लेख-समिक्षण

संयम बेपत्ता

आपल्या आईसमोरच नवर्‍याला बदडणार्‍या बायकोचा व्हिडिओ पाहिलात? ‘मी अजमल कसाबचा भाऊ बोलतोय,’ असं सांगून पोलीस मुख्यालय उडवून देणार्‍या मद्यपी सुरक्षा रक्षकाची बातमी वाचलीत? हैदराबादजवळच्या अमीनपूरमध्ये स्वतःच्या तीन मुलांचा गळा दाबून खून करणार्‍या आईबद्दल तुम्हाला कळलंय? पत्नी मुलांना भेटू देत नाही, फोनवर बोलूही देत नाही म्हणून पाळण्याच्या दोरीनेच फास लावून घेणारा यवतमाळचा संदीप आडे तुम्हाला ठाऊक आहे? कोणत्याही दिवशीचं वर्तमानपत्र उघडा. …

Read More »

अवकाळीचा तडाखा! वीज पडून चार ठार

राज्यात नाशिक, धुळ्यासह विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत गुरुवारी अवकाळीने तडाखा दिला. अवकाळी पावसासोबत वीज कोसळून भंडारा जिल्ह्यातील दोन, तर यवतमाळ जिल्ह्यातील एकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. बीड जिल्ह्यात शेतात गेलेल्या शेतकर्‍यावर काळाने घाला घातला. धुळे जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. यात ठिकठिकाणी शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. नागपूरसह विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने पावसाळ्यासारखी परिस्थिती निर्माण …

Read More »

अमेरिकन टेरीफअस्त्राचा ‘कडकडाट’

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रिसिप्रोकल टॅक्स धोरणांतर्गत 2 एप्रिल रोजी जगातील 60 देशांविरोधात आयात शुल्कात वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला आणि जगभरात खळबळ उडाली. अमेरिकन शेअर बाजारात विक्रमी घसरण झाली असून भारतीय शेअर बाजारातही मोठी पडझड झाली आहे. भारतावरही त्यांनी 26 टक्के आयात शुल्क लावले आहे. आयात शुल्काच्या भयामुळे आपण बचावाच्या भूमिकेत गेलो तर भारतालाही त्यातून काही साध्य होणार …

Read More »

वादळ बेताल ‘ग्रोक’ चे

भारतात आता चॅटजीपीटीनंतर आणखी एका एआय मॉडेलची जोरात चर्चा असून एलॉन मस्कच्या एक्सएआय कंपनीच्या ‘ग्रोक-3’ चा गाजावाजा होत आहे. या टूलने अनफिल्टर्ड आणि धाडसी वक्तव्यांनी हाहाकार माजवला आहे. एलॉन मस्क यांच्याप्रमाणेच ग्रोकही बिनधास्त आहे. त्याला जे योग्य वाटते, ते बोलून टाकतो. अगदी प्रश्न कोण विचारत आहे, याची पर्व न करता. शिवाय कोणत्या संदर्भात विचारणा केली जात आहे, याचा विचार न …

Read More »

शुक्लांनी सांगितली ‘किक’ची आठवण

जेष्ठ अभिनेते सौरभ शुक्ला यांची बॉलीवूडमधील एक उत्कृष्ट अभिनेत्यांमध्ये केली जाते. त्यांनी आजपर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तसेच बर्‍याच चित्रपटांमध्ये त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. अलीकडेच त्यांनी सलमान खानच्या ‘किक’ चित्रपटातील एक किस्सा शेअर केला आहे. ‘किक’मध्ये सौरभ शुक्ला यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिस मुख्य भूमिकेत होते. जॅकलिनच्या वडिलांची भूमिका सौरभ शुल्का …

Read More »

