अँटिफंगल प्रतिरोधकतेच्या धोक्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. …

Read More »