केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच युपीएससीच्या परीक्षेचा प्रवास हा एक मोठा, कठीण आणि आव्हानात्मक असतो. भारताच्या प्रशासनात महत्त्वपूर्ण पदावर काम करण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते आणि यासाठी संपूर्ण देशातील लाखो विद्यार्थी तयारी करत असतात. या परीक्षेची कडक परीक्षा पद्धत, विस्तृत अभ्यासक्रम आणि तीव्र स्पर्धा पाहता, योग्य मार्गदर्शन आणि तयारी अत्यंत आवश्यक आहे. या परीक्षेतील यशासाठी काही गोष्टी लक्षात ठेवा. सर्वांत पहिली …
Read More »TimeLine Layout
February, 2025
-
9 February
कुशनच्या दुनियेत
कुशन खरेदी करताना… कुशन हे नेहमी सोफा किंवा बेडच्या आकाराप्रमाणे असावेत, खूप मोठे किंवा खूप लहान नसावेत. सोफा किंवा बेडवर आवश्यकतेपेक्षा जास्त कुशन ठेवू नका. नेहमी गोलाकार, आयताकृती किंवा चौकोनी आकाराच्या उशा घ्या. लिव्हिंग रूमच्या भिंती आणि सोफ्याच्या रंगाशी जुळणारे कुशन कव्हर्सचा रंग आणि पॅटर्न निवडा. बेडरुम आणि लिव्हिंग रूममध्ये ठेवलेले फर्निचरच नाही तर त्यामध्ये सजवलेल्या गाद्याही बेडरुम आणि लिव्हिंग …
Read More » -
9 February
सर्वात पातळ काच!
जगातील सर्वात पातळ काच कुठे शोधण्यात आली हे तुम्हाला माहिती आहे का? अपघातानेच हा शोध लागला होता व या काचेची जाडी दोन अणूंइतकी आहे. कॉर्नेल व जर्मनीच्या उल्म विद्यापीठाच्या संशोधकांनी शोधलेली काच ही सर्वात पातळ काच म्हणून गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् मध्ये नोंदली गेली आहे. या काचेचे तावदान इतके पातळ आहे, की त्याचे सिलिकॉन व ऑक्सिजन रेणू हे इलेक्ट्रॉन …
Read More » -
9 February
दुर्लक्षित वैज्ञानिकाची प्रेरक कहाणी
भारताच्या प्राचीन विज्ञानाची जगभरात ओळख करून देणार्या वैज्ञानिकांमध्ये डॉ. शिवकर बापूजी तळपदेे यांचे नाव अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांनी 1895 साली मुंबईच्या चोपट्टी समुद्रकिनारी ‘मरुतसखा’ नावाचे पहिले स्वदेशी विमान यशस्वीरीत्या उडवले. परंतु त्यांचे नाव इतिहासाच्या पानांत मात्र झाकोळले गेले. प्रारंभिक जीवन आणि प्रेरणा शिवकर तळपदेे यांचा जन्म 1864 मध्ये मुंबई येथे झाला. त्यांना लहानपणापासूनच वेद आणि संस्कृत ग्रंथ वाचण्याची आवड होती. …
Read More » -
9 February
झोपडपट्टयांची मुंबई
मुंबई कोणाला कधीच उपाशी झोपू देत नाही, असे म्हणतात. अनेक स्वप्ने उराशी बाळगलेले बेरोजगारांचे लोंढे देशाच्या कानाकोपर्यातून मुंबईत येतात. ग्रामीण भागातून मुंबईत येण्याचा ओघ वाढल्याने मुंबईची बजबजपुरी झाली आहे. अनधिकृत झोपड्यांमुळे मुंबई समस्यांचे आगर बनले आहे. राज्य सरकार आणि महापालिकेच्या अधिकारी, कर्मचार्यांसाठी मुंबईतल्या झोपडपट्ट्या म्हणजे बेकायदा वसुलींचे ‘एटीएम’च बनले आहे. कधीही जा आणि मनमानी वसुली करा, असा अधिकार्यांचा दृष्टिकोन इथल्या …
Read More » -
9 February
अर्धा हिस्सा
