आध्र प्रदेशाचे वैशिष्ट्य असणारी स्टायलिश, ट्रेंडी तितकीच साधी आणि सुंदर दिसणारी व्यंकटगिरी साडी आपले वेगळेपण राखून आहे. वजनाला हलक्या, मुलायम असणार्या या साड्या महिला वर्गात वेगळा ठसा उमटवून आहेत. या साड्यांमध्ये भरपूर वैविध्य असून त्या प्रामुख्याने कॉटन आणि सिल्कच्या धाग्यांपासून हातमागावर विणल्या जातात. या साड्या आंध्र प्रदेशातील नेल्लोरे जिल्ह्यातील व्यंकटगिरी या छोट्याशा गावात विणल्या जातात म्हणून, या गावाच्याच नावाने या …
Read More »TimeLine Layout
December, 2024
-
22 December
वार्धक्य रोखायचंय?
वार्धक्य रोखण्याबाबत सतत नवनवे संशोधन होत असते. आहारातील बदलही यासाठी उपयुक्त ठरत असतात. कमी कर्बोदके व कमी उष्मांक असलेला आहार हा वार्धक्याच्या प्रक्रियेचा वेग कमी करतो. कारण त्यात विशिष्ट प्रकारचे संयुग असते, असे वैज्ञानिकांचे मत आहे. ग्लॅडस्टोन प्रयोगशाळेतील संशोधक एरिक वेर्दिन यांनी सांगितले की, मानवी शरीरातील एक संयुग हे वार्धक्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. वयाशी निगडित असलेले हृदयरोग, …
Read More » -
22 December
समर्पितपणाची यशोगाथा
भारताचा निष्णात फिरकीपटू आर. अश्विन याने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. उत्तम फलंदाजी आणि गोलंदाजीमुळे अश्विनने भारतीय संघाला अनेक सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे. त्याच्या नावावर अनेक विक्रम आहेत. तो कारकिर्दीच्या सुरुवातीला ओपनिंग आणि नंतर मध्यमगती गोलंदाजी करायचा. आर अश्विनचा जन्म 17 सप्टेंबर 1986 रोजी चेन्नईच्या दक्षिणेस असलेल्या मैलापूर शहरात झाला. त्याचे वडील रविचंद्रन हे क्लब क्रिकेटर होते …
Read More » -
22 December
मानाचा तुरा
मराठीतील अग्रणी समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना ‘विंदांचे गद्यरूप’ या समीक्षात्मक पुस्तकासाठी यंदाचा साहित्य क्षेत्रातील मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्य अकादमीच्या पुरस्कारांमध्ये आठ काव्यसंग्रह, तीन कादंबर्या, दोन कथासंग्रह, तीन निबंध, तीन साहित्यिक समीक्षा, एक नाटक आणि एका संशोधनात्मक पुस्तकाचा समावेश आहे. साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या पुरस्कारांना मान्यता देण्यात आली आहे. एक …
Read More » -
22 December
अदृश्य धोका
त्रासदायक, दुःखद, भयावह घटना लवकरात लवकर विसरून जाण्याची आणि सुखद घटना दीर्घकाळ लक्षात ठेवण्याची नैसर्गिक शक्ती आपल्याला मिळाली आहे. अतोनात नुकसान करणार्या आणि दीर्घकालीन प्रभाव असणार्या गोष्टीही काळाच्या ओघात आपण विसरून जातो. कारण अशा घटन घडल्या म्हणून आयुष्य थांबत नसतं. त्या घटना विसरून नव्या आव्हानांना सामोरं जावंच लागतं. सुखद घटना आपल्याला त्यासाठी शक्ती देतात, म्हणून आपण त्या आपल्या स्मृतीत जपतो. …
Read More » -
22 December
डॉ. आंबेडकर यांच्यावर बोलून अमित शहा वादात