प्रतीक्षा संगीतप्रधान चित्रपटांची

भारतीय चित्रपटसृष्टी आणि संगीत यांचे नाते अतूट आहे. सुरुवातीपासूनच भारतीय सिनेमांमध्ये संगीताला अनन्यसाधारण महत्त्व मिळाले आहे. आजही चांगल्या चाली, हृदयस्पर्शी गीते आणि भावनिक सादरीकरण असलेले संगीतप्रधान चित्रपट प्रेक्षकांना भावतात. मात्र, अलीकडच्या काळात असे चित्रपट कमी होत चालले आहेत. याचे एक कारण म्हणजे रोमँटिक चित्रपटांची कमतरता, ज्यामध्ये प्रसंगानुरूप उत्कृष्ट सूररचना होते. त्याचबरोबर, आता दिग्दर्शकांमध्ये संयमाची कमतरताही जाणवते. मधुर संगीताचा तो सोन्याचा …

Read More »

‘नीट ’ चा पेपर सोडवताना…

एनईईटी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी कठोर परिशम, योग्य नियोजन आणि सराव महत्त्वाचा असतो. सतत अभ्यास, पुनरावलोकन आणि प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव केल्यास निश्चितच यश मिळेल. वेळेचे नियोजन, अचूक रणनीती आणि आत्मविश्वास या त्रिसूत्रीने एनईईटी परीक्षेत उत्तम कामगिरी करता येईल. मॉक टेस्ट द्या: ‘नीट’सारख्या परीक्षेसाठी वेळेचे व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे. नियमितपणे मॉक टेस्ट सोडवा आणि गती वाढवा. ओएमआर भरायची सवय लावा: परीक्षेत ओएमआर …

Read More »

ब्लाऊजच्या आकर्षक बाह्या

महागडी, आकर्षक कलाकुसर असणारी, नक्षीदार, चांगले फॅब्रिक असणारी साडी घेताना त्यासोबतचा ब्लाऊजही त्याला साजेसा आणि फॅशनेबल असणे गरजेचे असते. अन्यथा साडीचे सौंदर्य आणि एकूण गेटअप फिका पडतो. याउलट ब्लाउजची रचना स्टायलिश असेल तर अगदी साधी साडीसुद्धा खुलून जाते. ब्लाउजमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेक आणि स्लीव्हजची रचना. ब्लाउजचे हे दोन्ही घटक जर नीट विचार करून डिझाईन केले असतील, तर स्वस्तातली, …

Read More »

ब्रोकोली की फ्लॉवर,काय अधिक गुणकारी?

आपल्याकडे आता अनेक नव्या वाटणार्‍या भाज्याही रूळू लागल्या आहेत. कोथिंबिरीसारखी दिसणारी पार्ली असो किंवा फ्लॉवरसारखी दिसणारी ब्रोकोली, यूट्यूब – टीव्हीवरच्या रेसिपी शोमुळे त्यांची ओळख सर्वांनाच झाली. ब्रोकोली आणि फ्लॉवर या दोन भाज्या एक सारख्याच दिसत असल्याने खरेदी करताना कोणती भाजी जास्त आरोग्यदायी आहे हे कळत नाही. आता याबाबत आहारतज्ज्ञांनी काही माहिती शेअर केली आहे. ब्रोकोली आणि फ्लॉवरमध्ये काय फरक आहे? …

Read More »

संघर्षातून उभारला बॅँ्रड

मॅडम सी. जे. वॉकर यांचे खरे नाव सारा ब्रेडलव्ह होते. त्या अमेरिकेतील पहिल्या सेल्फ मेड महिला कोट्यधीश ठरल्या. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी आपला व्यवसाय उभारला आणि केवळ आर्थिक यशच नव्हे, तर सामाजिक परिवर्तनातही मोठा वाटा उचलला. सारा यांचा जन्म 23 डिसेंबर 1867 रोजी लुईझियाना, अमेरिका येथे एका गरीब कुटुंबात झाला. त्यांचे आई-वडील गुलामगिरीतून मुक्त झालेले होते. लहान वयातच आई-वडिलांचे निधन …

Read More »