नातीगोती वगैरे खरोखर अस्तित्वात असतात, की गरज ठरवून त्यानुसार जोडली जातात? एकत्र कुटुंबपद्धतीपासून ‘सेल्फ मॅरेज’ म्हणजे स्वतःशीच लग्न करण्याच्या अजब निर्णयापर्यंत बरीच स्थित्यंतरं आपण पाहिली. या प्रवासात माणसाला अधिकाधिक एकटं आणि आत्मकेंद्री होताना आपण पाहिलं. शहरांकडे होणार्या स्थलांतरांमुळं सुरुवातीच्या काळात या विभक्तपणाचा आपण ‘अपरिहार्यता’ म्हणून स्वीकार केला. मग जास्तीत जास्त आमदनी आणि कमीत कमी जबाबदारी असणार्या नवश्रीमंतांची नवी जीवनशैली म्हणून …
Read More » -
9 February
दिल्लीत ‘भाजप सरकार’
भाजपला 48 आणि आप ला 22 जागा मिळाल्या. तसेच माजी मुख्यमंत्री व आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि माजी मुख्यमंत्री मनिष सिसोदीया यांचा दारुण पराभव झाला. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी 58 टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. ‘आप’ला झटका बसला आहे. मतदानोत्तर एक्झिट पोलच्या सर्वेक्षणामध्ये त्याचे संकेत मिळाले होते. दिल्ली भाजपची लाट निर्माण करण्यात आली. या निवडणुकीचा दिल्लीमध्ये ‘अब की बार, भाजप …
Read More » -
9 February
आव्हान मुलांच्या ‘होरपळीचे ’
युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड (युनिसेफ) च्या ’लर्निंग इंटरप्टेड: ग्लोबल स्नॅपशॉट ऑफ क्लायमेट-रिलेटेड स्कूल डिसप्शन इन 2024’ या अहवालातील धक्कादायक निष्कर्षांमुळे मुलांबद्दलची चिंता वाढली आहे. आतापर्यंत, जागतिक तापमानवाढीचा शेती आणि हवामान चक्रावर होणार्या परिणामांचे अभ्यास निष्कर्ष समोर येत होते; परंतु मुलांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक समस्यांवर हवामान बदलाचा इतका संवेदनशील अभ्यास पहिल्यांदाच समोर आला आहे. या अहवालानुसार, गेल्या वर्षी …
Read More » -
9 February
चीनचे ‘मनाचे’ उद्योग
माहिती-तंत्रज्ञानाने जग जवळ आणले हे वास्तव असले तरी या प्रक्रियेने काही धोकेही जवळ आले आहेत. आज इंटरनेटच्या विश्वातील गुन्हेगारांची संख्या ही प्रत्यक्ष जमिनीवरील चोर-लुटेरे, डाकू यांपेक्षा मोठी बनत चालली आहे. तशाच प्रकारे शत्रू राष्ट्राला हादरे देण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर राष्ट्रे मोठ्या प्रमाणावर करत चालली असून त्यामाध्यमातून प्रत्यक्ष युद्धातील हानीप्रमाणे वित्तीय नुकसान होताना दिसत आहे. विघातक कृत्यासाठी तंत्रज्ञानाच्या पोटातून काही आविष्कार जाणीवपूर्वक …
Read More » -
2 February
नागा आणि साईची ऑनस्क्रीन केमेस्ट्री
दाक्षिणात्य अभिनेता आणि नागार्जुनचा मोठा मुलगा अभिनेता नागा चैतन्यचा ’थांडेल’ चित्रपटाची मोठी चर्चा केली जात आहे. या चित्रपटाच्या मेकर्सनी थांडेलला पॅन इंडियामध्ये रिलीज करण्याचे ठरवले असून काही प्रमुख शहरांमध्ये चित्रपटाचे प्रमोशन करण्यात येणार आहे. अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री साई पल्लवी यांची प्रमुख भूमिका असलेला थांडेल चित्रपट आहे. चंदू मोंडेटी दिग्दर्शित हा चित्रपट रोमान्स आणि देशभक्तीचा मिलाफ आहे. हा चित्रपट …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र