डॉ. आंबेडकर यांच्यावर बोलणे एक फॅशन झाली आहे. आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर…..एवढे नाव देवाचे घेतले असते तर सात जन्मापर्यंत स्वर्ग मिळाला असता, असे केंद्रीय मंत्री अमित शहा लोकसभेत म्हणाले. हे बोलल्यावर त्यांचा व्हिडिओ व्हायरला झाला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहा यांच्या समर्थनार्थ सहा ट्विट केले. तर स्वत: गृहमंत्री शहा यांनी पत्रपरिषद घेऊन स्पष्टीकरण दिले. मात्र, त्यांच्या विधानाचे …
Read More » -
22 December
मुद्यांपासून भरकटलेले अधिवेशन
नव्या सरकारच्या पहिल्या हिवाळी अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सभागृहात आतापर्यंत जे काही पाहायला मिळाले त्यावरुन जनतेमध्ये चुकीचा संदेश गेला आहे. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखर यांच्याविरोधात विरोधकांनी दिलेली अविश्वास प्रस्तावाची नोटीस ही भारतीय संसदेच्या इतिहासातील अभूतपूर्व घटना म्हणावी लागेल. या प्रस्तावाचा सरळसरळ अर्थ देशाच्या उपराष्ट्रपतींवर अविश्वास व्यक्त करणे आहे. संविधानावरील चर्चा असेल किंवा अदानींचा मुद्दा असेल, सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूंनी कामकाजाबाबत …
Read More » -
22 December
तबला पोरका झाला…
तबला या वाद्यसंगीतातील महत्त्वाच्या वाद्याला जगभरात प्रसिद्धी, लोकप्रियता आणि सन्मान मिळवून देण्याचं अद्वितीय कार्य करणार्या पंडित झाकीर हुसेन यांच्या निधनाची वार्ता अखेरच्या क्षणापर्यंत अफवा ठरावी असं असंख्य जणांना वाटत होतं. पण अखेर ती खरी ठरली आणि नियतीनं एक महान तबलावादक आपल्यातून हिरावून नेला. तबला म्हणजे उस्ताद झाकीर हुसेन हे समीकरण वर्षानुवर्षं आपल्याकडं पहायला मिळतं यातच त्यांचं श्रेष्ठत्व दडलेलं आहे. त्याचबरोबर …
Read More » -
15 December
नीनांचे भयानक रूप
सध्या सोशल मीडियावर ’गंजी चुडैल’ हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात सुप्रसिद्ध अभिनेत्रीला ओळखणे देखील कठीण झाले आहे. ज्यामध्ये तिचा भयंकर लूक पाहायला मिळत आहे. ‘पंचायत’ फेम बॉलीवूड अभिनेत्री नीना गुप्ता ह्या या भयानक रुपमध्ये पाहायला मिळत आहे. नीना गुप्तांच्या आगामी प्रोजेक्टमधील लेटेस्ट लूक सोशल मीडियावर समोर आले आहे. त्यात त्या ‘गंजी चुडैल’च्या लूकमध्ये दिसत आहे. त्यांचीही अजब स्टाईल पाहून …
Read More » -
15 December
वितंडवादी घराची, सवंग लोकप्रियता
प्रेक्षकांची अभिरुची जसजशी बदलत आहे, तसतसा मनोरंजनाच्या क्षेत्रातील कार्यक्रमांचा दर्जाही ढासळत आहे. 1980 च्या दशकांत दूरचित्रवाणीवर हमलोग, नुक्कड, देख भाई देख, रामायण, महाभारत यासारख्या दर्जेदार मालिकांनी भारतीय समाज मनावर सखोल आणि सकारात्मक परिणाम केला होता. ंयाउलट आताच्या बहुतांश मालिका द्वेषावर किंवा अश्लिलतेचा कळस गाठणार्या आहेत. गेल्या दीड दोन दशकांपासून बिग बॉसने भारतीय दूरचित्रवाणीवर बस्तान मांडले आहे. लोकांच्या घरातील भांडणे टिव्हीवर …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र






